Share

डॉ. सुनंदा वाघमारे (सहाय्यक प्राध्यापक, अ.भा. म. शि. परिषदेचे श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे )

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक क्षण हे निर्णायक, फुटकळ, चॅलेंजिंग येतात, ते नोकरीचे, व्यवसायाचे, विवाहाचे किंवा घटस्फोटा चे ही असू शकतात. अशा महत्वाच्या, कठीण प्रसंगात त्याची उत्तरे तुम्हाला शोधावी लागतात. अशा निर्यायक क्षणी आपले चातुर्य, हिम्मत, सामंजस्य, विवेक किती महत्वाचा आहे हे या पुस्तकातून समजते.
डिसिजन्स (कौशल्य ठाम निर्णय घेण्याच) हे पुस्तक तुम्हाला जीवनातील अनेक कठीण प्रसंगा मध्ये निर्णय घेण्याचे कौशल्य शिकवते. यात आरजी म्हणजे या पुस्तकातील महत्वाचे कॅरक्टर आहे जे तुम्हाला निर्णय घेण्यासाठी मदत करते. जे तुमचा मित्र, कुटुंबातील व्यक्ती, counseller, सखा अस कोणीही असू शकतो.
डॉ. राजेंद्र बर्वे यांनी डिसिजन्स या पुस्तका मध्ये सदतीस छोटे प्रसंग संवाद संवाद रूपाने सांगितले आहेत की जे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीना कधी तरी घडलेले आहेत. पहिला प्रसंग संवाद स्ट्रेस संदर्भात आहे. कामाचा असणार ताण आणि त्यातून होणारी चिडचिड. आरजी स्ट्रेस विषयी ह बदलणार घटक आणि आपला स्वभाव, व्यक्तिमत्व किंवा ताणाला प्रतिसादाच्या सवयी हा बदलणार घटक आहे. यात तणाव म्हणजे बाहेरची परिस्थिती आणी स्वभाव यांचा गुणाकार असतो. दुसऱ्या प्रसंगात टीव्ही सिरियलच्या फॅन्टसीत नकळत अनेक लोक गुरफटतात आणि सिरियल मधल्या कॅरक्टरच जीवन जगतात. त्या मूळ व्यक्ती इच्छे विरुद्ध आणी मुल्या विरुद्ध जाऊन कुटुंबात दुरावा निर्माण होतो. याविषयी यात आरजी टीव्ही सिरियलच्या फॅन्टसी बद्दल मार्गदर्शन केलेले दिसते. तिसरा प्रसंग संवाद हा सध्या भेडसावत असणार प्रश्न आहे म्हणजे तरुण लोकांचा विवाहा बद्दल चा confused असणारा दृष्टिकोण. करियर च्या मागे लागणाऱ्या तरुण पिढी लग्ना बद्दल निर्णय घेण्यात गोंधळलेली दिसते, या वार आरजी चा ‘शुभकार्यमे देरी कैसी?’ हा स्मार्ट डिसिजन यात आहे. चौथा प्रसंग संवाद हा शैक्षणिक क्षेत्रात आलेल्या अपयशा बद्दल चा आहे. औपचारिक शिक्षणात क्रमिक विषय शिकवतात मात्र जीवन शिक्षणाच्या नोट्स तिथे मिळत नाहीत. आलेल्या अपयशावर मात करण्याच्या अनुभवातून ते शिकायच असतं.
भीतीची लाट या प्रसंगात ते लोकांना वेगवेगळ्या प्रकारची भीती असते. यातून वेगवेगळे नकारात्मक विचार येतात. आपण चांगल्या आणि अचूक विचारांची पेरणी केली की, उत्तम भविष्य निपजते. भीतीची लाट आली की ती परतायची वाट पाहायची, श्वासावर लक्ष केंद्रित करायच, भीतीची लाट परतताना मनातल्या निगेटिव्ह विचारांचा कचराही घेऊन जाईल. ‘इमोशनली इंटेलिजन्ट’ या संवादात आपल लॉजिक बरोबर असल तरी भावनिक अस्थिरतेमुळे निर्णय घेता येत नाही, अचूक निर्णय घेऊनही मनाला आनंद मिळत नाही, कारण आपले विचार आणि भावना यांचा परफेक्ट मेळ असावा लागतो. माणसाचा आणि परिस्थितीचा भावनिक पातळीवरून विचार करावा लागतो. फक्त इटेलिजंट असून चालत नाही तर इमोशनली इटेलिजंट असावे लागते. ‘संभ्रमावस्था’ या प्रसंगात करियर निवडताना तीन कयू लक्षात घ्यावे लागतात आय कयू, इ कयू, पी कयू पर्सनॅलिटी कोशट, व्यक्तिमत्वाची जाण म्हणजे आपल्या आवडीचे काम करायला मिळाल की आपण हमखास यशस्वी होतो. म्हणजे आपला छंदच आपला व्यवसाय होतो. ‘सत्य स्वीकारण्याची हिंमत’ या प्रसंग संवादात, जागृत मनानं हिंमत दाखवली तर, आपल्या भीती, अस्वस्थतेचं मूळ स्वरूप ठामपणे स्वीकारलं की जादू केल्यासारख मन शांत होईल. मोकळ्या मनाने, व्यवहारिक पातळीवर विचार करून आपण महत्वाचे निर्णय घेऊ शकतो. मायलेकी या प्रसंगात मुलांना घडवताना, संसार करताना खूप ढवळा ढवळ होताना दिसते, त्यातून अनेक अडचणी निर्माण होतात त्या मूळे टी स्वावलंबीहोत नाहीत तसेच त्यांना लाइफ स्किल्स शिकता येत नाहीत. ही प्रोसेस प्रत्यक्ष मंडती शिवाय, मदतीशिवाय, प्रोत्साहनाने, देखरेखीखाली शिकायची असतात. मिस्टर राईट कोण? या प्रसंगात प्रेम ही भावना बंदिस्त आणी शिस्तबद्ध असत नाही याच भान प्रत्येकाने ठेवायला हवं, आपल्याला भेटलेला व्यक्ती, मिस्टर राइट आहे असं वाटतं, पण खरं परफेक्ट मिस्टर राइट असं कुणीच नसतं, म्हणून प्रत्येकाने माणसांना स्वीकारून त्यांच्या गूण दोषांना आपलस करून पुढे गेलं पाहिजे.
डिसिजन्स या पुस्तकामध्ये अनेक विषयावर संवाद आहेत जे आपल्याला स्ट्रेस कमी करण्यासाठी, ठाम निर्णय घेण्यासाठी, करिअर साठी, दिशा देण्यासाठी आयुष्यभर उपयोगी पडताते. अनेक उदहरणा दाखल मार्गदर्शन केलेले या पुस्तकात दिसते. हे पुस्तक तुम्हाला अनेक प्रसंगा मध्ये ठाम निर्णय घेण्यासाठी मदत करते.

Recommended Posts

The Undying Light

priyanka.naikwadi
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

priyanka.naikwadi
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More