“जेव्हा माणूस जागा होतो” या प्रश्नाच्या लेखिका गोदावरी परुळेकर यांनी पुस्तकाच्या माध्यमातून ‘वारली’ हा अदिवासी समाज आणि त्यांच हाल अपेष्ठेचं जीवनमान याचं वर्णन केलं आहे. खरं म्हणजे या पुस्तकात विवादया विषयाचा समावेश केंला असता तर त्यावरच लक्ष केंद्रित होऊन मुख्य हेतू नजरेआड होण्याची शक्यता होती, तसे होऊ नये म्हणून विवादय विषय जाणूनबुजून टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
या सुंदर पुस्तकातील दाखवलेले अपार शोषण व त्याविरुद्धच लढण्याचा दुर्दम्य आशावाद व जिद्द, याचा पुनः प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो. 1986 ते 2000 सालापर्यंत दंडकारण्यातील साठ हजार चौरस कि. मी. जंगलक्षेत्रावरील हजारो एक एकर जमिनीचे, शेकडो गावातील भूमिहिनांमध्ये वाटप करण्यात आले. या पुस्तकातील आदिवासी, शोषितांचे दुःख, वेदना मात्र प्रत्येकाच्या मनाला भिडेल, लढण्याची प्रेरणा देईल.