Name of the Student :- Shreya Mohite
Name of the College :- Ness Wadia College of Commerce Pune
छावा
संभाजी राजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजी महाराज हे शिवजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्रज्याचे दूसरे छत्रपती होते त्यांचा जीवनकाळ जन्मापासूनच बिकट आणि अतिशय कठीण होता पण तरीही सर्व परिस्थितीशी सामना करत हे शुर पुरुष अवघ्या महाराष्ट्रचे प्रेरणास्थान बनले.
शंभुराजे जन्मताच सईबाईच्या निधनामुळे आईच्या दुधास मूकले आणि त्यांची दूध आई बनल्या पुण्याजवळील कापूरहोळ गावाची धाराऊ संभाजीराजे अत्यंत चाणाक्ष असल्यामुळे त्यांनी राजकारणातील बारकावे भराभरा आत्मसात केले. लहान वयातच काही घटना मळे त्यांना मोघलांकडे राहावे लागले, अवघ्या ९ व्या वर्षी आग्याहुन सुटकेचा थरार त्यांनी अनुभवचा सुरक्षिततेसाठी पत्सरवण्यात आलेल्या स्वतःचा निधनाच्या खोव्या अफवेमुळे त्यांना बराच काळ भूमिगत राहावे लागले. इ.स १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणात तरबेज झाले होते.
राज्याभिषेकानंतर १२ दिवसांत झालेल्या जिजाबाईच्या निधना मुळे संभाजीराजे मायेने पोरके झाले. शिवाजी महराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले असताना, अण्णाजी दत्तों, सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. हेच ते कारण होते ज्यामुळे तरुण संभाजीराजांची दरबारातील अनुभवी प्रधान मंडळाशी मतभेद होऊ लागले. यामुळे पुढे वेगवेगळी कारणे देत सोयरबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा अपप्रचार सुरू केला.
उत्तर दिग्विजय मोहीमे साठी छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगझेबचा मुलगा, सेहजादा मुअजम याला आपल्या बाजूने केले. या साठीने गनिमीकाव्याने दिलेरखानाच्या छावणीत जाऊन राहिले. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांची ताईसाहेब राणु अक्का ही होत्या. 3 एप्रिल १६८० ला शिवाजी महाराजही त्यांना सोडून गेले. महाराजांच्या संमिम क्षणी सोयराबाईकडून केले गेलेले कटकारस्थाने वाचुन तर वाचक स्तब्ध होऊन जातात. नंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले. पण सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली आणि १६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. या सर्व सुख-दुखांच्या प्रसंगात शंभुपत्नी, येसुबाईनी दिलेल्या साथीचे सुंदर वर्णन छावा मध्ये केले आहे.
संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने खूप लढे दिले, मराठ्यांच्या मुंझारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजीराजांच्या कारकिर्दीत झाली. संभाजीराजांनी केलेल्या लढायांचे पुस्तकात केलेले वर्णन वाचकाना प्रेरित करतात.
गणेजी शिर्के, संभाजीराजांचे सख्खे मेहुणे हे काही गावांच्या वतनांसाठी औरंगजेबाचा सामील झाचे आणि सरदार मुकर्रबखान यांने केलेल्या संगमेश्वरावराच्या हल्ल्यात संभाजी राजे आपले प्रिय मित्र’ कवी कलश सहित पकडले गेले आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. संभाजीराजांचा मृत्यूपर्यंतच्या ४० दिवसांचे अतिशय हृदय पिळवून टाकणारे वर्णन असलेली शेवटची 20 पाने वाचताना वाचकाच्या मनात संताप आणि डोळ्यांत अश्रू भरून येतात. ही निघृण हत्या मार्च ११, इ. सा १६८९ रोजी भीमा- इंद्रायणी नदीच्या संगमावरीत्य तुळापुर येथे करण्यात आली. पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंजेबासमोर नमले नाहीत आणि यातच औरंजेबाचा पराभव सिद्ध झाल्या.
छात्रम्ती संभाजीराजे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. संभाजीराजांचे सल्यागार / मित्र असलेले कवि कलश यांनी मरेपर्यंत आणि कठीण प्रवासातही संभाजीराजाची साथ सोडली नाही.
लेखकाने संभाजीराजांच्या शौर्याला, त्यागाला पुरेपुर न्याय दिला आहे. तत्कालीन स्वराज्याच वर्णन अप्रतिम प्रद्धतीने केले आहे. पुस्तकाचा विषय, भाषेच लहेजा, प्रसंगवर्णन, पराक्रम, त्याग, चेखकाचा अभ्यास आणि निष्ठा या सर्व गोष्टींचा सरासर विचार करता धावा हे मराठी साहित्यातील शिरोमणी आहे. म्हणूनच छावा एकदातरी जरूर वाचावे आणि हा इतिहास इतरापर्यंत देखील पोचवावा.
धन्यवाद ।