PRATIBHA COLLEGE OF COMMERCE AND COMPUTER STUDIES, CHINCHWAD, PUNE.
किशोर शांताबाई काळे लिखीत कोल्हाट्याचं भटक्या कोल्हाटी समाजातील महिलांची वेदना सांगण के पुक्तक आहे. नृत्य करणाया महिलांकडे वासनेच्या नजरेतुन बघणारा समाज त्यांची शारिरीक शोषण कर त्यांच्या मुलांची होणारी परवड घुसमट याचे अत्यंत नेवमावासी वर्णन या पुस्तकात केलेले आहे. या पुस्तकाच नारापासूनच भापल्याला धक्के बसायला सुखात होते आपल्या नावानंतर भाईचे नाव आहे हाच या पुस्तक विषय आहे. कोल्हाटी जमातीतील किशोर शांताबाई काळ यांचे हे आत्मकथन आहे या जमातीतील डॉक्टर झा किशोर काळे यांनी अनेक वर्ष समाजकार्य केले. आणि 2007 साली त्यांचा अपघाती मृत्यू आला तरुण वर्गान विगत जग सम्जून घेण्यासाठी हे पुस्तक वाचल पाहीज
तमाशा हा प्रकार वेगळा आहे परंतु यासार खाच नृत्याचे वेगवेगळे कार्यक्रम करणे किंवा थिएटर मध्ये नृत्य करणे लावणी व वेगवेगळ्या गाण्यांवर नाचण्याची कोल्हाटी समाजाची परंपरा आहे. कोल्हाटी समाजाच्या महीना अनेक वर्ष हे सर्व करत होत्या. त्या मध्ये शोषण किती विदारक होत याची चर्चा फारशी झाली नाही. या महिलांच्या सौंदयाची आणि तिथे जाणायांची आबट शौकीन पद्धतीने चर्चा होत राहायची परंतु किशोर शांताबाई काळे यांच्या आत्मकथनाने भावविश्वाला धक्के बसले. या सौंदर्या पलिकडील कुरूपता आणि खोट्या हसण्यामागे लपलेले अश्रू आहेत ते लेखकाने देशासमोर मांडले.
स्त्रीकडे एक भोगवस्तु मधून पाहण्याची मानसिकता आहे जी पुरुषप्रधान व्यवस्था आहे ती किती कुरुप कुर आहे हे या पुस्तकानून कालनारआहे आपन आपल्या कुटुंबानील, नात्यातील अशा प्रकारचा भाग लपवण्याचा प्रयत्न करतो परंतु स्वतःच्या कुटुंबातील सर्व ! महिला पुरुषच नहतर स्वतःच्या भाईचे जसेच्या तसे चित्रण या पुस्तकामध्ये लेख्यकाने प्रांजळपणे मांडलेले लेखकाचे वैशिष्ट्य भावते. त्यातून त्यांना त्यांच्या जातीमधून कुटुंबीया कडून रोष पत्करावा लागला परंतु केवळ सत्य मांडायचे या भावनेतून हे सत्य या पुस्तकातून लेखकाने जगासमोर आणले आहे.
कुटुंबातील त्यातल्या त्यात सुंदर भसणाया मुलींना लहानपणापासूनचे नृत्य करायला शिकवले जायचे आणि परंपरेनुसार एखाद्या पुरुषाने नृत्य करणात्या परखादया स्त्रीची जबाबदारी घेतली जायची जबाबदारी मृणजे दुदैवाने त्या स्त्रीधा उपभोग घेण्यासाठी मालकी हक्क मिळायचा परंतु एक मुल झाल्यानंतर तीला सोडून दिले जायचे त्यावेळचे करमाळ्याचे आमदारांशी संबंधातून किशोर काळ यांचा जन्म झाला. अशीच हाताने आठ उदाहरणे या पुस्तकान माहेत. त्यात त्यांची आई, मावस्या आणि नात्यातल्या स्त्रीया भाहतः अशाच पद्धतीले 3 वेळा लेखकाची आई फसली गेली आणि २ मुल तीच्या पदरी आली. अशा प्रकारे बाजारात फसल जान असून सुद्धा या या स्त्रीया कुटुंब मिळाव या भावनेतून मशा संबंधाचा स्विकार करत होत्या. सोमपेठेच्या सा वकाराने हात पाय जोडून लेखकाच्या आईला सोबत लग्न करून नेले. सोबत फक्त लहान मुलाला स्विकारले. लेखकाला मात्र आजोळी आजोबांकडेच राहावे लागले. लेखकारच्या आईचेही आयुष्यभर हाल अपेक्षा करत जीवन गेले ही कहानी अक्षरश: वाचवत नाही .
