Share

Alka Sandeep Shete Assistant Librarian
प्रत्येक पिढीतील स्त्रीच्या वाटय़ाला आलेल्या नकुशीपणाच्या वाटा उलगडून दाखवणारी डॉ. सुनीता बोर्डे यांची ‘फिन्द्री’

आपण काहींना नकोसे वाटलो तरी अनेकांना हवे असतो आणि त्यासाठी जगायचं असतं. आपलं आस्तित्व केवळ भविष्यावर सोपवून चालत नाही. आपणच आपल्या आयुष्याचे शिलाकार असतो. मुलगी झाली म्हणून तिला लहानपणी बाळ असताना फेकने गेल नकोशी असणारी ती मोठेपणी मात्र शिकली आणि प्राध्यापक बनली व डॉक्टरेटही मिळवली. आज ती महाविद्‌यालयामध्ये विभाग प्रमुख आहे व अध्यापनही करत आहे. हे खाज नव्हे ही वास्तवातील प्रेरणेची पायवाटच आहे पण बापाला मुलगी नको होती म्हणून तिचे फेकले जाणे हे अस्तित्वाचे स्टजनात्मक रूप घेऊन अवतरले आहे.
मराठवाड्यातील एक दलित कुटुंबात एका मुलीचा जन्म होतो. देशाला दिवा म्हणून मुलगी नको मुलगाच हवा या इच्छेपोटी वडील त्या जन्मलेल्या गोळ्याला फेकून देतात. नुकताच जन्मलेला तो जीव खत बंबाळ होतो. ते बाळ जिवंत नाही असे समजून लोक निराश होतात. पण काही वेळाने ते बाळ खास घेते आणि रडायला लागते. एखाद्‌या सिनेमातील सीनमधला चमत्‌कार वाटावा अशीच ही घटना मराठवाड्यातील एका दत्रित कुटुंबात घडली आणि फिद्री म्हणजेच लेखिका सुनीता बोर्डे ही नकोशी असलेली मुलगी जगायला लागली.
ती जगताना मरणाच्या यातना मात्र नेहमीच भोगत् बापाचा जरी राग असला, तरी आईने मात्र आपल्या मुलीत्ग शिकवायचे ठरवले. एक वेळेस आपण उपाशी राहिले तरी चालेल पण माझी मुलगी शिकली पाहिजे, असा निश्चय मुलीच्या आईने केला.
मुलगी बारावी बोडीत पहिली आली. सत्कार झालाः सत्कार झाल्यावर घरी आली तेव्हा बापाने मारलेली थोबाडीत म्हणजे तिच्या मशाला मिळालेले उत्त्तर होते. तिच्या आईने लाथा बुक्क्या खाळ्या. त्यातील कही लाथा सुनितालाही खाव्या लागल्या. जितका त्रास सुनिताला झाला नाही त्यापेक्षा जास्त त्रास तिच्या अशिक्षित आईला झाला. पण आज ‘फिन्द्री’ या पुस्तकाच्या माध्यमातून सुनीता बोर्ड यांनी त्यांचा जीवनपट उलगडला आहे.
मुलीचे शिक्षण हा सवीत जीवंत विषय आहे. फिन्द्री म्हणजे काय? फिन्ट्री म्हणजेच नको असलेली. सुनीता यांचे आयुष्य खुप हालाखीचे गेले. दारुडा बाप, अशिक्षित आई पण बापाच्या विरोधात जाऊन परिस्थितीवर मात करत आपल्या मुलीला शिक्षण देण्याची धमक असलेली आई हीच सुनीताचा आदर्श होती. शिक्षण हेच बाईची गुलामी संपवण्याचा मार्ग हे सुनीताच्या आईला वाययचे. लेकीच्या शिक्षणासाठी नवयाचा छळ, अन्याय, अत्याचार, अपमान सगळे तीने सहन केले. पुरुषप्रधान कुटुंब बाईला नेहमीच बंधनात ठेवायला बघते. तिने बोलावे कसे? वागावे कसे ? काय खावे ? काय लयावे ? हे सर्व काही पुरुषाच्या मार्जीन उरते आणि जर हे नियम मोडव्याचा प्रयत्न केला, तर तिथे जन्म घेने हिंसा. घरातील रक्ताची नात्यांवर पुरुष आंधळेपणाने हिंसा करायला सुरुवात करतो आणि याची शिकार झालेली बाई तिच्या स्वप्नांना तिलांजली देते. तिच्या इच्छा संपवून राकेत पण या कादंबरीतील आईने मात्र आपल्या मुलीची स्वप्न जिवंत ठेवली आणि तिला शिकविले.
या कादंबरीतील नायिका संगीता आणि तिच्या शिक्षणासाठी धडपडणारी तिची आई थीच्या संधीची कहाणी आहे गरीब परिस्थती बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय जालीम उपाय नाही. हेच खरे.

Recommended Posts

The Undying Light

Shantilal Zimane
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Shantilal Zimane
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More