Share

Book Reviewed : Bhoye Namisha Hiraman, S.Y.B.A ( History Department )MGVs LOKNETE VYNKTRAO HIRAY ARTS, SCIENCE AND COMMERCE COLLEGE, PANCHVATI NASHIK- 03
प्रस्तावना
1972 गुरुद्वादशी होती छाव्या च्या लिखाणाला प्रारंभ करण्यापूर्वी लेखकाने त्या सुप्रभाती स्नानादिविधी आटपून पूजेला बसला होता नुकताच सहकुटुंब तुळजापूरला जाऊन जगदंबेचे दर्शन घेऊन आला असल्यामुळे मिटल्या डोळ्यांसमोर अष्टभुजा जगदंबेची मूर्ती तरळत होती या कथेचा नायक आहे संभाजी विवाद्य, हात घालणाऱ्याला अनेक वळनांनी फरपटत नेणारा. कै. आचार्य अत्र्यांनी मुंबईचे एका समारंभ नंतर विचारल्याचा आठवतं शिवाजीराव या तुमच्या कलाकृतीत संभाजीला शिवाजी पेक्षा मोठा तर करणार नाही ना मी नम्रपणे आचार्यांना सांगितल्याचा आठवतं माझ्या कथेचे नाव छावा आहे.
सारांश
छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांसारखेच थोर राज्यकर्ते होते त्यांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावरती झाला संभाजी महाराजांना जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी सईबाईंचे निधन झाले संभाजी महाराजांना जिजाबाईंनी आईचे प्रेम दिल की त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवून संभाजी महाराज मोठे झाले. आपल्या पित्याने स्थापन केलेले स्वराज्य टिकवण्यासाठी संभाजी महाराज अतोनात झटत होते एक दोन नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारे मराठ्यांच्या इतिहासातील असे एकमेव सेनापती संभाजी महाराज होऊन गेले. संभाजी महाराजांना अनेक कौशल्य अवगत होते ते कविता सुद्धा छान लिहायचे बुधभूषण या काव्याची रचना सुद्धा त्यांनी केली आहे. राज वस्त्र परिधान केलेले कवी मन मृत्यूलाही कसे सामोरे जाते हे या छाव्याने सर्वांना दाखवून दिले आहे.

निष्कर्ष
छावा ही कादंबरी संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व सांगणारी कादंबरी आहे संभाजी महाराजांना अनेक कौशल्य अवगत होती त्या कौशल्यांचा उल्लेख या कादंबरीत आहे. ही कादंबरी सर्वांना आवडणारी आहे संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये अनेक चढ-उतार आले परंतु त्यांनी सर्वांवर मात करून ते पुढे जात राहिले त्यांच्याकडील हेच चांगले गुण आपल्याला या कादंबरीतून घ्यायची आहेत. त्याचा आपल्याला चांगला उपयोग होईल

Related Posts

दलित लोकांवर होणारा अत्याचार व अन्याय यावर लेखक यांनी या पुस्तकामध्ये वाचा फोडली.

Dr. Sambhaji Vyalij
Shareकविता पांडुरंग चौरे (विद्यार्थी ) “उपल्या” ही केवळ एक साहित्यकृती नाही तर एक सामाजिक दस्तऐवज आहे. या कादंबरीतून शरणकुमार लिंबाळे...
Read More

तरुणांसाठी ईकिगाई

Dr. Sambhaji Vyalij
Shareपुस्तक परीक्षण: शेवाळे शितल वाल्मिक, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक-०३ पुस्तक...
Read More