मन में है विश्वास’ हे आय. पी. एस. अधिकारी मा. श्री. विश्वास नारायण नांगरे पाटील यांचे हे पुस्तक त्यांच्या अस्सल अनुभव व मनाला घट्ट पकडून ठेवणा-या लेखनशैलीमुळे चांगलेच गाजते आहेस्पर्धा परीक्षातून स्वत:चे ध्येय साध्य करून नशीब अजमावणा-या खेड्यापाड्यातील असंख्य तरुणांना हे पुस्तक मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शकाच्या भूमिकेतून प्रोत्साहन, जिल्ह्यातील कोकरूडसारख्या छोट्या खेडेगावापासून दिल्लीच्या अंतिम मुलाखतीपर्यंतचा प्रवास व नंतर २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्यावेळी मृत्यूसमोर दिसत असताना त्यांनी केलेला जिगरबाज प्रतिकार इ. संबंधीचे वर्णन एखादया चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असेच आहे.
श्री. विश्वास नांगरे पाटीलसाहेब यांनी कला, क्रीडा, साहित्य, सेवा, संस्कृती इ. क्षेत्रात मुलुखगिरी केली. प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या बाबी त्यांनी स्वीकारल्या. ते सिनेमे पाहायचे पण पाहिलेल्या प्रत्येक सिनेमातून त्यांच्या जीवनाला आधार व आकार देतील अशी वाक्ये ते सुविचारासारखी वहीत लिहून ठेवीत. अभ्यास, व्यायाम, आहार, सकारात्मक दृष्टिकोन व चिकाटी ही पंचसूत्री त्यांनी युवापिढीला दिली आहे हे मात्र खरे! मित्रांनो यश असं मिळवायचे असते. लेखकाच्या बावनकशी अनुभवावर आधारलेले हे पुस्तक हे पुस्तक वाचलेच पाहिजे