Share

‘इकिगाई’ हे पुस्तक हेक्टर गार्सिया आणि फ्रासेस्क मिरलेस यांनी लिहिले आहे आणि त्याचा मराठी अनुवाद हा प्रसाद ढापरे यांनी केला आहे. अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत या पुस्तकाच वर्णन त्यांनी केलं आहे. हे पुस्तक आपल्याला तिनही भाषांमध्ये उपलब्ध आहे मराठी,हिंदी आणि इंग्रजी. या पुस्तकाची किंमत ही २८० रुपये एवढी आहे. या पुस्तकाच्या शीर्षकावरून च आपल्या लक्षात येते का हे पुस्तक कशावर आधारित आहे.
दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे रहस्य हे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर च लिहिले आहे त्यानेच आपल्या लक्षात येते का हे पुस्तक या संकल्पनेच आहे. तर ‘इकिगाई’ हा शब्द जपानी आहे हे आपल्या लक्षात आलंच आहे. त्याचा अर्थ असा की ‘इकी’ म्हणजे ‘जीवन’ आणि ‘गाई’ म्हणजे ‘कारण’ असा अर्थात “जीवन जगण्याचे कारण” असा त्याचा अर्थ आहे. जपानी लोक असे मानतात की प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. आपल आयुष्य हे आपण निरोगी, समाधानी आणि आनंदी कसं जगायचं हे त्यात सांगितले आहे. जपान मधील एक गाव आहे ओकिनवा म्हणून तर तिथे जेव्हा लेखकाने भेट घेतली तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की तिथे संपूर्ण जगापेक्षा शंभराहून जास्त वय असलेले आनंदी लोक राहतात त्याच कारण काय? तर आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे फक्त जास्त वर्षे जगणं का यापेक्षाही मोठा काहीतरी उद्देश आहे. सतत व्यस्त राहण्यामध्ये असणारा आनंद या प्रमाणेच जीवनाचा अर्थ शोधण्यासारखं आहे. जपानी लोकांच्या दीर्घायुष्याच कारण आहे ‘इकिगाई’ ज्यामुळे त्यांच्या जीवनाला आकार येतो. जीवनाच्या शेवटपर्यंत कार्यरत राहण्याची प्रेरणा त्यांना मिळते त्यांच्या दीर्घायुष्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजेच त्यांचं इकिगाई वर लक्ष केंद्रित करण आणि जीवनाचा उद्देश स्पष्ट होणं हेच आहे तर इकिगाई चे हेच तत्व आपण आपल्या आयुष्यात कसे आमलात आणायचे हे या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सांगितले आहे.
पुस्तकामध्ये एक म्हण लिहिली होती ‘स्वस्त शरीरामध्ये स्वस्थ मन’ ही म्हण खरचं खुप अर्थपूर्ण आहे या म्हणीतून आपल्याला हेच समजत की मन आणि शरीर हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे तर आहेच या दोन्हींच आरोग्य हे एकमेकांवर अवलंबून आहे का तरुण राहण्यासाठी आपल मन सक्रिय आणि समाधानी असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण जे काही काम करतो त्या मध्ये आपल्याला आनंदी, समाधानी वाटतंय का? का ते काम फक्त पूर्ण करायचं म्हणून करतोय, आपल्याला काय आवडतय आणि काय करावस वाटतंय हे सर्वात महत्त्वाचं आहे म्हणून आपली मन:स्थिती ही नेहमी तणावा मध्ये असते आणि हेच नको होईला म्हणून नेहमी आपल्या आवडीचे काम करा की जेणेकरून आपण आनंदी आणि समाधानी राहु आणि अर्थात जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपण निरोगी असतो. सतत कामाचं ताण त्या वर आपल्या मनावर अधिक परिणाम होतो म्हणूनच नेहमी आपल्या आवडीचे काम करा हेच आपल्याला यातून समजत आणि दीर्घायुषी, निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे म्हणजे आपल्याला काय करायचं काय नाही करायचं आणि रोज शांतपणे थोडा वेळासाठी स्वतः जवळ बसून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे म्हणजेच आपण स्वतः च आपल्याला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे.
आपण बघतो आजकाल च जीवन हे खूप धावपळीचं खूप घाईने जगतो आहोत त्यात आपल्याला समजत नाही का आपण कसं जगतोय म्हणजे आपण वेळेनुसार जगतो खरं पण आपला वेळ हा खूप वेगवान जात आहे आपल ठरल्या प्रमाणे आपण काम करतो या – या वेळेला हे करायचं आहे हे खर चांगल आहे पण स्वतः साठी आपण वेळच देत नाही आहोत आणि मग जीवनाच्या शेवटी अस वाटत की आपण जगलो तर नाहीच, आपण थांबलो नाही, आपण एक एक क्षण हा जगलाच नाही तर अश्याच पद्धतीने सहज, सोपं आणि घाई न करता प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत आपण आपलं आयुष्य हे दीर्घायुषी, समाधानी जगू शकतो हे आपल्याला या मधून सांगितली आहे आणि या पुस्तकाची भाषा म्हणजे शब्द ही खूप सोप्या आणि सरळ भाषेत आहेत जेणकरून आपल्याला वाचायला छान वाटते. हे पुस्तक वाचताना आपल्याला आपल्या जीवनाचं खर कारण काय आहे किंवा आपण कसं जगतो हे त्यात सांगितलं आहे म्हणून आपल्याला वाचायला आणखी मजा येते.
“The Art Of Staying Young While Growing Old” म्हणजे म्हातारपणीही तरुण राहण्याची कला. “जो पर्यंत माणूस स्वतः ला जाणून घेत नाही, तो पुढे जाऊ शकत नाही” आणि हे खर आहे जो पर्यंत आपण स्वतः ला जाणून नाही घेत तो पर्यंत काहीच करू नाही शकत. थोडक्यात “इकिगाई” म्हणजेच नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी आपण जन्माला आलो आहोत हे शोधणे. आपल्या आयुष्यामधील इकिगाई शोधायला हे पुस्तक आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेल. सुखी होण्याचे मूलभूत नियम, तुमचं सामर्थ्य कशात आहे, तुमचं अंतर्मन काय सांगतय ते आपल्याला अतिशय उत्कटपणे काय करावसं वाटतं त्याचा शोध घेण्यासाठी हे पुस्तक आपल्याला मार्गदर्शन करेल. अर्थात आपल्यातला “इकिगाई” ओळखण्यासाठी हे आपल्याला मार्गदर्शन करेल आणि म्हणून हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं असं मला वाटते. खरचं खुप काही शिकायला मिळेल, खूप प्रेरणा देणारं पुस्तक आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्व हे पुस्तक नक्कीच वाचालं.

Recommended Posts

The Undying Light

Kavita Murtadak
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Kavita Murtadak
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More