Share

Name:- Joshi Sujit Dhananjay
Dept. of Sociology,SPPU, Pune.
‘ययाती’ ही शिक्षक, लेखक, कवी विष्णू सखाराम खांडेकर यांची १९५९ साली प्रथम प्रकाशित झालेली मराठी आणि भारतीय साहित्यातील एक नामवंत कादंबरी आहे. या कादंबरीच्या पुढे वारंवार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. १९५८ – ६८ या दशकामध्ये भारतीय भाषांतील प्रकाशित सर्जनात्मक साहित्यातील सर्वोत्कृष्ट रचना म्हणुन १९७४ साली या कादंबरीसाठी खांडेकरांना भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुढे हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये तीचा अनुवाद केलेला आहे. मराठी साहित्यातील अनेक साहित्यिकांची आणि वाचकांची ती पहिली पसंती ठरली आहे आणि म्हणुनच गेल्या ६५
वर्षांमध्ये तीचे वाचकवर्गातील कुतुहल तीळमात्रही कमी झाले नाही. कथासुत्र थोडक्यात सांगणे तसे कठीण काम आहे. ययाती नावाचं हस्तीनापुरचा जन्मजात वैभवसंपन्न राजपुत्र जो बालपणीपुसुनच विलासांचा उपभोगता असतो. आंगाखांद्याने भरभक्कम असणारा राजपुत्र पुढे शुरवीर होतो, अश्वमेधाच्या घोड्यासवे तो यशस्वी परीक्रमा करतो ज्यामुळे त्याच्या पराक्रमाची किर्ती दूरदूर पसरते. या परिक्रमेदरम्यान आपल्या जन्मा आधीच सुखाच्या शोधात पळुन गेलेल्या आपल्या मोठ्या भावाशी त्याची
योगवश भेट होते. पुढे देव-दैत्यांचे युध्द टळावे म्हणुन अंगीरस ऋषी करीत असलेल्या शांतीयज्ञाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याला मीळते आणि त्यादरम्यान कच नावाच्या शांत, संयमी, सुस्वभावी, समजुतदार आणि त्यागी बृहस्पतीपुत्राशी त्याची मैत्री होते. यज्ञाचा मुख्य भाग संपला तेव्हा अचानक वडीलांची प्रकृती खालावल्याने त्याला परत हस्तीनापुरला यावे लागते. वडीलांच्या अंतिम काळात त्यांची जगण्याविषयीची आसक्ती, पुर्वकर्मामुळे मिळालेल्या शापाचा खेद, कालचक्र आणि मृत्यूसमोरची हतबलता पाहुन त्याच्या मनात जीवनाविषयी अनेक प्रश्न व मृत्यूविषयी भय निर्माण होते. ज्यापासुनच्या त्रस्ततेचा उपाय म्हणुन त्यांचे पाऊल नकळत मद्य आणी वासनेकडे वळते. पुढे वडीलांच्या मृत्युनंतर तो राजा बनतो. कचाला राज्याभिषेकाचे निमंत्रण असुनही तो येत नाही पण त्याच्याबद्दल त्याला कळते की तो दैत्यगुरू शुक्राचार्यांकडुन संजीवनी विद्याप्राप्तीसाठी दैत्यांच्या राज्यात शिरला आणि दैत्यांकडुन मारला गेला. पुढे शिकारीसाठी फिरत असता तो राक्षस राज्यात शिरतो जीथे संकटात सापडलेल्या शुक्रचार्यांची कन्या देवयानीला तो वाचवतो आणि तीच्या सौंदर्याला भाळुन तीचे पाणीग्रहण करतो. देवयानीचे प्रेम कचावर असते, तीने आपल्या वडीलांना विनवणी करून तीनवेळा कचाला जीवनदान दिलेले असते पण स्वकियांच्या कल्याणाचा