Book Reviewed by भदाने, प्रज्ञा पंडित
“अग्निपंख”.
या पुस्तकाचे लेखक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. “अग्निपंख” हे पुस्तक भाताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. हे पुस्तक भारतीय तरुणांना त्यांच्या जीवनाच उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी लिहिले गेले आहे. हे पुस्तक कलाम यांचे विचार, तत्वज्ञान आणि जीवनातील अनुभव यांचे अनुकरण आहे. ज्यामुळे वाचकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी नवा दृष्टीकोन मिळतो. अग्निपंख या पुस्तकात १९८ पानी आहेत. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्य ही आहे. या पुस्तकाचे नाव इंग्रजीत wings of fire. या पुस्तकाचे अग्नि, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या विषयांवर लिहिले आहे भारत तंत्रज्ञानाची लढाई याची माहिती दिली आहे. तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१ मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजे देशातील भारतरत्न हे सर्वोच्च नागरी सम्मान मिळवणारे डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम आहे.
हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आपले राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारला आहे. या पुस्तकाची सुरुवात त्यांनी मातापित्याला स्मरून केली आहे. अथर्ववेक्षातील ओळी द्वारे सुरुवातीला ते सांगतात, ” ही पृथ्वी देवाची आहे. हे अफाट असीम आकाश त्याचेच आहे. दोन्ही अफाट अमर्याद समुद्र त्याच्यात हृदयात शांत होतात आणि तरीही लहानश्या तळ्यात तो असतो” ते एक महान अद्भुत व्यक्तिमत्व कलाम हे राष्ट्रपती, वैज्ञानिक, आणि इंजिनिअर सुद्धा होते. त्याचे प्रेरणादायक विचार आजही भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अत्यंत लोकप्रिय आहे.अब्दुल कलाम हे आपल्या कामप्रती ध्येयनिष्ट होते. त्यांच्यासाठी कोणतीही वेळ ही कामाचीच वेळ आहे. ते आपला अधिकाधिक वेळ कार्यालयातच घालवत असत. त्यांच्या विचारांसोबत त्यांची पुस्तके ही प्रचंड लोकप्रिय आहेत. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथापुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचं छत्र गमावल्याने डॉ कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना एकदा गणितांचे शिक्षक श्री रामकृष्णा अय्यर यांनी छडी मारलेले ते मानवर घेऊन पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या कलाम यांचे प्रार्थनेच्या वेळी सर्वांदेखत कौतुक करतात आणि म्हणतात,” माझ्या छडीचा मार खाणारे पुढे जाऊन मोठी व्यक्ती बनतात, तु देखील फार मोठा होशील”.
त्यानंतर गणिताची त्यांना विशेष आवड लागली नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी एस्सी झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने जोहराने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून इरॉनॉटिकसचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ‘नासा ‘ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पे टेक्नोलोजीचे प्रशिक्षण घेतले .
अतिशय सहजतेने आणि फार सोप्या भाषेत या पुस्तकाची मनोहर्षक शब्दांत मांडणीत आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्याव्यात पहिली म्हणजे माणसाला दुढ इच्छाशक्ती हवी दुसरी तिचा ध्यास घ्यायला हवा तिसरी म्हणजे ती पूर्ण होईल असा मनात दुढ विश्वास हवा म्हणजे प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो, तरी ही त्या सर्वांना बांधणारा एक दैवी अंश प्रत्येकात असतो.
संकटे आली दुःख भोगावी लागली तरी माणसाने सोडू नये, न घाबरता संकटांना सामोरे जावे, आपल्या दुःखांना समजून घ्यायचा प्रयत्न करावा संकटे माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात. जागितिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. त्यांच्या वडिलांचे मित्र मंदिरात पूजारी होते. त्यामुळे वेद कुराणावरील चर्चा नेहमीच होत असे त्या वातावरणाचा सकारात्मक परिणाम कलामांचा जीवनावर झाला त्यांचे विचार प्रबल सकस बनले ते म्हणतात, हृदयापासून, आत्म्यापासून एखादी इच्छा उत्पन्न झाली असेल ती जर तीव्र आणि पवित्र असेल. तिचा मनाला ध्यास लागला असेल ती तर तिच्या मध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा असते. अग्निपंख या पुस्तकाला वहीची चार पेज काय अग्निपंख हे कहानी सांगेल.अग्निपंख हा चार नव्हे तर १९८ पेजचा आहे. १५ ऑक्टोंबर १९३१ ला त्यांचा जन्म झाला व २७ जुलै २०१५ मध्ये मृत्यू झाला. जातीने जरी मुसलमान होते तरी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम भारतासाठी झटले. जरी मुसलमान होते तरी यांची भगवदगीता पाठ होते, जाता जाता हे दोन शब्द सांगेल. अग्निपंख अस म्हणत,
जर तुम्हाला सूर्यासारख चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे जळावे लागेल.
जर खरंच आपल्याला यशस्वी व्हायचे असेल, तर त्यासाठी अथक निरंतर आणि हुशारीने परिश्रम करावे लागेल. स्वतःला झिजावे लागेल.