Dr. Rupali Phule
Sinhgad Institute of Technology, Kusgaon (bk), Lonavala
असामान्य व्यक्तिमत्व असताना सुद्धा साधं आयुष्य कसे जगता येते याचा त्यांनी आदर्श परिपाठ घालून दिला. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो.
हे पुस्तक इंटरेस्टिंग आहेच त्याचबरोबर ते प्रचंड प्रेरणादायी आहे. आपण आयुष्यात निसर्गाशी एकरूप होता होता नेमकं कसं जगावं याच ते उत्तम उदाहरण आहे. हे पुस्तक वाचल्यानांतर निसर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन निश्चितपणे बदलू शकतो. या पुस्तकाची मराठी पुस्तकविश्वात एक विशेष अशी वेगळी ओळख बनलेली आहे….
पुस्तकाची भाषा एकदम साधीसोपी आहे. वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. पट्टीचा वाचक अगदी १-२ दिवसात हे पुस्तक वाचून काढू शकतो. पुस्तकात ठिकठिकाणी त्या त्या प्रसंगाचे वर्णन करणारी चित्र आहेत. वाचत असताना आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळातील चित्र जसच तस उभं राहत. कार्व्हर यांचा बालपणातील संघर्ष आणि हलाखीचे जीवन याबद्दल वाचत असताना आपण भावनिक होतो आणि नकळत आपल्या डोळ्यात पाणी तरळतं…
चिकाटी, मेहनत आणि सतत शिकण्याची धडपड माणसाला कशी महान पदावर नेते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कार्व्हर यांचं जीवन. एकदा वाचून मन न भरणारी ही कादंबरी नक्की वाचा.