Aishwarya Divate, B.Sc,Sinhgad College of Science,Pune
महाभारतातील ‘कर्ण’ या व्यक्तिरेखेवर आधारित शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी २४ सप्टेंबर १९९५ रोजी या पुस्तकाला ‘भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे मुर्तीदेवी पुरस्कार जाहीर झाला .
महाभारतातील सामान्यतः सूतपुत्र म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते . तो सुर्यपुत्र असूनही कोणाला परिचित नव्हता. पण शिवाजी सावंत यांची मृत्युंजय कादंबरी हाती घेतले आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलघडले गेले.कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधीच नव्हता हे या रेखाटलेल्या कादंबरी तुन कळते.
कुरुक्षेत्रावर घडलेली महत्वाची घटना, कौरव – पांडवाच्या यूध्दाची सतरावा दिवस वेळ जवळ-जवळ संध्याकाळची सारि योध्दै स्तब्ध होते . सारं जगांवर काळोक मांझलेला होता. रक्ताळलेला कर्ण जमीनीवर आपले शेवटचे क्षण मोजत होता. त्यांच क्षणी एका वृद्धानी दिलेला हाक, कोण आहे का दानवीर या कुरुक्षेत्रावर मला मदती- साठी. ती हाक कर्णाच्या कानावर पडली व त्यांनी त्याला बोलावले व याचकास इच्छा विचारली. त्या क्षणी कर्णाकडे देण्यासाठी, काहीच नव्हते. ज्या कर्णानी आपल अभेद कवच कुंडल इंद्राला दिलेल होता असा दानवीर कर्ण अता कसा काय त्यांच्या संपूर्ण आयुष्याला काळीमा लावू दिला असता. हि गोष्ट अशक्य होती?. त्या सुर्यपुत्र कर्णानी आपल्या मुलाला जवळ बोलावलं व त्यांच्या तोंडातील सोनेरी दात काड अशी आज्ञा दिली. अश्या या घायाळ अवस्थेत सुध्दा दानशूर कर्णानी आपला कर्तव्यापासून लांब नाही गेला. व त्यांनी आपले सोनेरी दात दान केले व आपला प्राण त्यागला.
लेखकांनी उत्तम असे वर्णन केलेले आहे. कादंबरी च्या प्रत्येक पानावर कर्णाच्या वाट्याला आलेला संघर्ष. त्याचे बालपण. व त्याला मिळालेली वरदान व जमदग्नी पुत्र परशुरामाकडून प्राप्त केलेली शिक्षा, पांडव व समाजानी केलेला अपमान, द्रौपदी वस्त्रहरण, या सर्व शोष्टी आपल्याला माहितच आहेत. यातील अनेक दडलेल्या गोष्टी या कादंबरीतुन लेखकांनी व्यक्त केलेले आहेत. कर्णाच्या वाट्याला अनेक संघर्ष आले .प्रत्येक संघर्ष यातनादायी होता. तरीही त्यांनी आपला धर्म ,कर्तव्य याचा कवडीमोलही त्याग केला नाही. कर्णाचे जीवन हे मनाला हेलावणारी व यातनादायी होते. त्यांच्या जीवन संघर्षातुन आपल्याला खूप काही शिकायला भेटत .
कादंबरीत लेखकांनी प्रत्येक गोष्टीचा जरा जास्त बढ़ावा केलेला आहे. हे पुस्तक वाचताना मला असे वाटायचे की मीही कुरूक्षेत्रातील पात्र आहे. पुर्णपणे त्या प्रत्येक घटनेचा मी वाचनातून अनुभव घेतला आहे. मला असे वाटते ही कादंबरी युवकाच्या हातात दिली पाहिजे. कारण यात संकटाला कसे सामोरे जावून आपले अस्तित्व निर्माण केलेल्या रविपुत्र कर्णाचा वर्णन आहे .ही पुस्तक युवकांना मार्गदर्शन ठरेल .अशा या महावीर कर्णाचे जीवनपट वाचताना वाचकांचे मन तासन् तास गूंतवून ठेवते. ही कादंबरी आज अनेक भाषेतून उपलब्ध आहे.