ग्रंथ परीक्षण : चांडक प्राची राधेश्याम,वाणिज्य विभाग, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक
कथासूत्राचे स्वरूप – पुस्तकाचा प्रारंभ डॉ. कलाम याच्या बालपणाशी संबंधित आहे. ते एक सामान्य कुटुंबातील मुलगे होते आणि त्यांचे शालेय जीवन अत्यंत साधे होते, त्यांच्या कुटंबाच्या संस्कारामुळे त्यांना संघर्षाची आणि शिक्षणाची महत्वाची शिकवण मिळाली. त्यांची बालपणीची एक महत्वाची आठवण म्हणजे ते एक “पाकेट” विकत होते आणि त्यांनी त्यांच्या शिक्षकांकडून प्रेरणा घेतली होती. पुस्तकाच्या पुढील भागात, डॉ कलाम यांची इंजिनिअरिंगची शिक्षण प्रक्रिया, तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (ISRO) आणि संरक्षण तंत्रज्ञान विकास संस्थेतील (DRDO) त्यांच्या कामांची चर्चा केली आहे. तेथे त्यांनी भारतीय मिसाईल प्रणाली विकसित केली, ज़्यामुळे भारताला अणुशक्ती आणि संरक्षण तंत्रज्ञानाची एक मजबुत स्थान मिळवता आले. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञान विषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकरणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे. या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर डॉ. कलाम यांचे तत्वज्ञान आणि विचारधारा प्रगट दिसते. डॉ. कलाम यांच्या दृष्टिकोनानुसार, शिक्षण हीच माणसाची खरी ताकद आहे.
सारांश – “अग्नीपंख” हे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आत्मचरित्र आहे. ज्यात त्यांनी आपल्या बालपणापासून ते भारताचे मिसाईल मॅन, होण्यापर्यंतचा प्रवास अलगडला आहे. पुस्तक त्यांच्या संघर्षमय जीवन, शिक्षण आणि भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेतातील योग्यदानावर प्रकाश टाकते. डॉ. कलाम यांनी तामिळनाडूतील रामेश्वर येथे एका साध्या मुस्लिम कुटुंबात जन्म घेतला त्याचे बालपण कठीण परिस्थितीत गेले, पण शिक्षण आणि कष्टामुळे त्यांनी स्वत:साठी एका वेगळे स्थान निमार्ण केले. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि संरक्षण तंत्रज्ञान विकास संस्था (DRDO) मध्ये मिसाईल विकसित केल्या तसे “आग्नी” आणि “पृथ्वी. पुस्तकात त्यांची कर्तव्यनिष्ठा, साधेपणा आणि देशसेवेची भावना आधोरेखित केली आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रेरणादायी प्रसंग शिक्षकाचे मार्गदर्शन, आणि भारतीय तरुणांसाठी दिलेले संदेश यामुळे हे पुस्तक प्रेरणादायी ठरते. “अग्निपंख” हे आत्मचरित्त वाचकांना जीवनातील अडचणीवर मात करण्याची आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा येते. या पुस्तकातून डॉ. कलाम यांनी आपल्या जीवनाचा आदर्श ठेवत तरुण पिढीला प्रगतीचा मार्ग दाखवला आहे. हे पुस्तक तरुणांनी नक्की वाचायला हवे.
मुख्य विषय –
१) परिश्रम आणि साधेपण –
डॉ. कलाम यांनी आपले जीवन साधेपणी व आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कष्टाने निर्माण केले त्यांनी शाळेपासून कठोर परिश्रम आणि तपश्रर्येची म्हत्वाची शिकवण घेतली.
२) शिक्षणाचे म्हत्व –
शिक्षणाच्या महत्वावर डॉ. कलाम यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की “शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान नसून ते जीवनाला समृध्द करणारं असावं ”
३) विज्ञान आणि तंत्रज्ञान –
डॉ. कलाम यांच्या वैज्ञानिक कार्याची महत्वाची बाब भारतीय मिसाईल कार्यक्रम ज्याने भारताला जागतिक स्तरावर शक्तिशाली राष्ट्र वनवले. त्यांनी “आग्नेय” आणि “आग्न” सारख्या मिसाईलचे उत्पादन केले.
