शाळे मधून दमून आलेली मुले भूक लागलीच गलका करत आई भोवती जमतात आणि आई
त्यांना दोन मिनिटात ‘Magy’ करून देते हि जाहिरात आपल्याला फार परिचित आहे. या
उत्पादनाने भारता मध्ये एका नवीन गोष्टीचा पायंडा पडला.फिनोलेक्सनआणल पाणी,शेत
पिकली सोन्यावाणी हि जाहिरात रेडीओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिनोलेक्स कंपनीच्या
शेतीसाठी पाईपची प्रचंड विक्री करत राहिली.हमारा बजाज ,बुलंद भारत कि बुलंद तस्वीर या
मुळे भारतातील दुचाकी वाहनांच्या विश्वात क्रांती झाली. या सारख्या जाहिराती आपल्या
मनावर विलक्षण परिणाम करत असतात. पूर्वीच्या काळी प्रचार-प्रसारासाठी दवंडी
पिटन्याचेकाम केले जाई.तसेच शिलालेखांवर ,दगडांवर कोरलेली चिन्हे हि त्या वेळच्या
व्यापाराआणि व्यवसायाच्या पद्धती पष्ट करतात.