Book Reviewed By: Gadakh Sweta Yadav
Class: – TYBA
Email :- shwetagadakh37@gmail.com
College: GMD Arts, BW Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik
मन मे है विश्वास हे पुस्तक माझ्या आयुष्यातील पहिले पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यापासून मला पुस्तक वाचण्याची गोडी निर्माण झाली आहे. हे पुस्तक विश्वास नांगरे पाटील यांच्या जीवनावर आधारित आत्मचरित्र आहे. स्वप्न हे फक्त बघुन पूर्ण होत नसतात तर त्यासाठी कष्ट, आत्मविश्वास, जिद्द व आपल्या मनाची तयारी असली पाहिजे हे मला या पुस्तकामधून शिकण्यास मिळाले. या पुस्तकामध्ये विश्वास नांगरे पाटील यांचे बालपण पासून ते आयपीएस अधिकारी पर्यंतचा त्यांचा संपूर्ण प्रवास दिलेला आहे. हा प्रवास अनेक प्रकारे स्वप्न बघण्याचे व ते स्वप्न जिद्दीने साकार करण्याचे धाडस देऊन जातो.
त्यांच्या जीवनातील आलेला अनुभव बालपणापासून ते तरूनपणापर्यंतच्या जीवनातील संघर्ष या सर्व बाबींचे वर्णन या पुस्तकामध्ये केलेले आहे. या पुस्तकाचे कथन करत असताना अगदी सहजपणे समजेल व त्यांचे बालपण हे कोल्हापूर मध्ये गेले व त्यातील काही क्षण व त्याचे वर्णन या पुस्तकामध्ये केले आहे. बालपणातील आई-वडिलांच्या सानिध्यातील क्षण व त्यांची लहान भावंडे या सर्वांसोबत असताना खेळले जाणारे खेळ जसे की सुर पारंब्या, लगोरी यासारखे खेळ ते नेहमी खेळत असे. लहान असताना ते प्रत्यकाचे लाडके होते. कोणत्याही बाबी मध्ये नेहमी पुढे असत व शाळेतही ते फार हुशार होते. प्राथमिक शाळेचे शिक्षण पूर्ण करून विश्वास नांगरे पाटील आपल्या आत्याकडे उच्च शिक्षणासाठी जातात. त्यांनी आयुष्यात एक निर्णय घेतला होता. १२ वी झाल्या नंतर त्यांनी बी.ए. ला प्रवेश घेतला. कारण त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती म्हणून त्यांनी बी.ए. राज्यशास्त्र हा विषय निवडला. याआधी त्यांनी. १२ वी पर्यंत त्यांनी विज्ञान घेतले असून १३ वी पासून कला शाखेकडे आले. कारण त्यांना स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करण्यास वेळ मिळावा म्हणून महाविद्यालय असताना त्यांनी भरपूर आनंद घेतला. विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन व्यक्तिमत्व विकास घडविला. भाषण देताना एक आत्मविश्वास निर्माण झाला. प्रत्येक वेळेस पहिल्या नंबरचा विजय मिळवत गेले. अशा प्रकारे महाविद्यालयीन जीवनात ते नेहमी सर्वच गोष्टींमध्ये तत्पर असत. जेव्हा बी.ए. पूर्ण झाले त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेकडे लक्ष दिले व अतिशय मन लाऊन अभ्यास करू लागले. आयुष्यात येईल त्या समस्येला तोंड देत ते परीक्षेला सक्षम झाले. यामध्ये MPSC व UPSC अशा या सर्वाच टॉपच्या परीक्षांचा अभ्यास करून त्याने दोन्ही परीक्षा दिल्या. पण अभ्यास कमी पडल्याने ते परीक्षेत नापास झाले. त्यानंतर दुसऱ्या वेळेस त्यांनी परीक्षा पास करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग या दोन्ही परीक्षा एकाच वेळेस पास होऊन दुहेरी यश संपादन केले.
हार न मानता त्यांनी मनाची तयारी करून दुसऱ्यांदा परीक्षा दिली व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन यशाचे शिखर गाठले. त्यांच्या या प्रवासामुळे व त्यांच्या आत्मविश्वासामुळे ते सर्वांसाठी एक आदर्श व्यक्तीमत्त्व बनले. त्यांच्या संघर्षमय जीवनाची खूप मोठी कहाणी या पुस्तकामध्ये दिलेली आहे. हे पुस्तक वाचताना एक नवीन आत्मविश्वास वाढतो. जीवनात जर यश मिळवायचे असेल तर काही गोष्टीचा त्याग करणे म्हणजे यशाच्या दिशेने एक पाऊल टाकने. या पुस्तकामध्ये त्यांनी वर्णन केलेले लक्ष हे अतिशय प्रेरणादायी आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वात अनमोल वेळ कशाप्रकारे सतकर्मी लावायचा, यश मिळविण्याच्या खऱ्या पायऱ्या कोणत्या त्या दिशेने जायचे, कसे प्रयत्न करत राहायचे या सर्व गोष्टींचे अतिशय सोप्या पद्धतीने वर्णन केलेले आहे. मित्रांसोबत जास्त वेळ न घालवता आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करायचा व जीवनात जे साध्य करायचे आहे तो पर्यंत कोणत्या मार्गाने प्रवास करायचा असा उत्तम अनुभव त्यांनी या पुस्तकांमध्ये मांडला आहे. अशाप्रकारे मन मे है विश्वास हे खुप प्रेरणादायी पुस्तक आहे. हे पुस्तक विद्यार्थी जीवनातील सर्व मुला / मुलींनी एकदा जरूर वाचावे असे मला नेहमी वाटते.