हे पुस्तक स्त्री जीवनाचा आरसा आहे. लेखिका छाया महाजन यांनी एक स्त्री म्हणून
स्वताच्या अनुभवांतून समाजातील स्त्रियांच्या अडचणी, त्याचं मानसिक द्वंद आणि त्यांना
स्वताच स्थान शोधण्यासाठीकरावा लागणारा संघर्ष अतिशय प्रभावीपणे मांडला आहे.
पुस्तकाच शीर्षकच सूचित करत कि पारंपारिक बंधनातून बाहेर पडून एक स्त्री आपला स्वतंत्र
विचार आणि भूमिका कशी तयार करते.
सामाजिक अडचणी- पुस्तक स्त्रियांच्या विरोधाबासी जीवनावर प्रकाश टाकते. जिथे कुटुंब,
समाज आणि स्वताच आयुष्य यांचा समतोल साधला जातो.
स्त्रीवादी विचारधारा – छाया महाजन यांनी स्त्रियांना एक वेगळा दृष्टीकोन दिला आहे, ज्यामध्ये
त्यांनी स्वताची ओळख प्रस्थापित करण्यासाठी प्रेरित केली आहे.
हे पुस्तक वाचकाला प्रेरणा देते कि, स्त्रीला स्वताच आयुष्य जिकण्यासाठी समाजातील बंधन
मोडावी लागतात. ते केवळ स्त्रियांसाठी नाही, तर प्रत्येक वाचकासाठी विचार करायला
लावणार पुस्तक आहे.
“डोईचा पदर आला खांद्यावरी” हे पुस्तक मराठी साहित्यातील एक महत्वपूर्ण ठेवा आहे.
स्त्रियांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी बल आणि दिशा देणार हे पुस्तक सर्वांनी वाचव .