भावी काळात तयार होणाऱ्याविकसित उद्योजकांसाठी विविध उद्योजकांची माहिती
प्रशिक्षणाच्या अंगाने पुस्तकरूपाने आपणा सर्वांना देताना आनंद होत आहे. हि माहिती
प्रशिक्षणाच्या दृष्टीतीने केवळ जुजबी स्वरुपाची नसून त्या त्या उद्योगाच्या दृष्टीने अतिशय
उपयुक्त स्वरुपाची आहे.या माहितीचे स्वरूप केवळ ‘माहिती’ अशा स्वरूपाचे नसून
उद्योजकांशी हितगुज कारता करता ज्ञानार्पण करणाऱ्या ज्ञान्गांगेच्या स्वरूपाने आहे.कारण
केवळ माहितीचे डोंगर उभे करून आपणाला उद्योजकीय लढाई जिंकता येणार नाही.त्यावर
विशिष्ट कौशल्याधारित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
तरुण उद्योजक हि आपल्या देशाचे भविष्य घडविणारी पुढील पिढी असून देशाच्या उद्योग
अर्थकारणाला हि पिढी दिशा देऊ शकते.युवा शक्तीच्या या उत्साह पूर्ण प्रयत्नांना मार्गदर्शन
करण्याची नितांत आवश्यकता आहे.प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही उद्दिष्टे असतात.