Book Review:Kaveri Lalchand Deore, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana
मी हे पुस्तक निवडण्यास कारण असे की, मला पराक्रमी आणि धैर्यशाली व्यक्तिच्या कथा वाचण्यात आवड आहे. त्यांच्या सद्गुणांचा वापर आपण आपल्या जीवनात कसा करू शकतो हेही – मला या पुस्तकातुन समजते.
सारांश – प्रस्तुत पुस्तक ‘मृत्युंजय’ या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे ‘मृत्युंजय’ म्हणजे मृत्युवरही विजय मिळवणारा असा महान, पराक्रमी, दानशूर सूर्यपुत्र कर्ण’ याची कथा या पुस्तकात दिलेली आहे. या पुस्तकात कर्ण, कुती, वृषाली, शोण, श्रीकृष्ण आणि दुर्योधन हे महत्वाची पात्रे असून विविध पात्रांचे वर्णण केले आहे. परंतु कर्ण या पात्रावर अधिक भर दिलेला आहे. प्रस्तुत पुस्तकात कर्ण या योध्याची कथा दिलेली आहे त्यामध्ये त्याची जन्म कुठे झाला, त्याचे संगोपण कोणी केले, तो हस्तिनापूर येथे जाऊन त्याची दुर्योधना सोबत मैत्री कशी झाली ते दिलेले आहे. त्याची पत्नी वृषाली, कर्ण याने इंद्रदेवाला दान केलेली कवचकुंडले याचेही वर्णन केलेले आहे. कर्णाला ‘राधेय कर्ण’ म्हणून ही ओळखले जायचे. गुरु द्रोणाचार्यांनी त्यांच्या कार्याचा अपमान व दुर्योधनाशी जपलेली आपली मैत्री वृ कुरुक्षेत्रात गमावलेले त्याचे प्राण या सर्व गोष्टीचे वर्णन ह्या पुस्तकात केले ले आहे.
विश्लेषण:- वातावरणनिर्मितीसाठी या कादंबरीत काही कठीण शब्दही वापरलेले आहेत तसेच त्यांचा सुलभ अर्थही दिलेला शाहे. या पुस्तकाची रचना सुटसुटीत व सुसंगत पद्धतीने केलेली आहे लेखकांनी पुस्तकाची रचना खूपच भावनात्मक स्वरूपाने केलेली आहे कारण जेव्हा मी हे हे पुस्तक वाचले तेव्हा काही संदर्भ वाचून मला असे वाटले की जणू हे जीवंतपणे खरोखरच घडत आहेत. मृत्युंजय ह्या कादंबरीत कर्णाची संपूर्ण जीवनकथा दिलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की, कूर्ण हा सूर्यदेवाचा पुत्र आहे हे खरच आहे, पण तो कुंतीचाही पुत्र आहे. मग आपल्या मनात् एक प्रश्न ही पडेल की कुंतीचा पुत्र कसा? तर दुर्वासा नावाचे एक ऋषी होते आणि ते कुंतीलो म्हणाले होते की कुती मला तुला एक वरदान दयायचे आहे. यावर कुंती म्हणाली की हो गुरुदेव मला तुम्ही असे वरदान दया की जे माझ्या भविष्यात कामी पडेल. दुर्वासा ऋषी कुंतीला एक मंत्र सांगतात आणि सांगतात् की तू हा मंत्र जपल्याने कोणत्याही देवाला बोलवले तर तो देव तुझ्या समोर प्रकट होणारच. मग कृतीला असे वाटते की आपण या मंत्राचा प्रयोग करुण बघु ती मंत्र जपते आणि सूर्य देवाला बोलवते सूर्यदेव प्रकट होतात. तीला खूप आश्चर्य होते सूर्यदेव तीला विचारतातू तू मला का बोलवले कुंती सांगते की दुर्वासा त्रऋषींनी मला वरदान दिले होते आणि मी त्याचा प्रयोग करून बघत होती. कुती सूर्यदेवाला परत जाण्यास सागते. पण सूर्यदेव एकत नाहीत व म्हणतात की मी तुला काही न देता मुळीच जाणार नाही कारण यामुळे दुर्वासा ऋषींनी तुला दिलेल्या वरदानाचा भंग होईल. सूर्यदेवाने दिलेल्या वरदानामुळे कुंतीस लग्नाआधीच पुत्र प्राप्ती होते.
