MAIND AKSHADA VASANT, MGVs LOKNETE VYNKTRAO HIRAY ARTS, SCIENCE AND COMMERCE COLLEGE, PANCHVATI NASHIK- 03
कोण होते सिंधु लोक? हे पुस्तक डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनी लिहले. हे पुस्तक 27 मार्च 2019 रोजी राजहंस प्रकाशानाद्वारे प्रकाशित केले गेले. या पुस्तकाचे संपादन डॉ. अत्रे शुभांगना यांनी केले. सदर पुस्तक हे 123 पानांचं असून यात सात प्रकरणाचा समावेश आहे यात सिंधू लोकांनी आर्य, कलियुगातील संकट, सिंधू भाषा सिंधू, संस्कृतीचा वारसा, पूर्व इतिहास- मनु ते उदयन, उपसंहार आणि संदर्भसूची अशाप्रकारे प्रकरणांची मांडणी केलेली आहे. या पुस्तकाची प्रस्तावना डॉ. शुभंगना अत्रे यांनी लिहली आहे . या पुस्तकातिल मुख्य विषय हा हडप्पा संस्कृति किंवा सिंधु संस्कृति आणि आर्य संस्कृति, ह्या विषयीचे अनेक इतिहासकरांमधील मंतमातांतरे ही लेखकाने या पुस्तकाद्वारे मांडले आहेत .पुस्तकाची मांडणी करताना पुरातत्त्वच्या आधारे केलेली आहे .
लेखक मधुकर केशव ढवळीकर हे भारतीय पुरातत्वज्ञ होते प्राचीन भारतीय कलेचे व भारत विद्येच्याअभ्यासक होते त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील कॉलेजमध्ये झाले पदवी मिळाल्यावर ढवळीकरांनी काही काळ पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या संस्थेत काम केले. त्यानंतर 1953 मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वक्षणाच्या पुणे कार्यालयात प्रशासकीय सहाय्यक पदावर रुजू झाले. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम. ए .पूर्ण केले. प्राध्यापक ह. धी. संकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1964 मध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली. डॉक्टरेट साठी त्यांनी अजिंठा चित्राच्या सांस्कृतिक अभ्यास हा विषय निवडून तो पूर्ण केला त्यांची कोण होते सिंधू लोक या पुस्तकांशिवाय “ सांची व कल्चरल स्टडी आणि अजिंठा, कल्चरल स्टडी मास्टर पिसेस ऑफ इंडियन टेराकोटल्स, मास्टर पिसेस ऑफ राष्ट्रकूट आर्ट लेट ऑफ वेस्टन इंडिया एलोरा आणि कल्चरल हेरिटेज ऑफ मुंबई ही त्यांची इतर महत्त्वाची पुस्तकं आहेत”. पृष्ठ क्रमांक तेरावर लेखक रमेशचंद्र मुजुमदार यांचे मत मांडतात ते पुढील प्रमाणे भारताच्या प्राचीन इतिहासाची एक चमत्कारिक बाबही की भरपूर पुरातत्व पुरावे उपलब्ध असलेल्या लोकांची लिखित माहिती अजिबात उपलब्ध नाही, याउलट गडगंज साहितीक उपलब्ध असलेल्या लोकांसंबंधीचा पुरातत्व पुरावा अजिबात उपलब्ध नाहीत. यावर लेखकांचे मत असे सिंधू संस्कृतीची लोकांना लिहिण्याची कला अवगत होती परंतु त्यांची लिपी वाचताना आल्यानं त्याचा व साहितीक पुरावा उपलब्ध नाही परंतु पुरातत्व पुरावा उपलब्ध आहे. वैदिक संस्कृतीचा साहितीक पुरावे उपलब्ध आहेत, पण पुरातत्व नाही याउलट पृष्ठ क्रमांक 117 वरील निष्कर्षात लेखक म्हणतात साहितीक उल्लेख आणि त्याला उपोदबलक पुरातत्व पुरावा तो उपलब्ध होतो .
लोखंडाचा ऋग्वेदात उल्लेख नाही. ऋग्वेदात यासाठी अयस हा शब्द आहे लोखंडाचा वापर केव्हापासून सुरू झाला ही एक इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. याविषयी पुस्तकात सविस्तर माहिती दिलेली नाही याविषयी सविस्तर चर्चा गो. ब. देगलूरकर यांच्या प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती या पुस्तकातून मिळते .याशिवाय लोखंडाचा उल्लेख ऋग्वेदात नाही असे ढवळीकर यांचे मत आहे पण जर कुलकर्णी. अ.रा यांचे प्राचीन भारत संस्कृती आणि इतिहास या पुस्तकात ते म्हणतात ऋग्वेदात लोहाचा उल्लेख आहे. अ.रा .कुलकर्णी यांच्या या मताचा आढावा लेखकांनी घेतलेला दिसत नाही. व्यापार विषयी विशेष चर्चा या पुस्तकात केलेली दिसत नाही अ.रा. कुलकर्णी यांच्या मताप्रमाणे सिंधू संस्कृती ही व्यापार उदीमांवर विशेष भर देणारी होती. यावरून सिंधू संस्कृतीचे व्यापरावरील महत्त्व दिसून येते. पण प्रस्तुत पुस्तकात लेखकांनी व्यापाराविषयी भाष्य केलेली दिसत नाही.सोन, चांदी, या धातूच्या माहिती व त्यांचा वापर विषय माहिती प्रस्तुत पुस्तकात उपलब्ध नाही. याविषयी विवरण डी.एन. झा यांच्या प्राचीन भारत एकरूप रेषा या पुस्तकात मिळते.कोण होते सिंधु लोक ? ही पुस्तक मधुकर केशव ढवळीकर , यांनी सिंधु आणि आर्य लोक यांच्या वरील वादंग, विविध तज्ञांचे मते अभ्यासून पुस्तकात त्याची मांडणी केलेली आहे , सदर पुस्तक हे, सिंधु लोक व आर्य त्यांची संस्कृति, काळ ,भाषा इत्यादि मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचे पुस्तक आहे , सिंधु संस्कृतीचा ह्रास कसा झाला , याबद्दल लेखकांनी विवध मते खोडून टाकल्याचे दिसून येतात , विद्वानांच्या मताचा आधार घेऊन त्यांनी निष्कर्ष मांडलेले दिसतात . या पुस्तकाच्या काही मर्यादा ही दिसून येतात , यावरून असा निष्कर्ष काढता येतो की सदर पुस्तक हे आर्य आणि सिंधु संस्कृति समजून घेण्यास महत्वाचे पुस्तक आहे , लेखकांनी ठोस पुराव्यांच्या आधारे सिंधु आणि आर्य यांबाबत असणारे विवध मते खोडून टाकलेली दिसतात , आणि सिंधु लोक आणि आर्य एकच असल्याचे निष्कर्ष ते मांडतात , पण इतर ही काही अभ्यासकांच्या मतांचा विचार सदर पुस्तकात झालेला दिसून येत नाही . ही या पुस्तकची मर्यादा दिसून येते