कोणी एकेकाळी सकाळी ‘सकाळ’ सारख्या वर्तमानपत्राची वाट चिंटू चे कार्टून वाचण्यासाठी आबाल-वृद्धांकडून पाहिली जायची. त्याच काळात टाइम्स ऑफ इंडिया चा कॉमन मॅन देखील खूपच प्रसिद्ध होता. भारतातल्या विविधतेचे प्रतिनिधित्व करणारी बरीच माणसे व्यंगचित्रांच्या रूपातून आर. के. लक्ष्मण काढायला लागायची. परंतु वेळेच्या मर्यादेमुळे आर. के. लक्ष्मण हळूहळू जमावातील एकेक माणूस कमी करू लागले शेवटी उरला तो आपला कॉमन मॅन…. सर्वसामान्य भारतीय माणसाचं त्याच्या आयुष्यातील समस्यांच आणि त्याच्या आशावादाचदेखील प्रतिनिधित्व करणारा कॉमन मॅन वाचण्यासाठी देखील टाइम्स ऑफ इंडिया ची वाट बघितली जायची. लक्ष्मण रेषा या आपल्या आत्मचरित्रात आर. के.लक्ष्मण यांनी त्यांचे बालपण, त्यांची भावंडे, आई बाबा, शिक्षण, तारुण्य, नोकरीची शोधाशोध,टाइम्स ऑफ इंडिया मधील त्यांची कारकीर्द या सर्व गोष्टींविषयी अतिशय विस्तृत पद्धतीने आपला जीवन प्रवास वाचकांसमोर उलगडला आहे.हे त्याचं आत्मचरित्र व्यंग्यचित्रांइतकाच खुसखुशीत आणि वाचनीय आहे
Previous Post
Ikigai: The Japanese Secret to a Long and Happy Life Next Post
The Story of My Life Related Posts
Share The Red-Headed League is one of Sir Arthur Conan Doyle’s most intriguing Sherlock Holmes stories, first published in 1891....
ShareThe book “I Am Prepared to Die” by Nelson Mandela, which features the text of his famous 1964 Rivonia Trial...
Shareया प्रकारच्या विशाल समझदारीकडं नेणाऱ्या काही दिशा ही कादंबरी प्रस्फुटित करते. स्वातंत्र्योत्तर मराठी ग्रामसमाजातील बदलाचा, त्याच्या विषयीच्या आस्थेच्या पर्यावरणाचा व...
