विद्या प्रतिष्ठानचे
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विद्यानगरी बारामती
प्राध्यापकाचे नाव डॉ. भीमराव मोरे
वाणिज्य शाखा
पुस्तकाचे नाव जनाधार डॉक्टर शरद पवार १२-१२-१२
लेखक सुभाष शिंदे
सुभाष शिंदे यांनी संकलन केलेल्या पुस्तकातील पान नंबर 35 वर भारताचे कृषिमंत्री माननीय नामदार डॉक्टर शरद पवार यांनी नवी दिल्ली येथील त्यांच्या सहा जनपद या निवासस्थानी दिनांक पाच डिसेंबर 2012 रोजी एक खास मुलाखत दिली होती की ज्या मुलाखतीमध्ये इंदू मिल बाबत आणि विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत सखोल आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी मांडणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केली होती
त्यात ते असे म्हणतात
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी ही देशातल्या आंबेडकरवादीच नव्हे तर आंबेडकरांच्या बद्दल आस्था असलेल्या अनेक विविध घटकांना एक असता वाटणारे ठिकाण आहे तिथे हजारोंच्या संख्येने लोक येतात माजी खात्री आहे की आज उद्या या ठिकाणी कित्येक लाख लोक येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष योगदान या देशाच्या घटना निर्मितीत आहे असे म्हणून ते सगळं करत असताना घटनेच्या विषयावर सातत्याने अभ्यास संशोधन करता यावं अशी एखादी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संस्था उभी करता आली आणि बाबासाहेबांचं एक अत्यंत आवडीचं काम होतं म्हणजे ग्रंथवाचक
खरंच आदरणीय शरद पवार साहेबांनी वाचाल तर वाचाल या बाबासाहेबांच्या शब्दाचा किती अभ्यासपूर्ण विचार केला आहे हेच यातून दिसून येते ज्ञानाचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन