मृत्युंजय कादंबरी हि शिवाजी सावंत यांनी भारतीय इतिहासातील सर्वात महान नायक कर्णाच्या जीवनावर लिहलेली एक सर्वउत्कृष्ठ कादंबरी आहे. यात कर्णाचे जीवन आणि काळ तसेच महाभारतातील महत्वपूर्ण पत्रे तसेच त्या काळातील सामाजिक, राजकीय चौकट यावर प्रकाश टाकलेला आहे. सुरवातील कर्ण हा पांडव राणी कुंती आणि सूर्यदेव यांचा जेष्ठ पुत्र आहे. कुंती अपमान व भीतीपोटी आपल्या पुत्राला एका पेटीत टाकून दासीकडे सोडून देण्यासाठी देते. हस्तिनापुरातील अधिरथ व राधा यांना त्यांचा शोध लागून ते त्याचे पालनपोषण करतात.
मृत्युंजय हि कादंबरी कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. या पुस्तकामध्ये प्रामुख्याने सहा पत्राच्या दृष्टिकोनाचा विचार केला आहे. सुरवातीला कर्ण त्याचा दृष्टीकोन लिहितो. त्यानंतर त्याची आई कुंती, दुर्योधन ,वृषाली, शोन आणि भगवान कृष्ण यांचे मनोगत व दृष्टीकोन यात पाहायला मिळतो.
लेखक शिवाजी सावंत यांनी मानवी समाजातील एक सर्वात मोठ्या वास्तवाला स्पर्श केला असून हि कादंबरी आपल्याला एक समाज म्हणून एखाद्याबद्दल आपले मत तयार करण्यासाठी त्याच्या वास्तविक वर्तनाची किवां मूल्याची पर्वा न करता त्यांच्या पार्श्वभूमीवर असामान्यपणे कसा भर देतोहे स्पष्ट केले आहे.
अस्तित्वाचा शोध घेताना समाजात किती वेगवेगळ्या गोष्टी घडून येतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे असे म्हणयला हरकत नाही. तसेच हि कादंबरी मानवी मानसिकतेचा एक उलेखनीय शोध आहे. मृत्युंजय हे सर्वात स्पष्टपणे वर्णन केलेल्या पुस्तकापैकी एक महत्त्वाचे पुस्तक आहे. विद्यार्थी तसेच वाचकांच्या वाचन संग्रहात समाविष्ठ असावे असे पुस्तक आहे.