Share

मी एक स्वप्न पाहिले ह्या प्रस्तुत पुस्तकात राजेंद्र भारूड यांनी आपला आयएएस होण्याचा प्रेरणादीयी जीवनप्रवास सांगितला आहे. प्रतिकूल परिस्थीतीवर मात करत त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करत गरीबी ही पैसयाची असावी पण विचारांची नाही हे सांगितले आहे.
राजेंद्र भारुड हे आदिवासी उपयोजना क्षेत्रातील साक्री तालुक्यातील सामोडे येथील आदिवासी कुटूंबात जन्माला आले. जन्म होण्याच्या आदीच त्यांचे वडील वारले, त्यामुळे भारूड यांची आणि सोबत दोन बहिन भावडांची जिम्मेदारी त्यांच्या आई आणि मावशीने उचलली. भारूड यांच्या आई ने मोहाची दारू विकून आपला घरखर्च संभाळला. त्यांच्या पूर्ण समाजात भारुड हे शाळेत जाणारा पहिला मुलगा होता. ते सांगतात की शाळेचे कपडे व पाठी घेण्यायाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे त्या काळात त्यांच्या शिक्षकांनी त्यांचा सर्व शालेय खर्च उचलला.भारूड हे शाळेत असल्यापासून हुशार होते. पाचवीत असताना नवोदय परिक्षेत ते उतीर्ण झाले व 5 वी ते बारावी शिक्षण नवोदय मधे घेतले. आभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांना स्कॉलरशीप मिळत गेल्या व सिएटी ही परीक्षा उत्तीर्ण होऊंन त्यांनी एमबीबीइस चे शिक्षण पूर्ण केले.
एमबीबीइस करत असताना त्यांना upsc ची गोड़ी लागली व आपन पण या समाजाला काही देण लागतो हे ठरवून त्यांनी upsc चा अभ्यास पदवी शिक्षणासोबत सुरू केला व पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले . आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी संघर्ष केला. हा प्रवास सुरु असताना त्यांना खुप चांगले वाईट अनुभव आले, त्यातील प्रत्येक अनुभव वाचकाला एक संदेश देतो.
सुसंस्कृतता, गुणवत्ता, यश ही काही फक्त मोठ्या मोठ्या शहरातल्या इंग्रजी शाळांची आणि सुखसोयींनी युक्तत असलेल्या श्रीमंतांच्या मुलांची नसते. तर ज्या हृदयात जिद्द, कष्ट, चिकाटी, धैर्य, आत्मविश्वास, स्वतःवर व निसर्ग शक्तीवर अपार ‘श्रद्धा’ यांची ज्योत पेटते तिथे सर्व स्वप्वांनी पूर्ती होते. तुम्ही कोणाच्या पोटी जन्माला येता ; तुमचे आई वडील गरीब आहेत की श्रीमंत,तुम्ही खेड्यात आहात की शहरात, मराठी मीडियमला आहात की सेमी इंग्रजी ला आहात, याचा आणि तुमच्या यश- अपयशाचा काहीही संबंध नसतो. तुमचे विचार, स्वभाव व बेभान होऊन मेहनत घेण्याची वृत्ती यावरच तुमचे भवितव्य अवलंबून असते…….. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजेंद्र भारूड यांचा जीवनप्रवास आहे.

Related Posts

संघर्षमय प्रेरणा देणारी कहाणी : फकिरा

Prakash Jadhav
Shareसाहित्यसम्राट लोकशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक क्रांतिकारी साहित्यकार असून त्यांची साहित्य निर्मिती ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून....
Read More

मन मे है विश्वास

Prakash Jadhav
Shareश्री.विश्वास नांगरे पाटील हे एक तरूण, तडफदार आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलिस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. मुंबई वरच्या...
Read More

मृत्युंजय

Prakash Jadhav
Shareअसे अनेकदा म्हटले जाते की आपल्या बालपणीची पुस्तके आपल्या स्वताच्या भूतकाळाला एक ज्वलंत दर देतात आणि आपण तिथे वाचलेल्या कथांसाठी...
Read More