Share

Review By Mrs Jagtap Nilam Kashiram, Baburaoji Gholap College, Pune
‘महाराज्ञी येसूबाई’ ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी असून बालवयातील जाऊबाई लग्नानंतरच्या येसूबाईं होय. वडील पिलाजी शिर्के यांनी वयाच्या सहाव्या वर्षी येसूबाई शिर्के यांचा विवाह शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी राजे यांच्याशी करून दिला. आणि नववधू म्हणून त्या रायगडावर आल्या. शिक्षणाला महत्त्व देऊ पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजे व येसूबाई यांचे शिक्षण सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाबाई यांच्या सहवासात येसूबाईनी बारकाईने राजनीतीचे व राजकारणाचे निरीक्षण किशोर वयातच सुरू केले. त्यांच्या या शिक्षणाचा उपयोग त्यांनी भविष्यात आलेल्या संकटांचा धिरोदात्तपणे व मुत्सद्देगिरीने सामना करण्यास केला. संभाजी राजे पहिले अभिपित युवराज झाले, राजपुत्र असल्याने सौभाग्य संपन्न येसूबाई महाराजांच्या पहिल्या अभिपित युवराज्ञी झाल्या.
काही कालखंडानंतर पिलाजी शिर्के औरंगजेबांना मिळाल्यानंतर देखील येसूबाईंनी संभाजी महाराजांची साथ सोडली नाही. त्यांना बाहेरील व घरातील अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. संभाजी महाराजांना कैदी केल्यानंतर त्यांना मरण यातना अपमानकारक धिंड त्यांचा हाल हाल करून केलेला वध या महाभयंकर प्रसंगातही या रागिनीचे धीरोदत्त व पराकोटीच्या सहनशीलतेचे दर्शन घडते. त्यांनी महाराणी या नात्याने घेतलेले अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देते.
पुत्र प्रेमापेक्षा स्वराज्य प्रेम येसूबाईंच्या निस्वार्थी वृत्तीचे दर्शन घडविते. जीवित व अब्रूला घाला बसणार नाही या अटीवर त्या शत्रूच्या ताब्यात गेल्या. इसवी सन १६८९ ला येसूबाई व शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत होत्या. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली. ती १७०० मध्ये संपुष्टात आली. तदनंतर ताराबाईंच्या कर्तृत्वाचा व कीर्तीचा शेवट इ.स. १७०७ मध्ये झाला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली. पण येसूबाईंना मोगलांनी ओलीस ठेवले. इ.स .१७१९ पर्यंत तीस वर्ष मराठ्यांच्या राणीने कैदेत काढले. भिन्न भाषा, भिन्न व्यक्ती, भिन्न संस्कृती आणि वासनेच्या विषारी दर्प दिवस काढले याची कल्पना आपण करू शकत नाही. त्यानंतर १७ वर्ष दक्षिणेस, उर्वरित आयुष्य उत्तर दिल्लीत कैदेत काढले. बादशहाने नजरबंदी केलेले असल्यामुळे बादशहाची छावणी ज्या ठिकाणी असेल तेथे येशुबाई व शाहू महाराजांना जावे लागत. अशा परिस्थितीत मराठ्यांच्या राणीला उपासमार, हालअपेष्टा यासारख्या गोष्टीलाही सामोरे जावे लागले. अशा कठीण प्रसंगी ही येशूबाई आपल्या निर्णयाप्रती ठाम उभ्या राहिल्या.
संभाजी राजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांना सलग तीस वर्ष शत्रूच्या कैदेत काढावे लागले. अशातही शत्रूच्या छावणीत स्वाभिमानी बाण्याने राहिल्या. आपले सत्व, अस्मिता टाकली नाही. पण जिद्द आणि अशावाद सोडला नाही. तसेच स्वराज्याचे स्वप्न व धर्मनिष्ठेपासून दूर गेल्या नाहीत. त्या धैर्याच्या मुत्सद्देगिरीत आणि शौर्याच्या परंपरेत कायम राहिल्या. येसूबाईंच्या आयुष्यात अनेक संकटे आली. त्यांच्या जडणघडणीची सुरुवात वैभवशाली होती व अंत मुलांच्या वैभवाच्या उत्कर्षाचा आहे. येसूबाईंच्या जीवनाचा खोल विचार केला तर मराठ्यांच्या इतिहासात सोशिक, सज्जन, सोज्वळ, सात्त्विक, धीरोदत्त, निस्वार्थी वागणुकीने मराठी साम्राज्य उभे करण्यासाठी अपूर्वत्यागाने तीस वर्ष कारावास स्वीकारला. अशा येसूबाईंची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे. महाराज्ञी येसूबाई हे पुस्तक वाचकांनी नक्की वाचले पाहिजे. ज्यातून आपल्याला येसूबाईंच्या इतिहासाची ओळख होईल.

Recommended Posts

उपरा

Dr. Vitthal Naikwadi
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Dr. Vitthal Naikwadi
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More