केशवने त्याचा बेस्ट फ्रेंड सौरभसोबत एक इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सुरू केली आहे. हे दोन हौशी डिटेक्टिव्ह त्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारी आणखी एक केस यशस्वीपणे सोडवतील का? मग त्यांच्या मैत्रीचं काय होईल? ‘तुला प्रेरणा भेटली, तेव्हापासून माझा बेस्ट फ्रेंड हरवलाय,’ मी सौरभला सांगितलं. हाय, मी केशव, आणि माझा बेस्ट फ्रेंड, फ्लॅटमेट, सहकारी आणि बिझनेस पार्टनर सौरभ माझ्याशी बोलायला तयार नाहीये. कारण, मी त्याची आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची थट्टा केली. सौरभ आणि प्रेरणा लवकरच लग्न करणार आहेत. हे अरेन्ज्ड मॅरेज आहे. मात्र, लव्ह-मॅरेज केलेल्या जोडप्यांपेक्षाही जास्त गोडगोड रोमान्स त्यांच्यात सुरू असतो. करवा चौथच्या दिवशी तिने त्याच्यासाठी उपवास केला. दिवसभर तिने काही खाल्लं नाही. संध्याकाळी, तिने त्याला कॉल केला आणि उपवास सोडण्यासाठी ती गच्चीवर चंद्राची आणि सौरभची वाट पाहात थांबली. एक्साइट झालेला सौरभ तिच्या तिमजली घराच्या जिन्यावरून धावतच वर गेला. पण जेव्हा तो पोचला, तेव्हा… वेलकम टुवन अरेन्ज्ड मर्डर, भारतातील सर्वाधिक खपाच्या लेखकाची एक विलक्षण वेधक थरारकथा. प्रेम, मैत्री, परिवार आणि गुन्हा यांची ही कथा तुमचं मनोरंजन करेल आणि तुम्हाला खिळवून ठेवेल.
Previous Post
२०२४ भाजपा जिंकली कशी Related Posts
ShareNida Shaikh, First Year B Arch, MET’s School of Architecture & Interior Design Govardhan, Nashik The Book “Twelfth Fail” is...
Shareग्रंथ परीक्षण : दुबे प्रिया रमेश एम. ए अर्थाशास्र विभाग लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नाशिक कर्मवीर...
Share ‘द अल्केमिस्ट’ ही बघायला गेलं तर एक सरळसाधी गोष्ट. सॅन डियागो नावाच्या मेंढपाळाची. तो एका छोट्याशा खेड्यात राहत असतो....
