महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनीमय आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाचा विलंबास पतिबंध अधिनियम, २००५ या सर्व शासनाच्या कायदयाचे, नियम व शासकीय आदेशांचे सटीप स्पष्टीकरण या पुस्तकात पहावयास भेटते. पारदर्शकता, उत्तरदायित्व व लोक सहभाग यांच्या त्रिवेणी संगम माहिती अधिकारात आहे
महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम, २००२ बाबत राज्यभर माहिती व्हावी, अधिकाराची जागृती निर्माण व्हावी यासाठी हे पुस्तक लिहिले गेले. ‘यशदा’ चे निबंधक श्री शेखर गायकवाड व सार्वजनिक धोरण केंद्राचे. संचालक श्री प्रल्हाद कचरे यांच्या अथक प्रयत्नातून हे सर्वसमावेशक पुस्तक साकारले गेले.
माहिती अधिकाराची गीता म्हणजे हे पुस्तक आहे. माहिती अधिकार कायदा हा नागरिकाभिमुख कायदा असल्यामुळे भारत सरकारने “माहितीचा अधिकार कायदा 2005” लागू केला आहे. कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहितीचा प्रवेश सुरक्षित करण्यासाठी नागरिकांना माहितीच्या अधिकाराची व्यावहारिक व्यवस्था स्थापित करणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे.