ह्या कथा संग्रहात १५ लघुकथा आहेत. ह्या कथा लहान असल्या तरी त्यात एक चांगला आशय आहे. ह्या कथा वाचताना विषय आपल्या परिचयाचा वाटतो कारण बरेच वेळा ह्या कथानकाचे आपण साक्षीदार असतो किवा आपल्या आजूबाजूला हि कथा घडलेली असते. पण कथेच्या शेवटी नकळतपणे एखादा सल्ला किवा आशय हे कथानक देवून जाते व आपण भानावर येतो.
खरेतर प्रत्येक कथेवर काही भाष्य करता येईल पण तुमचा पुस्तक वाचण्याचा आनंद कमी होईल म्हणून मी हा मोह टाळत आहे.