प्रा. राम देशमुख यांनी “आधुनिक स्थूल अर्थशास्त्र”या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वच स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
स्थूल अर्थशास्त्रात आजपर्यंतच्या मराठी पुस्तकात चर्चिला न गेलेल्या अनेक प्रकरणांचा समावेश यात करण्यात आला आहे.जसे की पैशाचा पुरवठा व पैशाची मागणी यामध्ये बदल घडवून आणणारे महत्त्वाचे घटक, व्याजदराचे सिद्धांत, भाव वाढ, राष्ट्रीय उत्पन्न,मौद्रिक वित्तीय धोरण, उपभोग फलाचे सिद्धांत, उत्पन्न व विभाजनाचे स्थूल सिद्धांत, कल्याणकारी अर्थशास्त्र, व्यापार चक्राचे स्वरूप व सिद्धांत तसेच मुंडेल फ्लेमिंग यांच्या खुल्या अर्थव्यवस्थेचे परिणाम, मूलभूत संकल्पना इत्यादी विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
हे पुस्तक पदवी, पदव्युत्तर व विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची एक प्रकारे तिजोरी असल्याचे मला वाटते.