Shinde Aradhya Nandkumar : B.S.c(cs)First Year ,
COLLEGE OF COMPUTER SCIENCES WAKAD,PUNE
मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहलेली आहे. सावंतानी धैर्यवीर शूरवीर मृत्युवरही वीजय मिळवणाऱ्या कर्णाचा जीवन प्रवास त्या पुस्तकात अत्यंत सुंदर प्रकारे मांडला आहे. मग कर्णाच्या आयुष्यातील चांगला वाईट गोष्टींचे वर्णन मृत्युंजय मध्ये केलेले आहे.
मृत्युंजय या कादंबरीला १९९६ सालचा मूर्तीदेवी पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. पुस्तकाचे मुख पृष्ठ अत्यंत सुंदर आणि कर्ण ही व्यक्तीरेखा स्व. दिनानाथ दलाल यांनी साकारले ली दिसून येते. मृत्युंजय पुस्तकाचे आणेक वैशिष्टे आहेत त्यातील अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पुस्तकातील जिवंत भास निर्माण करणारी चित्रे व तसेच पुस्तकातील भाषांतराला सुद्धा बऱ्याच ठिकाणाहून गौरवन्यात आलेले आहे.
मृत्युंजय हे पुस्तकाच नाव कर्णाच्या जीवनावर आधारीत आहे हे जाणवते. मृत्युवरही विजय मिळवणारा म्हणजे मृत्युंजय आणि मृत्युंजय म्हणजेच कर्ण. कर्ण हा सूर्यपुत्र म्हणून ओळखला जातो सूर्य आनी कुंती हे , कर्णाचे खरे माता पीता आहेत हे आपल्याला ह्या पुस्तकातून समजते. कर्ण आपल्या खऱ्या आईला सगळ्यात शेवटी भेटतो आणि त्याला नंतर जाणवते की तो ज्यांच्याशी भांडतोय ते दूसरे तिसरे कोणी नसून आपलेल सावत्र भाऊ आहेत (पाच पांडव )
कुंतीला सूर्यदेव म्हणाले मी तुला एक दानशूर पुत्त्र देतो, आणि कालांतरानी तिच्या पोटी एक मुलगा जन्माला आला त्याला जन्मताच कवच होते कुंतीने त्याला गंगेत बुडवले.त्यानंतर धृतराष्ट्राचा सारथी गंगेत घोड्याला पाणी पाजत आसताना त्याला हा मुलगा सापडतो त्या सारथ्याला कोणताही मुलगा-मुलगी नसते त्याने त्याला घरी नेले, आणि त्याचे नाव कर्ण ठेवले, कर्णाला लहानपणापासून वडिलांन सारखाच युध्यकलेत खूप आवड होती. त्यानंतर कर्णाची द्रोणाचार्य यांच्याशी भेट झाली द्रोणाचार्य ते त्या काली सगळ्या राजकुमारांना शिकक्षण देत आसत. द्रोणाचाऱ्यांच्या भेदभावामुळे कर्ण हा परशुरामांचा शिष्य होता एकदा हास्तनापुरात स्पर्धा घेण्यात आली दुर्योधनाला त्या स्पर्धेत कर्णाने हरवून विजय मिळवला तेव्हा दुर्योधनाने कर्णला अंगराज म्हणून घोषित केले जेने करून, पांडवांशी युद्ध करण्यात कर्णाची मदत होईल. या नंतर दुर्योधन आणि कर्ण चांगले मित्र झाले.
पुस्तकात फक्त कर्ण आणि दुर्योधन नव्हे तर कर्णाच छोटा भाऊ म्हणजेच शोण हा कर्णाचा लहान भाऊ आसल्याने अतिशय विलोभणीय आहे. अर्थातच शोणाला कर्णचा खूप अभिमान सतत दादा दादा करणारा हा शोण खूप सुंदर प्रकारे मांडला आहे.
फक्त शोणच नाही तर कुंती चा जीवन प्रवास ह्या पुस्तिकात पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचवला आहे. कर्ण म्हणजेच कुंतीचा आपला मुलगा आहे हे कुंतीला खुप शेवटी जाणवतं आपला सूर्यपुत्र दुसरा तिसरा कोणी नसून कर्ण हाच आहे. जो दुर्योधना सोबत राहून आपल्या पाच पूत्रांशी युद्ध खेळत आहे तो कर्ण. कानात अत्यंत सुबक आणि देखने कवचकुंडलं आसलेला कर्ण हा कुंतीचाच मुलगा आहे त्याचा उलगडा मृत्युंजय कादंबरीतून होतो.
कर्णाच्या कवचकुंडल किती सुंदर असतील हा विचार आपल्या मनात येतो हे पुस्तक वाचताना आपण फक्त कर्णला कर्णच्या दृष्टीकोनातून न पाहता, कर्णा बद्दल स्वार्थी भावनेने मैत्री करण्याऱ्या दुर्याधनाच्या, कुंतीच्या, आपल्या लहान भावाच्या शोणाच्या तसेच वृषालीच्या आणि महत्वाचे म्हणजे श्रीकृष्णाच्या नजरेतून सुद्धा पाहायला लागतो. मृत्युजय या कादंबरीतून जसे आपण कर्ण या व्यक्तीला सगळ्या दृष्टीकोनातून पाहतो तसेच रोजच्या आयुष्यात सुद्धा आपण एका घटने कडे चांगल्या वाईट दृष्टीकोनातून पाहायला शिकतो. वरकरणी पाहता पुस्तकाची भाषा जरा आवघड वाटतही आसली तरी एकदा पुस्तक वाचायला घेतल्यावर आपल्याला तंद्री लागते आणि पुस्तकाचे जाड पणाचे भूत आपसूक उतरतं.
कालांतराने आपण जे कोणी व्यक्ती आसू ती व्यक्ती पुस्तकातील पात्रास जवळून पाहते. तुम्ही ह्या पुस्तकाच्या प्रेमात नक्कीच पडाल ही माझी खात्री आहे.आपली शब्दसंपदा चांगली व्हावी आणि आपल्याला महाभारताचा उलगडा व्हावा हया साठी मृत्युंजय प्रत्येकाने नक्कीच वाचायला हवे. असे म्हणतात पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त होते आणि सशक्त मस्तक डोळे झाकून कोणापुढे नतमस्तक होत नाही”आपण प्रत्येक गोष्टीकडे पुस्तक वाचल्याने सकारात्मक दृष्टीकोनाने बघायला शिकतो जसे या पुस्तकात आपण एकाच व्यक्तीरेखेकडे अनेक दृष्टीकोनातून पाहीले. तसेच आपल्या दैनंदिन आयुष्यातही अनेक गोष्टीना अनेक दृष्टीकोन आसतात हा फक्त तो दृष्टीकोन आपल्याला वाचता यायला हवा. खरच नाण्याला दोन बाजू आसतात आणि नान्याच्या दोन्ही बाजू समजण्यासाठी वाचनाचा फार मोठा वाटा आहे.
आपल्या आयुष्यात कर्णा प्रमाणेच अनेक व्यक्तीरेखांच्या उलगड्यासाठी पुस्तक वाचायलाच हवे आणि त्याची सुरुवात “मृत्युंजय” याने झाली तर अती उत्तम.