Share

Review By Dr. Borawake Kranti Suhas, Associate Professor, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune
‘मजेत जगावं कसं?’ या पुस्तकाचं नावच इतकं आकर्षक आहे की कुठल्याही वाचकाला पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. This is one of the record breaking top best seller book! खूप जबरदस्त पुस्तक!!. ‘मजेत जगावं कसं?’ हा कानमंत्र लेखकाने या पुस्तकाद्वारे अतिशय उत्तमरित्या दिला आहे. लेखकाने आपल्या प्रसन्न, खुमासदार, हलक्याफुलक्या शैलीत या पुस्तकाची मांडणी करताना एकूण 11 प्रकरण दिली आहेत. या 11 प्रकरणात टप्प्याटप्प्याने विचार, कल्पना, भावना, सवयी, प्रतिक्रिया, संकल्पना अशा सर्व अंगांनी लेखक आपल्या मनाला आणि जीवनाला भिडला आहे. मनसोक्त, मजेत जगण्यासाठी लेखकाने एकेका प्रकरणात एक एक पायरी सोप्या सुटसुटीत शब्दात उलगडली आहे. मनासारखं जगायचं असेल तर प्रथम स्वतःची किंमत ओळखायला हवी. जुन्या संस्कारांची साफसफाई करायला हवी. विचारांना योग्य दिशा द्यायला हवी. आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवंय हे ओळखायला हवं. यश, आनंद, प्रेम या संकल्पना समजून घ्यायला हव्यात. स्वास्थ्य आणि पैसा म्हणजे नेमकं काय, हेही जाणून घ्यायला हवं. योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी आवश्यक ती तंत्र, कौशल्य आत्मसात करायला हवीत. नकारात्मक भावना कशा हाताळाव्यात, मानसिक अडथळे कसे दूर करावेत, हे शिकायला हवं. अंतर्मनाची अमर्यादित शक्ती वापरण्याची युक्ती शिकायला हवी. एकेका प्रकरणात एक एक पायरी ओलांडत मजेत जगण्याच्या ध्येयापर्यंत कसं पोहोचावं, हे अतिशय सोपं करून लेखकाने सांगितले आहे. जगणं ही एक कला आहे. संपूर्ण पारंगत कोणी नसतं. शिवाय प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते. त्यामुळे मजेत जगण्याचं ‘रोल मॉडेल’ असू शकत नाही. मात्र जगणं यशस्वी करून गेलेल्या विविध क्षेत्रातील लहान थोरांचे अनुभव, त्यांचे विचार अतिशय सोप्या शब्दात लेखकाने मांडले आहेत. खरंच, या पुस्तकांने जगण्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून टाकला. प्रत्येकाने एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा वाचावे असे हे जबरदस्त पुस्तक आहे. हे पुस्तक निश्चितच वाचकाचे आयुष्य बदलू शकेल. प्रत्यक्ष व्यवहारात अंगीकृत करण्यासारखे विचार या पुस्तकात लेखकाने मांडले आहेत.

Related Posts

Ek Bhaakr Tin Chuli

Dr. Vitthal Naikwadi
Shareहे पुस्तक म्हणजे फक्त शब्दांची जुळवाजुळव नाही किंवा पानांची गर्दी देखील नाही, हे पुस्तक म्हणजे जणू लेखकाने हातात लेखणीच्या क्रांतीचा...
Read More

उच्च शिक्षा का अंडरवर्ल्ड:इस अंडरवर्ल्ड में गहराई थोडी कम

Dr. Vitthal Naikwadi
Shareमध्य भारत के किसी अनाम विश्वविद्यालय के उपकुलपति (वीसी) डॉ माथुर की कुतिया जिसे विश्वविद्यालय के लोग अदब से जूलिया...
Read More

जीवनशैली

Dr. Vitthal Naikwadi
Shareमानवी जीवनात दैनंदिन सवयीमुळे अनेक गोष्टी ताण-तणाव निर्माण होतात. यामुळे ब्लडप्रेशर, (उच्च रक्तदान),हायपर टेन्शन, मधुमेह , लठ्ठपणा, स्थूलता ,जाडी ,...
Read More