Hyalij shubham shantaram
M.SC. II (Organic Chemistry )
MSG College Malegaon
“या पुस्तकात असे कळून येते की समाजात पेरलेलं जातीचे विष, पिढ्यानपिढ्या चालत आलेली भाऊबंदकी आणि श्री म्हणून समाजात पावलोपावली मिळणारी अवहेलना यातून जिद्दीच्या जोरावर पितृसत्ताक समाज व्यवस्थेच्या छातीवर पाय रूम उभ्या राहिलेल्या एका खंबी स्त्रीची, मनाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजे एक भाकर तीन चुली ही कादंबरी.
देवा झिंजाड यांची ही साहित्यकृती मनाला चटका लावते अंगाला शहारे उभे करते अशी ही देवाजींचा कादंबरी. ही देवा झिंजाड, विशेषता त्यांच्या आईच्या परवडीचं भयान वास्तव मांडणारी आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. तिचा काळ साधारण 1950 ते 1993 असा वाटतो. पण वाचताना प्रकर्षण जाणवत की, आजही स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीत फारसा बदल झालेला नाही. तेच विचार, तेच संस्कार, सगळं तेच. फक्त काळ, वेळ, दिवस आणि वर्ष सोडलं तर काहीच बदललेलं नाही.
मुलगी जन्माला आली म्हणून आजोबांनी दिलेला त्रास, बालविवाह, सासरी अतोनात छळ आणि महिन्याभरातच आलेलं विधवा पण अशा अनेक गोष्टी सहन कराव्या लागूनही, कधीही कोणापुढे हात न पसरता एकट्याने लढणारी या कादंबरीची नायिका, पारू या कादंबरीतून भेटते.
ज्यांनी तिला हिणवलं, तिची निंदा नालस्ती केली, त्या सगळ्यांना ती उलथवून लावते. पारू पोटासाठी, पोटच्या गोळ्यासाठी लढते. परिस्थिती कशीही असली, कितीही बिकट असली तरी रडायचं नाही, तर लढायचं हे पारू आपल्याला सांगत राहते. पोट भरायला माणूस काय काय करू शकतो त्यातही एकट्या बाईला काय काय भोगाव लागतं याचं ज्वलंत उदाहरण पारूच्या रूपाने या कादंबरी मधून आपल्याला दिसतं . या कादंबरीत बाईला किंमत किती आहे व तिला किती सहन करावा लागतं हे आपल्याला या कादंबरीतून माहित पडते.