Book Reviewed by MOHAN BHAUSHAEB PAWAR (Clerk)
Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College
Shirsondi, Tal. Malegaon
श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अतिशय उत्कृष्ट
कादंबरी आहे. शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनकाल यात समाविष्ट केला आहे.
यातून आपल्याला जवळपास पन्नास वर्षाच्या ऐतिहासिक कालखंडातील घटना
कळतात तसेच राजांच्या खासगी जीवनाबद्दल सुद्धा माहिती मिळते. त्यावेळची
वेशभूषा, वातावरण, सामाजिक काळ, रिती रिवाज याचे वर्णन लेखकाने अनेक
ऐतिहासिक शब्द वापरून जिवंत केले आहेत. राजांनी अनेकांना "त्या काळच्या
भाषेत" लिहिलेली पत्रे लेखकाने जशीच्या तशी दिलेली आहेत त्यामुळे वाचतांना एक
वेगळीच जाणीव आणि वातावरणनिर्मिती होते. या कादंबरीचे एकूण अकरा भाग आहेत
आणि प्रत्येक भागात अनेक प्रकरणं आहेत. पूर्ण कादंबरीत कुठेही घटनांच्या तारखा आणि
साल न दिल्याने वाचणे सुसह्य होते. अन्यथा पाठ्यक्रमातील इतिहासाचे पुस्तक वाचतो असे
वाटत राहिले असते. पुस्तकाच्या शेवटी प्रत्येक भागानुसार तारीखवार घटनाक्रम दिलेला
आहेच. त्यामुळे गरज पडल्यास तो अधून मधून संदर्भासाठी बघता येतो. रणजीत देसाई यांनी
आपल्या लेखणीतून संपूर्ण ऐतिहासिक कालखंड उल्लेख केला आहे.