Share

कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण हे मानवी जीवनाच्या समृद्धीचे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. कार्व्हर यांचा जन्म १८६४चा, लहानपणापासूनच निसर्गाच्या सहवासात रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतलं. यशाची एक एक पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी नातं घट्ट राहिलं. अनेक मानसन्मान प्राप्त झाले असलेल्या कार्व्हर यांची जीवनगाथा किंवा जीवनचरित्र लेखिका वीणा गवाणकर यांनी एक होता कार्व्हर मध्ये लिहिले आहे. प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.
कार्व्हर यांचे जीवनचरित्र जगण्याची प्रेरणा देते, एक होता कार्व्हर वाचत असताना आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळातील चित्र जसच तस उभं राहत. कार्व्हर यांचा बालपणातील संघर्ष आणि आयुष्यातील धडपड ,सातत्य ,प्रयत्न, शिकण्याची ओढ आणि यशस्वी होणे हे सर्व साध्या सोप्या भाषेत वीणा गवाणकर यांनी घटना ,गोष्टी यांच्या माध्यमातून तर उदाहरणातून ईतके सुंदर पध्दतीने मांडले आहे. पुन्हा पुन्हा वाचतच रहावे असी कादंबरी आणि जिवनचरित्रा पैकी एक होता कार्व्हर हे माझ्या वाचनात वरच्या स्थानी आहे. आपण आयुष्यात निसर्गाशी एकरूप होता होता नेमकं कसं जगावं याच ते उत्तम उदाहरण आहे. हे पुस्तक वाचल्यानांतर निसर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन निश्चितपणे बदलू शकतो. या पुस्तकात ठिकठिकाणी त्या त्या प्रसंगाचे वर्णन करणारी चित्र आहेत. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. ज्या माणसाच्या आयुष्यात बालपणापासून संघर्ष आहे तो माणूस न हारता सतत प्रयत्नशील आणि कार्यरत राहतो ,ज्याला विद्यापीठात प्रवेश नाकारला जातो तो पुढे प्राध्यापक आणि विभागप्रमुख बनतो. कृष्णवर्णीयांच्या उत्थानासाठी शेतीविषयक अभ्यास, संशोधन करून अनेक प्रयोग करतो,नवे। शोध लावतो ,नवे वान तयार करतो पुढे त्यांची ओळख कृषी शास्रज्ञ म्हणून निर्माण होते. कार्व्हर यांनी समाजबांधवांसाठी अनेक संस्था ची स्थापना केली. या सगळ्या प्रवासात त्याला पावलोपावली संकटं येत असतात पण तो जिद्द सोडत नाही. तो चिकाटीने मेहनत करून सगळ्या परस्तिथीसोबत लढत असतो. गुलाम चोरणारया टोळीने ज्याची आईम्हणजे मेरी पळवून नेहली त्या मेरीचे हे। कुपोषित बालक म्हणजेच जॉर्ज कार्व्हर. ज्या ठिकाणी मोजेस कार्व्हर यांचेकडे मेरी आणि जॉर्ज गुलाम म्हणून होते त्या। मोजेसबाबनी कार्व्हर हे नाव त्या बालकाला दिले, त्याचा संभाळ केला आणि गुलामगिरीतून मुक्त केले. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्याचा सांभाळ करतात.
खूपच अशक्त आणि हाडकुळा असणाऱ्या जॉर्जला लहानपणी खूपच कमी शब्द बोलता यायचे, जवळपास तो मुकाच होता. या लहानग्या जॉर्जचा मित्रपरिवार मुलखावेगळा होता. रानावनातील झाडझुडुपं, पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातील छोटे मासे हाच त्याचा गोतावळा. त्याला लहानपणी अनेक प्रश्न पडत असत जसे की झाडांना हिरवा रंग कसा येतो? सकाळची कोवळी किरणं दुपारी कुठे जातात? …एकदा त्याने पालापाचोला, गवत, दोरा आणि सूत याचा वापर करून इतकं सुरेख आणि हुबेहूब घरटं बनवलं कि सुझनबाईंना लोकांना शपथ घेऊन सांगावं लागायचं की हे आमच्या मुक्या पोरानेच बनवल आहे. जॉर्जची निर्सगाशी इतकी घट्ट मैत्री जमली होती की बागेतील फुले मुरझली किंवा झाडांची वाढ खुंटली की ते जॉर्ज ला लगेच समजायचं. मग जॉर्ज त्या झाडांची जागा बदलणे, त्यांना सूर्यप्रकाश देणे, खतपाणी घालणे असं करून तो कोणाचीही बाग फुलवून द्यायचा. डायमंड ग्रोव्ह मधला तो छोटा पण अतिशय कुशल माळी होता.

Recommended Posts

उपरा

Dattatray Sonawane
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Dattatray Sonawane
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More