Share

वैदर्भीय प्रादेशिक जीवन रेखाटणाऱ्या लेखकांमध्ये गो. नि. दांडेकर, उद्धव शेळके, बाबुराव मुसळे, पुरुषोत्तम बोरकर, भालचंद्र नेमाडे, प्रभाकर पाध्ये, अरुण साधू यांच्या इतकाच ताकदीने लेखन करणारा लेखक म्हणून मधुकर वाकोडे यांचे नाव मराठी साहित्यात आहे. ‘झेलझपाट’ ही मधुकर वाकवडींची पहिलीच कादंबरी असून विदर्भातील पश्चिमेला परतवाड्याच्या पुढे पसरलेल्या जंगलातील कोकरू या आदिवासी लोकांच्या जीवनातील व्यथांची ही कथा आहे. ‘झेलझपाट’ ही कादंबरी ९८ पृष्ठांची असून एकूण १५ प्रकरणात विभागलेली आहे. सदर कादंबरीला इस १९८९ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार मिळालेला आहे तसेही कादंबरी ह ना आपटे पुरस्कार विजेता आहे. या कादंबरीचे प्रकाशन देशमख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा. लि. ने केली आहे. या कादंबरीचे मुख्य पृष्ठ निगवेकर यांनी आशयाला अनुरूप असे चित्रांकन केलेले आदिवार जीवनाशयाला अभिव्यक्त आहे कादंबरीच्या आतील भागांमध्ये आशयानुरूप रेखाचित्र मा अरुण मोरघडे यांनी रेखाटले असून आशयाला अधिक उठावदारपणा देण्यात अधिक यशस्वी झालेले आहे.

‘झेलझपाट’ ही कादंबरी आदिवासींच्या जीवनाची परवड सांगणारी असून आजच्या व्यवहारी जगात सरकारी उपक्रमातून चालवलेल्या सोसायटी मधून वाकड्या मार्गाने आपापल्या तुंबड्या भरणारे शेठ लोक व निरक्षर आदिवासींना आर्थिक व्यवहारात फसवून व्याज बट्टा करणारे त्यांच्या मालावर झडप घालणारे व्यापारीही येथे दिसतात. त्यामुळे सर्वत्र विरोधी अशा परिस्थितीत अक्षर ओळख झालेला आणि आपली लबाडणूक होत आहे हे समजणारा एकटा केरू या सर्वांचा शत्रू बनणे स्वाभाविकच आहे लाचार मोपाला दारू आणि लाल परी ची चटक लावणारा आणि फुलासारखी कोळी काकडी पाहणारा कामाध कासम तर अशा वातावरणात असणारच कोरकुंवर बाह्य मुले चढवलेली नाहीत. माणसातलामाणूसच त्याला जाणवलेल्या मूल्यांची जपणूक करतो प्रसंगी त्याची त्यागाची ही तयारी असते. केरू आणि फुले यांच्या फुलाची प्रेमाची ही भावकथा आजच्या स्त्रीमुक्तीच्या काळात फुले आणि केरू यातील लांब जाणार राहण्यासंबंधीचा झगडा पुष्कळ गोष्टी सांगून जातो घरात घुसण्याचे स्वातंत्र्य असून फुले केरूच्या घरात कधीच घुसली नाही आणि केरू लांबजाना होऊन जुलैला कधीच मिळवू शकला असता, पण तरुण सळसळत्या च्या रक्ताच्या नव्या जाणीवा घेऊन आलेल्या केरूला लांब जालना होणं परवड नव्हतं त्यांना जाती-जमातीचे बंधन नव्हते बंधन होते. त्यांच्या मनाचे त्याची प्रेम कहाणी अधुरी अपुरी सूट फूट लावणारी आणि तरीही स्वतःची मूल्य जपणारी आणि त्यासाठी लागणारी किंमत ही चुकवणारी आहे. जाती रिवाजाच्या विरुद्ध आपापल्यात मूल्य संकल्पना सांभाळताना दोघेही जवळ असून दूर राहतात या दोघांनाही आपल्या ५२ कशी प्रेमाची कल्पना नाही. त्यांचे मोठेपण नाही इतकी ती दोघे निसर्गासारखी सरळ आहेत आणि त्यांचा झेल घेणारा व त्यांना झपाटणारा हा समाज त्यातील दृष्ट प्रवृत्ती याही तितक्याच स्वार्थी माणसा इतक्याच वाकड्यातिकड्या त्यात हाव आहे लालसा आहे लाचारी आहे. फसवणूक आहे ज्ञानाची भीती आहे झेल झपाट ही फक्त केरो आणि फुलेयची प्रेम कहानी नसून अनेक बाबतीत विचार करायला प्रवृत्त करणारी ही कादंबरी आहे. कादंबरी हा गद्य वाडःमय प्रकार असला तरी या कादंबरीत अनेक ठिकाणी काव्यात्मकतेचा प्रत्यय येताना दिसतो संवादाच्या भाषेत लयता दिसते कोरकू बोली असली तरी वाचकाला समरस होण्यास भाग पाडताना दिसते प्रसंगाच्या आस्वादात कुठेही खंड पडत नाही घटना डोळ्यासमोर घडत असल्याचा प्रत्यय येतो गद्य आणि पद्य यांची सरमिसळ झाल्यामुळे यातील कथानक अधिक आस्वाद्य होतो.

मधुकर वाकोडे लिखित ‘झेलझपाट’ या कादंबरी विषयी असे सांगता येईल की कादंबरीची भाषिक संरचना दुहेरी असल्यास सतत जाणवत कुठे भाषा वास्तवाला स्पर्श करते तर कुठे कलात्मकतेचा श्वास बाळगते भाषिक माध्यमातून अविष्कृत होणाऱ्या भाषा द्रव्यात काव्यात्मकता प्रतीके प्रतिमा उपमायांची प्रचंड रेलचेल दिसून येते. यामुळे कादंबरीतील भाषेच्या वास्तवाचा सूर नाहक हरवला जातो ही बाब सोडली तर भाषिक सर्जनाचे असंख्य अविष्कार ‘झेलझपाट’ मध्ये अभिव्यक्त झाले आहेत.

पुस्तकाचे नाव :- झेलझपाट

लेखकाचे नाव :- मधुकर वाकोडे

प्रकाशक :- देशमुख आणि कंपनी, पब्लिशर्स प्रा. लि. सदाशिव पेठ, पुणे.

प्रकाशन वर्ष आणि आवृत्ती

पहिली आवृत्ती :- १९८८

दुसऱ्या आवृत्ती :- १९९२

तिसरी आवृत्ती :- १९९६

चौथी आवृत्ती:- १९९७

पाचवी आवृत्ती :- २००४

Recommended Posts

उपरा

Shailaja Dhore
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Shailaja Dhore
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More