हेतु लक्षात घेता त्याने ते नाकारले असते तेव्हा देवयानी त्याला विद्याविफलतेचा शाप देते. कचही तीला कुठलाही ऋषीपुत्र तीच्याशी विवाह करणार नाही असा शाप देतो. प्रेमभंगाने व्याकुळ झालेली देवयानी कचला अपमानीत करून बदला घेण्यासाठी ययातीशी लग्न करते. आपल्याला संकटात पाडणाऱ्या राक्षसराजकन्या शर्मीष्ठेला आपली दासी बनवुन ती हस्तीनापुरला घेऊन येते. देवयानीशी शारीरिक मिलन होऊनही मानसीक किंवा आत्मीक मिलन होत नसल्याने ययाती त्या प्रेमाच्या आणि मायेच्या ओलाव्याच्या शोधात शर्मीष्ठेकडे आकर्षीत होतो. पुढे दोघीही गरोदर राहतात. दोघींनाही पुत्ररत्न प्राप्त होतात. देवयानी आपल्या पतीला आवडणाऱ्या शर्मीष्ठेला मारण्याचा प्रयत्न करते पण ययाती तीला वाचवतो आणि दूर पाठवतो. पुढे ययाती आणि देवयानी यांच्यात तीडा निर्माण होऊन विरह होतो. ययाती राज्यकारभार सोडून मदीरा आणि मदनीका यांच्यात पार बुडतो. अठरा वर्षांनंतर परकिय आक्रमणादरम्यान देवयानीचा पुत्र यदु युद्धात पकडला जातो पण शर्मीषठापुत्र पुरू त्याची मुक्तता करून विजय संपादन करतो व दोघे नगरी मध्ये येतात. त्याच दिवशी अठरावर्षांनी तपश्चर्या पुर्ण करून आलेल्या आणि कन्येच्या दुःखी संसारकथेने व्यतीत झालेल्या शुक्राचार्यांच्या शापामुळे ययातीला अकाली वृद्धत्व येते. तेव्हा उत्शापासाठी त्याला त्याच्याच कुळातील, त्याच्याच रक्ताच्या कुणाचे तरी यौवन हवे असते जे तो वासनेच्या आधीन जाऊन आठरा वर्षांनी भेटलेल्या शर्मीष्ठा आणि त्याचा पुत्र पुरुकडे मागतो. पुत्र धर्माला जागुन पुरू ते देतो आणि ययाती वासनातृप्तीकडे वळतो पण शर्मीष्ठेच्या पुनर्मीलनातील अश्रुंनी त्याला पश्चात्ताप होतो. आपले जीवन त्यागुन ययाती ते यौवन गुरुला परत करतो. वेळीच आलेला कच त्याला पुनर्जीवित करतो. पुरु यदुला मोठा भाऊ मानुन राज्य देण्यास तयार असतो परंतु त्याचा त्याग देवयानीचे मनपरिवर्तन घडवुन आणतो. पुरूला राज्य सोपावुन ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा कचासोबत वानप्रस्थाश्रमाला निघुन जातात.
प्रस्तुत कादंबरी ही हिंदु पुराणातील एका प्रसिद्ध आख्यायिकेचे धागेदोरे घेऊन स्वतंत्रपणे केलेली रचना आहे असे लेखकाचे मत आहे जे बहुतांशी खरे आहे. परंतु मुळ कथेतील बोध न बदलता कथासुत्रात केलेले बदल विशेष आहेत. काम, वासना, आसक्ती, भुक , हव्यास, यांद्वारे मीळणारे क्षणीक भौतीक सुख हे माणवी जीवनाचे उद्देश नाही तर चिरस्थायी आत्मीक सुख हे आहे आणि त्याग आणि निर्वीकार , निस्वार्थ प्रेम हे त्यासाठीचे प्रभावशाली मार्ग आहेत. याचा अर्थ संसार आणि सांसारीक सुखदुःखांपासुन पुर्ण विरक्ती घ्यावी असे नाही. संसार हा जगत उन्नतीचा मार्ग आहे आणि काम त्याची प्रेरणा . या वाटेने