Share

!! माझिया मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके !!
मराठी भाषेत अनेक पुस्तक लिहिली गेली आहेत, त्यातीलच एक म्हणजे आयुष्याचे धडे गिरवतांना, या पुस्तकाच लेखन सुधामुर्ती यांनी केलेले आहे तर लीना सोहोनी यांनी त्याला अनुवादित केलेल आहे.

हे पुस्तक २० हून अधिक लहान लहान गोष्टींचा एक रंजक आणि वळणदार स्त्रोत आहे. सुधा मूर्ती या जेव्हा इन्फोसिस फाऊडेशन च्या मदतीने समाजासाठी काम करत होत्या, त्यावेळी त्याच्यासोबत घडलेल्या लहानसहान घटना, त्यांनी भेटलेली अनेक प्रकारची, विविध ढंगाची माणस आणि त्यांचे स्वभाव, त्यातून निर्माण होणारे अनेक प्रसंग हे सर्व लेखिकेने अगदी उत्तम टिपले आहेत.
मूळ इंग्रजी भाषेत असलेले
‘ The day I stopped drinking milk ’ या पुस्तकाने मराठी साहित्यात भर घातली आहे.
पुस्तकातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही ना काही देऊन जाते. काही मनाला हळव करतात तर काही उत्सुर्फ, काही खिन्न तर काही कुतूहलाने विचार करायला भाग पाडतात. गोष्टींना आपल्याला जीवनाची जाणीव करून देतात. आपल्याशी नकळत आपल्या सोबत घडणाऱ्या घटनांशी त्याची जुळावाजुळव करतो, लोकांना पडताळतो आणि आपल्याला नाविन्याची कास मिळावी असे वाटायला लागते. हे या पुस्तकाचे सामर्थ्य किंवा गुपित आहे अस म्हणू.
सुधा मूर्ती यांच्या लघुकथांचा हा अनुवाद – “ बॉबे टू बंगळूरू “ ही पहिलीच कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. यात चित्रा नावाच्या स्त्रीच आयुष्य सुधा मूर्तीना “ बॉबे टू बंगळूरू “ रेल्वेत भेटल्यानंतर किती बदलत ते स्पष्ट केलेल आहे. हि कथा वाचल्यानंतर अस म्हणता येईल की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त वाट दाखवणारा पाहिजे. मुल्यांवर असलेली श्रद्धा, तसेच माणुसकी या बाबी सर कथांचा पाया आहेत.
पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात, हे या पुस्तकातून समजते. तसेच स्वार्थाच्या पलीकडे ही एक जग असत ते म्हणजे माणुसकीच हे या पुस्तकामुळे जाणवते.
लहानपणी आजीने सांगितलेल्या कथा व अनुभव असावेत असच हे पुस्तक आहे. मला काही कथा मोहून गेल्या. वाचून पहा. एक वेगळा अनुभव मिळू शकतो. तसेच आयुष्याचे कठीण प्रसंग सोडवण्यात मदत होऊ शकते.

Recommended Posts

उपरा

Dr Gayatri Satpute
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Dr Gayatri Satpute
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More