४) पार्श्वभूमी –
पुस्तक भारतीय समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भमध्ये लिहिले माहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीसह डॉ. कलाम त्यांच्या कार्याचा आदर्श त्यांच्या शालेय जीवणापासून ते विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामाणेरीपर्यंत वाढला. त्यांच्या शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेचा त्यांना मोठा आधार मिळाला.
५) ध्येय आणि प्ररेणा –
त्यांच्या जीवनाच्या विविध प्रसंगामधुन आपले ध्येय साधण्यासाठी आणि समाजासाठी काम करण्याची पप्रेरणा मिळवण्याचे महत्त्व सांगितले आहे.
पात्रे – डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम- पुस्तकाचे मुख्य पात्र ज्यांनी संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आणि त्यांची कष्टाची शिकवण, संकल्प आणि तंत्रज्ञानाविषयी ज्ञान त्यांचे जीवन समृध्द करते.
किशोर काळातील शिक्षक आणि कुटुंबीय – डॉ. कलाम यांच्या शिक्षकणाचा प्रारंभ त्यांच्या शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेचा त्यांना मोठा आधार मिळाला. :-
विश्लेषण –
लेखनशैली –
डॉ. कलाम यांची लेखनशैली अत्यंत साध्या भाषेत जीवनातील नेमकी आणि प्रभावी आहे. त्यांचे विचार स्पष्ट आणि प्रेरणादायक आहेत. त्यांनी अत्यंत साध्या भाषेत जीवनातील कठोर संघर्ष आणि ते कसे यशस्वी झाले ते वर्णन केले आहे.
पात्रांचे विकास –
पात्रांची उत्तम रचना केली आहे. डॉ. कलाम यांची जीवनगाथा वाचताना ते वाचकाच्या मनावर आपली छाप सोडतात त्यांच्या संघर्षपूर्ण प्रवासाची कहाणी हृदयाला मिळते.
कथानक संरचना –
कथानकाची गती उत्तम आहे. पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात एक मळ्या आयामाची सुरुवात होते. ज्यामुळे वाचक आकर्षित होतो आणि त्यांना पुढे काय होईल हे जानून द्यायचे असते.
विषय आणि संदेश –
पुस्तकाचे संदेश अत्यंत प्रभावी आहे, ते जीवनाला संघर्ष आणि ध्येय निश्रित करण्याचे महत्त्व शिकवले. तसेच त्यांनी आपल्या देशासाठी आणि समाजासाठी केलेल्या कार्याची उंची देखील व्यक्त केली आहे
भावनिक परिणाम –
पुस्तक वाचताना डॉ कलाम यांच्या संघर्षामुळे त्यांच्यातील आदर्शता आणि त्यांच्या दृढ निष्चय वाचकावर मोठा भावनिक परिणाम करतो. त्यांच्यातील आदर्शता आणि त्यांचा दृढ संघर्षातून प्रेरणा घेऊन आपल्याला जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा मिळते.
ताकद –
पुस्तकातील मुख्य ताकद म्हणजे डॉ. कलाम यांचे जीवनातील संघर्ष आणि त्यातून मिळालेल्या यशाची प्रेरणा पुस्तकाची साधी, स्पष्ट आणि प्रेरणादायक शैली वाचकांना सहजपणे आकर्षित करते.
कमकुवत बाजू –
कधी-कधी काही भागात डॉ. कलाम यांचे जीवन अत्यंत आदर्शदृष्या मांडले गेले आहे. ज्यामुळे त्याच्या संघर्षाची काही माणुसकी कमी दिसते.
वैगक्तिक विचार –
जोडणी –
पुस्तक वाचनाना मन्ता खुप प्रेरणा मिळाली डॉ. कलाम यांचे संघर्ष आणि त्यांच्या ध्येयप्रति असलेली निष्ठा मला माझ्या जीवनातही लागू करायची आहे.
