Ingle Komal Shivhari, S. Y. M. Pharmacy, MVP’s College of Pharmacy, Nashik
कादंबरी: फकिरा लेखक: अण्णाभाऊ साठे
आण्णाभाऊ साठे यांनी लिहलेली एक उत्कृष्ठ कादंबरी.
फकिरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी एका सत्यघटनेवर लिहिली आहे. त्यांची शब्द रचना मराठी साहित्यात एका वेगळ्याच शैलीची जाणीव करून देते. भाऊंच लिखाण पाण्यासारखं नितळ, आपोआपच लोकांच्या मनात घर करून जाणारी साधीसरळ भाषा मनाला मोहून टाकते.
फकिरा’ कादंबरीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे सामाजिक एकीकरण, संस्कार, राष्ट्रधर्म, राजकीयव्यवस्था, प्रेम अशा मूल्यांची पेरणी करताना दिसतात. याचबरोबर दिनदलितांचे हीन जीवन, सहिष्णुता, लढवय्येपणा, राष्ट्रीय कर्तव्य या मूल्यांची ही शिकवण देतात म्हणून ‘फकिरा’ सामाजिक व राष्ट्रीय उदात्त व उन्नत भावनेने ओतप्रोत भरलेला लेख ठरतो.
ही कादंबरी असली तरी सत्यघटनेवर आधारित आहे म्हणून अण्णाभाऊंच्याच शब्दात सांगायचं म्हणजे त्यांनी कुठेही कल्पनेचे पंख लावून उड्डाण केलेले नाही .
कादंबरी वाचताना मी एखादा सिनेमा बघत आहे आभास मला होत होता. कादंबरीची शब्ब्दरचना इतकी सोपी आहे जवळपास प्रत्येक ओळ डोळ्यात मावत होती. असं वाटायचं कि आता पुस्तक संपवूनच उठाव मधेच सोडल्यामुळं पुढे काय होईल हा विचार करून माझं पूर्ण लक्ष त्याकडेच लागलेलं असायचं व रात्री कधी जाऊन एकदा मी वाचायला सुरवात करते असं मला होत असायचं.
शुद्र म्हणून हिनवलेल्या फकीरा नावाच्या पात्रावर हि कादंबरी सांगते. समाजामध्ये त्यावेळेस असलेल्या रूढी परंपरेवर हि पूर्ण कथा अधोरेखित केली असल्यामूळ त्याकाळात जे जे हाल या समाजाला सोसावे लागले व त्याकाळात घडत असलेल्या बऱ्याच अनिपेक्षित गोष्टी मला हे पुस्तक वाचल्यानंतर समजल्या. या समाजाला कस वाळीत टाकल गेल होत. त्यांना आपली जात काय आहे हे पण सांगणं म्हणजे चूक वाटत होती, जोगणी पळवून न्यायची प्रथा, लोकावरती होणार अन्याय अश्या बऱ्याच गोष्टी अगदी टोकापर्यंत समजल्या व याबाबतीत केलेलं लिखाणमनाच्या अगदी खोलपर्यंत रुजलं गेलं. फकिरा खरंच खूप रुबाबदार माणूस होता. सर्वच पात्र फकिरा, राधाआई, शंकररावपाटील, पंत, प्रांत, साळोजी, दौलती, फकिराच्या भाऊ, आजी सर्वच अगदी भरपूर आणि पुरेपूर मांडल्यासारखं वाटत कोणालाही भाऊंनी कमी लेखलं नाही.
अण्णाभाऊंची मला सगळ्यात जास्त आवडलेली कादंबरी म्हणजे ” फकिरा “.