ऋतुजा रंधवन दुसरे वर्ष बी.कॉम. एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आळंदी (देवाची) पुणे
पुस्तक परीक्षण
साल १९९२ बंगलोर मधील एका हॉस्पिटल मधून एक पिता आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन अचानक गायब होतो आणि तो येतो सह्याद्रीच्या जंगलात कशाला तर निळावंती ग्रंथाचा
शोधात हो हा तोच ग्रंथ आहे याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. निळावंती म्हणजेच पशुपक्ष्यांशी बोलणारी जिच्या नावाने निळावंती ग्रंथ आहे. निसर्गातल्या प्रत्येक जीवाला
त्याच्या मधल्या चेतन्याची जाणीव करून देणारी ही आदिमाया म्हणजेच महामाया निळावंती तिला पशु पक्षांची भाषा समजते आपला दख्खनच्या भागात वेगवेगळ्या रूपात पिढ्यानपिढा सांगितली जाणारी ही कथा हा ग्रंथ जो कोणी वाचतो त्याला एकतर वेड तरी लागतं नाहीतर तो स्वतःचा आयुष्य तरी गमावतो विशिष्ट विधी करून जर हा ग्रंथ वाचला तर वाचणाऱ्याला प्राण्यांच्या भाषेची सिद्धी मिळते. पण या फक्त वर्षा आणि वर्षांपासून ऐकत आलेल्या आजी आणि पणजी आजी यांच्यापासून ऐकत आलेल्या दंतकथाच आहे या किती खऱ्या किती खोट्या याबद्दल माहिती नाही पण लेखक ही निळावंतीची कथा खरी असल्याचे सांगतात. तो याच ग्रंथाच्या शोधात सह्याद्रीत येतो पण त्याला सापडते ते खुद्द निळावंती.एक गोष्ट सांगितले जाते ४०० वर्षांपूर्वी बाजीने निळावंतीला मारून टाकलं तर बाजूने निळावंतीला मारलंय तर विक्रमला सापडते ती कोण? जर ती खरच निळावंती आहे तर ती आत्तासुद्धा सह्याद्रीच्या जंगलात आहे का? आणि मग तिची भाषा कोणती?
फार पूर्वी भिलम राजा निळावंतीसाठी सह्याद्रीत आला त्यानंतर ४०० वर्षांपूर्वी बाजींद आला आणि आता विक्रम ही कथा गोल चक्रविवा सारखी गुंतलेली मिस्टरी, सस्पेन्स, लव, पॅरेलल युनिव्हर्स, इमोशन, डिटॅचमेंट अटॅचमेंट, या सगळ्या गोष्टी यात आहेत. या प्रवासात विक्रमला वेगवेगळ्या लोकांना सामोरे जावे लागते कथा पुढे बरेच वळण घेते का त्याची वळण मध्येच कधीकधी कंटाळवाणी वाटतात पण जिथे सगळ्या गोष्टी एकत्र येतात तो शेवट खूप छान वाटतो.मला तो खूप चांगला वाटला पुस्तक लिहिण्यासाठी घेतलेले लेखकाची मेहनत जाणवते. लेखकाने यात निळावती चंपू यामधील काही भाग पण दिलेला आहे. पृथ्वीच्या उगमापासून सुरू झालेला प्रवास तो असा सुरू राहतो. इतिहास आणि इंडोलॉजीच्या अभ्यासकांना भेटून त्यांनी याबद्दलची माहिती गोळा केली असावी. या पुस्तकाचे वर्णन अनेक जण सायफाय म्हणजे विज्ञान कथा असं करतात तरी यातील विज्ञान कथेचा भाग हा जेमतेमच आहे. अशी पुस्तक मराठीत भरपूर यावेत असं वाटतं. एकदा हातात घेतल्यानंतर ही कादंबरी संपेपर्यंतच वाचत राहावे असे वाटते . पुस्तकाचे मुखपृष्ठ केलंय पियुष मोरे. तुम्हाला निळावंती बद्दल उत्सुकता असेल तर महामाया निळावंती सुमेध यांनी लिहिलेलं हे पुस्तक एकदा नक्की वाचा.