अमोल जयप्रकाश खेसे Clerk Rajgad Dnyanpeeth Technical Campus Dhangwadi औरंगजेबाचे जीवन चरित्र मुकद्दर या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय सोप्या, सरळ भाषेत अभ्यासपूर्ण आणि संदर्भासहित रेखाटण केलेला सहकारी मित्र तरुण लेखक स्वप्नील कोलते. हा आज आपल्यामध्ये नाही ये याची खंत नेहमी राहते . २६ जानेवारी २०२१ रोजी एका रस्ते अपघाताने मराठी साहित्यक्षितिजावर स्वकर्त्तृत्वाने उगवणारा तारा हिरावून नेला. त्याच्या मुकद्दर ( कथा औरंगजेबाची ) या पुस्तकाचा थोडक्यातघेतलेला आढावा.
औरंगजेब नाव घेतले तरी डोळ्यासमोर उभा राहतो मध्ययुगीन कालखंडातील एक धर्मांध, क्रूर, जुलमी हुकूमशाह.हि सर्व सामान्य भारतीयांच्या मनात असलेली त्याची प्रतिमा. पण औरंगजेब कोण होता कसा होता याचे व्यक्तीगत असणारे गुण दुर्गुण याच्यावर सविस्तर प्रकाश या पुस्तकाच्या माध्यमातून टाकण्यात आला आहे. खरे पाहायला गेले तर पुस्तक वाचताना औरंगजेबाची आर्थिक, ,धार्मिक , सैनिकीय , राजकीय, दहशत, कुशाग्र सेनानी , याची उंची लक्षात येते. आणि छत्रपती शिवरायांबद्दल मनामध्ये चेतना फुलकित होते आणि मन विचार करू लागते मर्यादित साधन सामुग्री , तुटपुंजेजे राज्य , अपूरे सैन्यबळ या सर्व गोष्टीअसतानां देखील आशिया खंडातील सर्वात मोठे साम्राज्य असणाऱ्या मुघल बादशाह औरंगजेब यास शिवाजी महाराजांनी अंगावरती घेण्याचे फक्त धाडस नाही केले तर महाराज त्यांच्यावर नेहमी सरस ठरले मग आता विचार करण्यास हे पुस्तक भाग पडते की, छत्रपती शिवाजी महाज काय असतील. एवढ्या मोठ्या शत्रूला नामोहरम करणारा माझा राजा किती कर्तृत्ववाण असेल. महाराजांचा संघर्ष हा आशिया खंडातील सर्वात सामर्थ्यवान सुलतान विरुद्ध होता. तो क्रूर होता , धूर्त होता , कपटी होता आणि भयंकर महत्वकांक्षी होता. थंड रक्ताचा आणि धोरणी मेंदूचा राजकारणी होता . सर्व त्याच्या शत्रुंना, भावांना , वडिलांना, आणि प्रत्येक राजशक्तीला संपवून तो आलमगीर बनला होता. अश्या बादशाहास नामोहरम करण्याचे महान कार्य महाराजांनी केले . तो किती महत्वकांक्षी होता स्वतःच्या सख्या भावांची मुंडकी भाल्याच्या टोकावर मिरवीत आनंदोउत्सव साजरा करत होता. जन्मदेत्या पित्याला शेवटच्या श्वासापर्यंत बंदिवान बनवणारा हा क्रूरकर्मा , प्रचंड धर्मांध इतर धर्मियांबाबत द्वेष मत्सर आणि तिरस्कार असणारा क्रूर हुकूमशाह . महाराजांच्या देहावसनानंतर तो स्वराज्य जिंकण्या करीता दक्षिणेत मोठ्या सेनासागरासह प्रचंड धन संपत्ती घेऊन उतरला. किती तरी शतके जुनी राजसत्ता निजामशाही, कुतुबशाही काही दिवसात जंकून घेतली. परंतु ४५ ते ४५ वर्ष वय असणारे स्वराज्य औरंजेबाला जिंकता आले नाही . त्याची सर्व संप्पती प्रचंड सेना हत्ती,घोडे ,तोफा , देशी विदेशी सरदार सर्व काही या रांगड्या दगड धोंड्यांच्या महाराष्ट्रात प्रभावहीन ठरले. जीवना ची शेवटची २७ वर्ष जे काही प्रचंड हाल अपेष्टा संघर्ष औरंजेबाच्या वाट्याला आला याचे वर्णन या पुस्तकातून वाचून स्वराज्याचे शिलेदार आपले तत्कालीन पूर्वज संभाजी राजेंच्या मृत्यू नंतर हि रा जा व्यतिरिक्त या बादशहाला कसे झुंजवत ठेवतात याची रोमहर्षक मांडणी या मध्ये केली गेली आहे. शेवटी स्वतःला नियती म्हणजेच मुकद्दर समजणारा औरंगजेब बादशाह स्वतःचे मुकद्दर सुद्धा लीsहु शकला नाही . शेवटी याच महाराजांच्या मावळ्यांनी , सह्याद्रीने पहाडांनी या महारष्ट्र भूमीत त्याचे मुकद्दर लिहले. मराठ्यांची वीर गाथा आणि हतबल औरंगजेबाची आप बीती या चरित्राच्या माध्यमातून म्हणजेच मुकद्दर . . . .
जय शिवराय … ..