डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाणून घेण्यासाठी आजवर अनेक पुस्तके, चित्रपट, कादंबऱ्या, मालिका, यांसारख्या माध्यमातून आपन जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतोच. अलीकडे जगदिश ओहोळ यांचे ‘ जग बदलणारा बापमाणूस ’ पुस्तक हातात येताच मनापासून आनंद झाला. यात डॉ बाबासाहेब आंबेडकर अनेक बाजूंनी मांडले आहेत. यात बाबासाहेबांच्या विविध कार्यांचा आढावा घेत विविधांगी बाबसाहेब सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. पुस्तकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील क्रांतिकारी घटनांचे उभेऊभ जिवंत वर्णन केले आहे.
आमच्या आधिच्या , आम्ही आणि आमच्या नंतरच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक , प्रेरणास्रोत, मुक्तिदाता, उद्धरकर्ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. सध्याच्या डिजिटल युगातही बाबासाहेबांचे विचार, पुस्तके आपल्याला मार्गदर्शक ठरत आहेत. उदाहरणार्थ RBI म्हणजेच आपल्या देशाची सर्वोच्च असणारी मध्यवर्ती बँक ही पण बाबासाहेबांचीच एक देण आहे. लक्षात घेण्याची विशेष बाब म्हणजे बाबासाहेब ज्या गोष्टींना विरोध करीत त्या गोष्टींना देशहिताचे, मानवी हिताचे नवे पर्याय स्वतः उभे करीत. सर्वांनीच हे पुस्तक आवर्जून वाचावे असेच आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एखाद्या विशिष्ट जाती पुरते किंवा विशिष्ट समाजाचे नाहीत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समस्त भारताचे आणि जगातील समस्त वंचित, शोषित , शेतकरी, गरीब, कष्टकरी, कामगार , स्त्री-मुक्तिदाते आहेत. आपण बाबासाहेबांचे भक्त नाही तर बाबासाहेबांचे अनुयायी नक्कीच व्हावे असे मला वाटते. बाबासाहेबांचे विचार आपण फक्त वाचून, ऐकून, जयंतीला मोबाईलवर स्टेटस् ठेवून मर्यादित ठेवायचे नाहित तर जिवनात प्रत्यक्षात बाबासाहेबांचे विचार आपण प्रत्यक्ष कृतीतून आपल्या आचरणात आणुयात आणि भारत घडवूयात…