Share

Book Review in 500 to 1000 Words कथा-कादंबरीच्या विश्वात शिरायचे म्हटल तर एक नाव नक्कीच वगळून चालणार नाही ते म्हणजे सुहास शिरवळकर.त्यांचीच गाजलेली एक कथा- कादंबरी म्हणजेयारोंकी यारी हम सब की न्यारीदूनियादारी.
कॉलेज लाइफ ही आपल्या सगळ्यांची खूप आवडती आणि कायम लक्षात राहणारा प्रवास असतो. वर्गातले किस्से, कट्ट्यावरची यारी आणि प्रेमाच्या भानगडी हे सगळंच कॉलेज मध्ये असत आणि कदाचित या सगळ्यामुळेच तो प्रवास नेहमीच आठवणीत राहतो.
दूनियादारी या कथेच्या माध्यमातून देखील लेखकाने हीच सगळ्यांची अशी वाटणारी, घराघरातून घडत असणारी अशी एक काल्पनिक परंतु सत्यकथा या पुस्तकात दाखवली आहे.
१९८२ पासून कॉलेजमध्ये असणाऱ्या आणि कॉलेजमधून बाहेर पडलेल्या लहानथोर सर्वांनाच आपलेसे करणारी सुहास शिरवळकर यांची ही दुनियादारी आहे. पुण्यातील कॉलेजमधील घटना, प्रसंग, व्यक्ती कादंबरीच्या केंद्रस्थानी असल्या, तरी हे नाट्य देशातील कोणत्याही कॉलेजमध्ये अगदी सहज घडू शकतं, याची खात्री पटते. काल्पनिक आणि सत्याची अप्रतिम सरमिसळ असलेलं हे कथानक आहे. कोणत्याही कॉलेजमध्ये, कोणत्याही घरात, कोणाच्याही अवती भवती घडणारी ही कथा आहे. मैत्री, शत्रुत्व, आनंद,दु:ख, हेवेदावे, मत्सर अशा अनेक भावनांचा या कथे मध्ये कल्लोळ आहे.
श्रेयस, दिग्या, मिनू, प्रीतम, सुरेखा, श्रीन, साईनाथ, आशक्या, भालेरावअश्या अनेक पात्रांनी सभोवलेली आणि सजवलेली ही कथा आहे.
श्रेयस पुण्यातील एस.पी कॉलेजला अॅडमिशन घेतो. पहिल्याच दिवशी प्रिन्सिपल अॅड्रेस चालू असताना त्याचा सीनियर दिग्या म्हणजेच दिगंबर शंकर पाटील (डी.एस.पी)याच्याशी त्याची ओळख होते.कॉलेजच्या पहिल्याच दिवशी सीनिअर कडून बेदम मार मिळतो आणि त्यामुळे त्याच्या मनात भीती निर्माण होते.
पण नंतर मात्र याच सीनिअरस सोबत चांगली गट्टी जमते आणि कट्टयावरची यारी सुरू होते. परंतू नवीन नाती जुळत असताना जुन्या नात्यांच्या गोष्टी नव्या कळतात.असच काहीस कादंबरीत श्रेयस च्या बाबतीत होतं व त्याच्या समोर त्याच्या राणी मां, ड्याडा आणि श्रेयस गोखले उर्फ एम.केयांचं गुपित समोर येतं.
तरी देखील श्रेयस यारणा दोस्तांन सोबत आनंदात जगत असतो. दोस्ती, मैत्री या बरोबरच श्रेयस ची प्रेमाची स्टोरी पण हिट होते. कथे मध्ये श्रेयस सोबत कधी गोड मिनू असते तर कधी जिद्दी श्रीन दिसून येते. पण काही गोष्टी आणि काही नाती आयुष्य भर सोबतीला नसतात आणि तसच आपल्या कट्टा गँग सोबत होत.
काळ फिरतो आणि दिवस अचानक अनपेक्षित प्रमाणे बदलतात आणि कट्टा गँग ही फक्त एक आठवण होऊन बसते. सगळ्यांच्या वाटा, रस्ते, मार्ग, विचार सार काही बदलत व मैत्रीतील ओलावा हरवून जातो.
प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन गोष्टी आणि नवीन नाती निर्माण झालेली दिसून येतात पण त्यातील काही मनापासून तर काही मनाविरुद्ध असतात.ही कथा कालही, आजही आणि या पुढे देखील सर्वांचा हवीहवीशी व सर्वांच्या मनात घर करून राहील यात काहीच शंका नाही. कथा वाचल्यावरहे मात्र नक्कीच कळत की जो पर्यंत दोन पिढ्यांमध्ये मानसिक अंतर आहे, जो पर्यंत मानवी भावना, नाती आहेत तो पर्यंत ही काल्पनिक पण प्रातिनिधिक असलेली सत्यकथा अमर राहील.
पुढे याच कथेवर आधारित मराठी चित्रपट “दुनियादारी” २०१३ साली प्रदर्शित झालं व मराठी चित्रपट विश्वात आपल नाव केल.

Recommended Posts

The Undying Light

Shobha Shinde
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Shobha Shinde
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More