Share

आधुनिक स्त्री जीवनाचे वास्तव चित्रण करणारी कादंबरी म्हणजे भूमी
आजच्या आधुनिक युगातील नोकरी करून घर सांभाळणाऱ्या अनेक स्त्रियांची व्यथा मैथिलीच्या रूपाने आशा बगे यांनी भूमी कादंबरीत मांडले आहे. त्यामुळे या कादंबरीला विविध आयाम प्राप्त होतात. आशा बगे यांनी भूमी कादंबरीत मैथिली या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत स्वतःचे जीवन आणि कुटुंब उभे करणाऱ्या स्त्रीची प्रतिमा उभी केली आहे. मैथिलीच्या जीवन प्रवासाची ही कथा आहे. मैथिलीच्या आई वडिलांचे धर्म वेगळे आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या सहवासात कडलूर या गावात तामिळ ख्रिश्चन संस्कारात तिचे बालपण घडते. आईच्या मृत्यूनंतर मात्र तिच्या आत्या बरोबर ती शिक्षणासाठी मुंबईला येते. तिची आत्या तिच्यातील स्वत्व जागे करते आणि तिला शिक्षणासाठी मदत करते. तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहते. मैथिली दहावीपासून प्रत्येक परीक्षेत यशाची चढती कमान हा तिच्या शैक्षणिक विकासाचा चढता आलेख आहे. हे यश मिळवताना परिस्थितीशी संघर्ष करून त्यावर ती मात करते. शंतनुशी लग्न करून ती सुखी होऊ शकत नाही. दोघांचे स्वभाव वेगवेगळे असतात. तिला मिळणारे यश शंतनूला सहन होत नाही. मैथिलीला त्याच्याशी संसार करीत असताना सतत सूप्त संघर्षाला तोंड द्यावे लागते. दोघांमध्ये अंतर पडते अंशुमन तिचा मुलगाही तिला समजून घेत नाही व शेवटी मैथिली बंगलोर विद्यापीठात जाते. तिथेही ती स्वतःला सिद्ध करते नोकरी करून ती पीएचडी पूर्ण करते. संघर्ष शील वातावरणातही ती लिहीत असते. मैथिली ही पुरोगामी विचारांची असली तरी आपल्या संसाराची नाळ कायमचे तोडत नाही. आयुष्यभर तिला संघर्ष करीत एकाकी प्रवास करावा लागतो. परपरागत कुटुंब व्यवस्थेला सांभाळण्याचा कसोशीने प्रयत्न करते. नवविचाराच्या वातावरणात यशस्वी स्त्री म्हणून तिने लौकिक मिळवलेला असतो. स्वतःच्या भावनांचा कोंडमारा झाला तरी तक्रार करीत नाही. म्हातारपणात शंतनुला सांभाळण्यासाठी त्याच्या जवळ येते. मैथिलीच्या त्यागावार त्याचे कुटुंब उभे राहते. मैथिलीच्या निमित्ताने मध्यमवर्गीय जीवनाचे चित्रण या कादंबरीत व्यक्त होते. आजच्या काळातील स्त्रियांच्या वेदना या कादंबरीच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात.

Recommended Posts

The Undying Light

Vandana Bachhav
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Vandana Bachhav
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More