समाजाच्या भीतीने कर्णाला एका टोपलीत ठेऊन त्याला नदीत वाहून देत. कर्णाला जन्मताच कवच-कुंडल असतात. कवच-कुंडल असलेल्या बाळाची ती टोपली अधिरथ आणि राधा या नावाच्या व्यक्तींना सापडते ते दोघे कर्णाचा संगोपन करतात. ते चंपानगर चे रहिवासी असतात त्यांना शोण नावाचा एक मुलगाही असतो. कर्ण भाणि शोण या दोघांचे बालपण चंपानगरीतच पूर्ण झाले अधिरथ हे हस्तिनापूरचे राजा यांचे सारथी होते त्यांच्यासोबतच एकदा कर्ण हस्तिनापूरला गेला आणि दुर्योधनाशी त्याची मैत्री झाली होती. वृषाली ही त्याची पत्नी होती, आणि सुदामन हा त्याचा पुत्र, एकदा इंद्रदेव एका ऋषीचे रूप धारण करून कर्णाच्या घरी आले त्यांनी कर्णाकडे त्याचे कवच-कुडल मांगितले त्याने ते हसत-हसत त्या ऋषीला देऊन दिले. नंतर त्यास समजले की हे इंद्र देव आहेत. दुर्योधनाची आणि कणाची चांगली मैत्री असण्याचे एक कारण असे आढळून येते की, दुर्योधन कर्णाला हीन, किंवा कमी लेखत नव्हता, तो त्याचे कधीही अपमान करत नव्हता, बाकीचे सर्व लोक त्याला हीन, किंवा क्षत्रियकुळातला नसलेला आणि आणि एका सारथीचा मुलगा म्हणून त्यास हिनवले जात असे याचा कर्नाला राग यायचे. गुरु दोणाचार्यांनीही कर्णाचा अपमान केला होता, समाजातील बऱ्याचा लोकांनी अपमान केला होता त्याला ह्या गोष्टीचे वाईट वाटायचे पण तो खंबीरपणे त्यागोष्टीनां नाकारायचा, कर्ण हा एक चांगला धनुर्धर व श्रेष्ठ योद्धा होता. एकवचनी व्यक्ति, दानशूर तसाच धैर्यवान योद्धा होता. शेवटी कुरुक्षेत्रात झालेल्या युद्धात आपल्या मित्राच्या बाजूने, दुर्योधनाच्या बाजूने लढत असताना तो मृत्यू पावतो. आणि ह्यो पराक्रमी योध्याला मी खरोरच नमन करते
निष्कर्ष- मी ह्या पुस्तकातुन घेतलेली शिकवण अशी की आपल्याला सगळ्यांना असे वाटते की आपल्याच आयुष्यात दुख आहेत व वेदना आहेत परंतू तसे काही नसते प्रत्येकाच्या आयुष्यात संकट असतात कर्णाच्या आयुष्यात किती संकट, दुःख , वेदना होत्या परंतु कर्ण धैर्याने त्या संकटाना सामोरे गेला. खर तर कर्ण आपल्या खऱ्या आईपासून दूर होता, आपल्या भावांपासून दूर होता. कर्णासारख्या दानशूर व्यक्तीकडून जर आपल्याला काही शिकवण ज्ञानाची असेल तर चांगले व्यक्तिमहत्व कर्णासारखे धैर्यवान, एकवचनी, सामर्थ्यवान, आणि प्रामाणिकपणाने मैत्री जपणारा व्यक्ति असायला हवं. खरोखरच मृत्युजय ही कांदबरी सगळ्यांनीच वाचली पाहिजे कारण कर्णासारख्या महान् पराक्रमी, दानशूर व्यक्तिचे सुबद्ध पद्धतीने वर्णन केलेले आहे.