या कुटुंबातील पुरुष मात्र याबद्दल आक्रमक नव्हते व पैसे मिळतात त्या पैशाने आरामात जगायचे. एके ठिकाणी किशोर काळे संतापून अशा पुरुषाविषयी लिहीतात ते म्हणतात जर एखाद्या मुलीला कुणी शिट्टी वाजवत असेल तर भाऊ त्या व्यक्तीचा खुन करण्याचा प्रयत्न करेल पण नाचणारनीचे भाऊ आपली बहीण नाचत असताना हजारो जण शिट्ट्या वाजवतात, कित्येकजण तीचा हात दाबतात पण तो शिट्च्या राजवणारा पैसेवाला असेल त्याचा खून करण्यासाठ ऐवजी त्याला मखमली गादीवर झीपवून हात-पाय दाबण्याची तयारी या भावाची असतेः
किशोर काळे यांचे आजोबा या पुस्तकातील खया अर्थाने खलनायक माहेत. कुटुंबातील स्त्रीयांना अतीशय वाईट अनुभव येऊन सुद्धा पुन्हा पुन्हा नृत्य करण्यासाठी भाग पाडत होते. या सगळ्याला वैतागून लेखकाच्या आईने सोनपीठच्या सावकाराची सोयरीक स्विकारली पण वाईट व हालाकीत आयुष्य जगत राहिली. आजोबांबर जवळ एकटा राहिलेल्या लेखकाला व्याची माई काही पैसे मनीऑर्डर पाठवत नाही म्हणून वाईट वागणूक देऊन छब्ळू करत राहिले, सोनपीठच्या सावकाराने लेख- काच्या आई व लहान भावालाच स्विकारले होते लेखकाला आजोळीच राहावे लागले होते. कोणत्याही प्रकारची ममता मातृत्वाची सूख न मिळालेल्या मुलाची दशा काय असते त्याला किती मारहाण होते त्याहून कष्टाचे जिवन जगत लेखकाने त्याचे शिक्षण पूर्ण केले त्यांच्या शिक्षणाचा संघर्ष पुस्तकाच्या तिसन्या भागात दर्शवला आहे.पैशाअभावी शिक्षण सुटण्या च्या मार्गावर असताना नातेवाईकांकडून कसली मदत न घेता त्यांना ओळख दाखवू शकत नाही, कारण शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्यांची चेष्ठा होईल त्यामुळे लपवून नातेवाईकांशी संबंध ठेवावे लागत त्यावेळी त्यांची होणारी घुसमट अत्यंत विदारक पद्धतीने या पुस्तकामध्ये रेखाटलेली आहे.आणि शेवटी MBBS ला नंबर लागल्यानंतर शेवटच्या वषर्षामध्ये किती हाल होतात सातत्याने गावाला गाव लागतं कुणीही अर्थिक मदत करत नाही अनेकदा शिक्षण सुटण्याची वेळ येते. एकदा हताश होऊन मरण्याचा प्रयत्म केला पण मित्रामुळे जीव वाचना तरी सुद्धा लेखक शिकत राहतो कुठलही कर्तव्य न बजावणाया वडिलांना मदत करत राहतो गावाला आल्यामर घरात स्वयंपाक करण्यापासून गिरणीत राबण्यापासून सगळी कामे करूनही वडिल बेदम मारत राहतात आई सातत्याने आजारी पडत राहते. तरीसुध वडीलांचा निवडणूकीत प्रचार करतो.
पुस्तकातील शेवटचं वाक्य ‘आणि ‘अखेर मी डॉक्टर झाली’ मध्यमवर्गीय कुटुंबातील एखादा मुलगा डॉक्टर होणे भाणि एका पत्रामध्ये आयुष्य काढलेल्या विदारक परिस्थितीतून मार्ग काढत आलेला हा लेखक किशोर शांताबाई काळे डॉक्टर होणे ही खूप मोठी गोष्ट होती किशोर काळे यांचा जीवन संघर्ष तमाम समाजातील तरुण पिढीला प्रेरणास्त्रोत नक्कीच असेल.