छावा (कादंबरी)- शिवाजी सावंत यांनी 1980 मध्ये प्रकाशित झालेली त्यांची छावा ही कादंबरी छत्रपती संभाजींच्या जीवनावर आधारित आहे- 1995 पासून त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवले 1983 च्या बडोदा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते- केवळ ऐतिहासिक लेखकच नव्हते तर राजकीय लेखकही होते
संभाजी राजांचा जन्म 14 मे इ स- 1957 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला- संभाजी महाराज हे शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते- पण तरीही त्यांचा जीवन काळ अतिशय कठीण होता- ते जन्मापासूनच बिकट परिस्थितीत अडकत गेले- सर्व परिस्थीतींशी सामना करत हे शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनले- 16 जानेवारी इ स- 1681 रोजी संभाजीरांचा राज्याभिषेक झाला या सर्व सुख-दुखांच्या प्रसंगात शंभूपत्नी येसूबाईनी दिलेल्या साथिचे सुंदर वर्णन छावा मध्ये केले आहे संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने खूप लुढे दिले, मराठ्यांच्या झुंझारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजीराजांच्या कारकिर्दीत झाली. संभाजीराजांनी केलेल्या लढायांची पुस्तकात केलेले वर्णन वाचकाना प्रेरित करतात. संभाजीराजांचा मृत्यूपूर्वीच्या 40 दिवसांचे अतिशय हृदय पिळवून टाकणारे वर्णन असलेली शेवटची 20 पाने वाचताना वाचकाच्या मनात संताप आणि डोळ्यात अश्रू भरून येतात. ही निघृण हत्या मार्च 11 इ.स.1689 रोजी भीमा इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे करण्यात आली. पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंगजेबासमोर नमले नाहीत. आणि यातच औरंजेबाचा पराभव सिध्द झाला. छत्रपती संभाजीराजे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. संभाजीराजांचे सल्लागार. मित्र असलेले कवी कलश यांनी मरेपर्यंत आणि कठीण प्रवासातही संभाजी राजांची साथ सोडली काही.