Share

बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नाचं मूर्त रूप म्हणजे आनंदवन. पण ‘आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य’ एवढीच ओळख जनमानसात रुजलेली आहे. प्रत्यक्षात त्यापलीकडे अंध-अपंग-कर्णबधिर-बेरोजगार-शेतकरी-आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलं आहे.
शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरबांधणी अशा अनेक क्षेत्रांत नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आनंदवनात उभं राहिलेलं आहे. विशेष म्हणजे, समाजाने नाकारलेल्या साध्यासुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडला आहे.
आज आनंदवन हे सुखी नांदतं गाव तर आहेच, पण त्याहीपलीकडे गावाखेड्यांच्या सर्वंकष विकासाचं जितं जागतं उदाहरणही आहे. बाबांचं स्वप्न जमिनीत रुजवणाच्या प्रयोगशील हातांची ही गोष्ट उभ्या देशाला प्रेरणा देणारी आहे.

Related Posts

नदीष्ट कादंबरी ही प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार

Tanaji Mali
Shareप्रा.जयश्री बगाटे , श्री पद्ममणी जैन महाविदयालय, पाबळ. नदिष्ट ही मनोज बोरगावकर यांची केवळ कादंबरी नसून त्यांच्या जीवन विश्वातील प्रत्यक्षदर्शी...
Read More

महाश्वेता

Tanaji Mali
Shareनाव :- अश्विनी लहानू माळेकर जयकर ज्ञानस्त्रोत  केंद्र ( ग्रंथालय प्रशिक्षणार्थी ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे प्रस्तावना :- सुधा...
Read More