जाधव विशाल (FYBA) राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी , पुणे .
‘मनोजकुमार शर्मा ’ हा मुलगा एका मुरैना , जिल्ह्यातील ,जौरा तालुक्यातील,बिलग्राम गावात राहणारा एक गरीब मुलगा. वडील एक साधी नोकरी करत कुटुंब चालवीत होते. एके दिवशी जौरा बाजारातील मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. मनोजला क्रिकेट आवड होती मग मनोजने आईकडे क्रिकेटसाठी दहा रुपये मागितले पण सामान्य कुटुंब असल्यामुळे आईकडे पैसे नव्हते म्हणून आईने पैसे देण्यासाठी नकार दिला . मनोज नाराज होऊन त्या मैदानावर क्रिकेट बघण्यासाठी गेला .तर तिथे उपविभागीय अधिकारी “दुष्यन्त सिंह ” हे आले होते. मनोजला तेथे त्या अधिकाऱ्यांमुळे बोलण्याची संधी मिळाली. मग त्याने उत्तम बोलून त्या अधिकाऱ्याच्या मनात आपली प्रतिमा उत्तम रुजवली . मग त्या अधिकाऱ्याने त्याचे कौतुक केले. मग मनोजचा आनंद गगनात मावेना.
मनोजचा बारावीचा निकाल लागला नव्हता पण त्यानंतर काही दिवसात निकाल लागला , मात्र त्यात मनोजचा गणित विषय फेल गेला म्हणजे मनोज बारावी नापास झाला होता . तो नैराश्ययात गेलेला होता पण त्याच्यावर बारावी नापास चा ठपका लागला होता . उपविभागीय अधिकारी “दुष्यन्त सिंह ” यांच्या प्रेरनेतून आयपीएस होण्याच स्वप्न उराशी बाळगलं होत. यूपीएससी साठी ग्वाल्हेरमध्ये गेला. तिथून त्याचा प्रवास सुरू झाला. तयारी सुरू असताना त्यात त्याला ‘श्रद्धा’ नावाची मुलगी एक मैत्रीण म्हणून भेटली तीच त्याची जीवनसाथी बनली. तिची त्याला आयपीएस होण्यासाठी खूप मदत झाली. त्याच्या प्रवासात खूप अडचणी आल्या पण तो थांबला नाही, तर तो अडथळे पार करत त्याने उराशी बाळगलेल स्वप्न साकार करून आपल्या प्रवासाचा शेवट गोड केला.
पुस्तकातून आपल्याला ‘संयमांचे’ धडे शिकायला मिळतात . आपल्याला प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावर मिळते , फक्त त्यासाठी संयम अंगीकारावा पण त्यासोबत प्रयत्नांची, कष्टाची, चिकाटीची आणि सातत्याची जोड दिली की मग मात्र आपल्याला आपल्या ध्येयापासून कोणीच थांबवु शकत नाही व कोणीही अडवूही शकत नाही, ही गोष्ट पहिल्यांदा मनात रुजवली पाहिजे. विशेषतः मनोजकुमार शर्मा यांचा प्रवास जर बघितला तर कळून येईल की ‘ हरतो तोच, जो लढत नाही’.
या पुस्तकातून एक संदेश मात्र आपल्यापर्यंत पोहचतो तो म्हणजे हा की माणसाने आपल्या आयुष्यात कोणतेही ध्येय साध्य करताना संयम राखणं खूप महत्वाचे आहे, कारण भारतात १४० कोटी लोकसंख्येत आपला जन्म झाला आहे म्हणजे आपल्यात काहीतरी आहे. याची प्रथम ओळख करून घेतली की मग आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी म्हणजे प्रवास सुखाचा होतो. आयुष्यात नकारात्मक गोष्टीला अजिबात थारा द्यायचा नाही, जर पुढे जायचे असेल तर. या पुस्तकाद्वारे एक गोष्ट उमजली ती म्हणजे काहींना यश हे पहिल्या प्रयत्नात , तर काहीना शेवटच्या प्रयत्नात मिळते .
त्यामुळं न खचता मन लावून प्रयत्न करायचे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे “या जगात पेरलेलं कधीच वाया जात नाही”.