सुगंगती –
आजच्या काळात जिथे युवा पिढीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे पुस्तक त्यांना प्रेरणा देऊन त्यांच्या स्वप्नांना पाठपुरावा करण्यास मदत करू शकते. डॉ. कलाम यांचे जीवन कष्ट जिद्द आणि समर्पण यांचा उत्तम नमुना आहे भारताच्या संरक्षण क्षेत्रावर प्रभाव बघून राष्ट्रीय अभिमान वाहतो.
निष्कर्ष –
शिफारस –
हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, विशेष करून तरुण पिढीला कारण ते जीवनातील संघर्ष आणि ध्येय निश्चिताची महत्त्वाची शिकवण देणे. ज्यांना त्यांच स्वप्न सत्यात उत्तरवायचे आहे. विज्ञान आणि राष्ट्रसेवेमध्ये रुची असलेल्या व्यक्तीसाठी हे पुस्तक खुप महत्त्वाचे आहे आणि पुस्तक विद्यार्थ्यासाठी आणि प्रेरणादायी साहित्य वाचण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहे.
रेटिंग –
मी या प्रेरणादायी व जीवनातील यशस्वी पुस्तकाला १० पैकी १० तारे देईन.
प्रारंभिक छाप –
मी हे पुस्तक वाचले कारण डॉ. कलाम यांची जीवनगाथा मला नेहमीच प्रेरणादायी वाटली आहे. त्यांचे शुन्यापासून शिखराकडे प्रवास आणि त्यांचा जीवनातील कठोर परिश्रम मला अत्यंत प्रेरणादायक वाटले. या पुस्तकाने त्यांच्या संघर्षच्या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील योगयानाचा साक्षात्कार दिला. त्यांनी कष्टातून यश मिळवले, हे जाणून घेणे प्रेरणादायक ठरते. हे पुस्तक निवडण्यामागे माझ्या मनातील मुख्य कारण म्हणजे डॉ कलाम यांच्याविषयी आदर आणि त्यांचे जीवनकार्य आधिक जवळून समजून घेण्याची इच्छा होती.
अंतिम विचार –
“आग्नीपंख” हे केवळ पुस्तक नाही तर जीवनातील यशस्वी होण्याचा मूळमंत्र देणारी शिकवण आहे. डॉ कलाम सांचे जीवन कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. मला अग्निपंख ही कादंबरी खुप आवडली. त्यातील विविध पात्रांची व्यक्तिरेखांकन आणि त्यांच्यातील नातेसंबंधाचे चित्रण प्रभावी आहे. कांदबरीतील घटनांनी मला वेधून घेतले आणि मला त्यांच्यात रममाण झाले. कांदबरीतील भाषेचा वापरही मला खूप आवडला. त्यातील शब्दांचा चांगला वापर केला गेला आहे आणि त्यामुळे कादंबरी वाचताना मला खूप आनंद झाला.
मला अग्निपंख ही कादंबरी खूप शिकवणीदायक वाटते. ती आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी कसे प्रयत्न करायचे ते शिकवते तसेच ती आपल्याला आपल्या मित्रांचे महत्त्वही सांगते. आग्नीपंख ही एक उत्कृष्ट कांदबरी आहे आणि मी ती सर्वांनाच वाचण्याची शिफारस करते. या पुस्तकाने मला विचार करायला लावले की, आपणही आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून आपल्या ध्येयांच्या दिशेने प्रयत्न करायला हवे. डॉ. कलाम यांच्या अनुभवांनी दाखवले की परिस्थीती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि ध्येय निश्चय याने यश नक्की मिळते. त्यांनी प्रत्येक तरुणाला स्वप्न बघण्याची प्रेरणा दिली आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आत्मविश्वास दिला. अग्निपंख हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, कारण ते फक्त यशाची कथा नाही तर एक जीवन मार्गदर्शक आहे.