Share

अजिंक्य मोहिते…. महाविद्यालयीन शिक्षणासाठी छोट्या गावातून मोठ्या शहरात आलेला तरुण. शहरातल्या प्रसिद्ध कृषिमहाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून पदवी प्राप्त करेपर्यंतचा अजिंक्यचा प्रवास. त्या प्रवासात त्याला भेटलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या व्यक्तिरेखा. प्रत्यक्ष जीवनाशी सांधेजोड नसलेली आपली वर्तमान शिक्षणपद्धती आणि तिचे वेगवेगळे भलेबुरे पैलू. अजिंक्यच्या रोजच्या आयुष्याला अन् त्यातील लहानमोठ्या घटनांना असलेलं सामाजिक अन् राजकीय अस्तर. या साऱ्याचा रंगीबेरंगी गोफ विणणारं प्रवाही चित्रण म्हणजे ही कादंबरी. एका संवेदनशील तरुणाच्या भावविश्वाचा टोकदार अन् धारदार वेध घेणाऱ्या दोन कादंबऱ्यांच्या मालिकेतील पहिली कादंबरी.

Related Posts

नटसम्राट

Nilesh Nagare
Share“नटसम्राट हे वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) लिखित मराठी नाटक आहे. हे नाटक महान नट सम्राटांच्या जीवनावर आधारित आहे. नाटकाच्या मुख्य पात्रांमध्ये...
Read More