Dr Parkhi Ashwini Rajesh, Asst. Professor (ash.parkhi@gmail.com) Marathwada Mitra Mandals College of Commerce
है पुस्तक तसे खूप वर्षांपूर्वी लिहिले गेले आहे. १९७१ ला ह्याची पहिली आवृत्ती बाजारात आली. ह्याचा विषय भीम हि व्यक्ती रेखा ह्यामुळे मी ह्याच्या कडे आकर्षित झाले. महाभारत हा असा ग्रंथ आहे कि जेवढ्यावेळेस आपण वाचू तेवढे ते उलगडत जाते . महाभारत वर लिहिले पण खूप गेले आहे व अजून जाते . त्यातील प्रसिद्ध व्यक्ती रेखा जसे कृष्ण , कारण , दुर्योधन , भीष्म पितामह , दुर्योधन, द्रौपदी , अर्जुन ह्यांच्यावर खूप लिहिले गेले , वाचनात आले . पण भीम
ह्यांच्यावर खूप कमी लिहिले गेले ज्यामुळे मी हे पुस्तक हातात घेतले.
सारांश : लेखकाने भीम ह्याची व्यक्ती रेखा महाभारतातील एक एक प्रसंग नुसार उलगडली आहे . लेखकाने भीम कसा बहुतेक लेखना मध्ये बलदंड , बुद्धीने कमी , अति विशाल असा रंगवला आहे , पण ह्या पुस्तकामध्ये लेखकाने असे महिणतले आहे कि भीम हा गोरा पान, रेखीव शरीराचा , देखणा व अत्यंत तेजसवी व सुंदर असा होता. ह्या साठी त्यांनी हिडिंबा त्याच्या ह्या रूपावर भाळली व ज्याला ती भक्षक म्हणून बघत होती त्याचीच तिने भार्या होण्याचे ठरवले. ह्यावरून भीम किती देखणा होता हेय सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
भीम हा तल्लख बुद्धीचा होता व प्रसंगाचे गांभीर्य आकलन करण्याची शक्ती दिसून येते. भीमाचे विविध पराक्रम जसे कर्ण व भीम संघर्ष , भीम दुर्योधन संघर्ष , भीम द्रोणाचार्य युद्ध हेय विस्तृत पणे लिहून भीमाची शौर्यगाथा सांगितली आहे. भीमाने बलदंड बकासुर, जातसुर ह्यांचा कसा अंत केला ह्यांनी भीमाची व्यक्तिरेखा अजून सुंदर बनवते .
कृष्ण हा पांडवांच्या जीवनात आल्यावर भीमाने किती पराक्रम केले व त्यात कृष्णाचा भाग किती हे पण लिहिले आहे. जसे कीटक वाढ , जटासुर ह्याचा वध, कुबेराचा पराभव , भीष्म पराभव .भीमाने कायम सगळ्या पांडवांचे रक्षण केले आहे .
पुढे ह्या पुस्तकात महाभारत चा काळ कुठला होता व त्याचे गणित विस्तृत पणे मांडले आहे , व महाभारत युद्धाची नक्की तारीख मांडायचा प्रयत्न केला आहे. कलयुग व त्याचे गणित हे पण मांडायचा प्रयत्न केला आहे .
निष्कर्ष ; हे पुस्तक मला खूप आवडले आहे त्यांच्या विषयाची मांडणी खूप चांगल्या रीतीने केली आहे. भीम ह्या कसा सयंभू होता , किती शूर व कर्तृत्वान होता,व त्या मानाने कसा उपेक्षित राहिला हे मांडायचा प्रयत्ने केला आहे. महाभारतातला अजून एक वेगळा पैलू समाजाला व ह्या आपल्या ग्रंथ समजून घेण्याचा प्रयत्न ह्या पुस्तका वाचून मी केला .
लेखक हे पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्यांनी पुढे पुस्तकात कुंती हिला हि पाच मुले कशी झाली ह्याचा हि अभ्यास मांडला आहे. जसे कर्ण हा सूर्यापासून झालेला कुंती पुत्र आहे, तर वैज्ञानिक दुष्टी कोनातून कुंती ला हि गर्भ धारणा कशी झाली असेल हेय मांडले आहे. पुस्तकाचा आशय लक्षत घेऊन मला भीमाची व्यक्तिरेखा समजण्यास खूप मदत झाली आहे.