जावे परंतु त्याची आणि इंद्रिय विषयांच्या आहारी जाऊ नये. स्वत: सवे परकल्याण करणे हे मुळ उदिष्ट जाणुन त्यासाठी आपला धर्मा जाणुन वागावे, हा मुख्य कथेचा आशय आहे. कादंबरीतील कथा चार मुख्य पात्रांभोवती फिरते – ययाती , कच, देवयानी आणि शर्मिष्ठा. तसेच इतर महत्वाचे पात्रांमध्ये नहुष महाराज, ययातीची आई, यती, अलका, मुकुलीका, माधव, तारका,अंगीरस ऋषी , शुक्राचार्य इ. समाविष्टीत आहेत. पण मुळ कथेत नसलेली काही पात्रं सुध्दा या कादंबरीत आहेत आणि त्यामुळे कथासुत्र अगदी वीलक्षण आकर्षक बनली आहे. उदा. – कच, अंगीरस, कलीका, इ. कादंबरीत काही पात्र मुळकथेपेक्षा वेगळी वाटतात; उदा. – मुळ कथेतील देवयानी इतकी क्रुर आणि अहंकारी वाटत नाही. मुळ कथेतील शर्मीष्ठा जरा चतुर, संधीसाधु आणि कारस्थानी वाटते जी कादंबरीत वाटत नाही. शिवाय या कादंबरीतील देवयानी व शर्मीष्ठा आणि कृ.प्र. खाडीलकरांच्या ‘विद्याहरण’
नाटकातील देवयानी व शर्मीष्ठा याही वेगळ्या जानवतात‌. कथासुत्राद्वारे काय सांगायचे ते आधीक उठावदारपणे सांगण्यासाठी लेखक अशी पात्रां रेखाटली विषय सोईस्कर करत असतात हे आढळुन येते. एकुण पाहिले तर हे सारे कथासुत्र खुलवीण्यासाठी उत्तम जुळुन आले आहे.
कथेचा विषय हा वैयक्तिक मानवी आणि सामाजीक अशा दोन्ही जीवनात विशेष मार्गदर्शक असा आहे. लेखकाने अगदी उत्तम वठवीला आहे. एका पुराण कथेला आजच्या प्रश्नांचा संदर्भ लाभेल आणि आजच्या विकारांविषयी विचार होईल यावर पुरेपुर भर दिला आहे. लेखकाने वापरलेले भाषा सौंदर्य, अलंकार, रुपके, आणि मुख्य म्हणजे विरामचिन्हांचा अगदी सुयोग्य वापर हे कादंबरीला लेखन कौशल्याचे उत्तम उदाहरण बनवते. विचारांचा आणि मनाचा गोंधळ वठवीताना जे अनेक प्रश्न वेगवेगळ्या मार्गांनी आणि रुपकांच्या अडोशाने पात्रांना पडतात ते या कथेद्वारे प्रकट होणारे तत्वज्ञान अगदी उत्तमपणे प्रकट करतात. कथेची रचना आणि कथासुत्राची गती त्यास अगदी पुरक ठरते. वाचकांना ते गुंतवुन ठेवतात. विचार करायला भाग पाडतात. मी तर अगदी हरवुन गेलो होतो ही कादंबरी वाचताना . एक वेगळीच ओढ लागली होती. कथा जरी एका कामुक राजाची कामकथा वाटत असली तरी ती आपल्या प्रत्येकाच्या आजुबाजुच्या परिसरातील विषयांच्या आसक्तीशी संबंधित आहे हे लक्षात येते.कथासुत्राची मांडणी आणि लेखन कौशल्य अगदी आवडेल असे आहे. अंतीम भागातील ययातीच्या मनातील द्वंद्व भावना प्रकट करणाऱ्या प्रश्नातील काही आकलनास जरा अवघड आहेत, तसेच दोन ते तीन सलग प्रकरणात ते आल्याने प्रश्न संख्या वाजवी पेक्षा अधीक वाटते. ययाती ही माझी बरीच वर्षापासुनची वाचनाची प्रतीक्षा होती. माझ्या कडे ती असुनही सात म्हशीने चौदा दिवस मी काही कारणांमुळे ती वाचु शकलो नाही. तो वाट पाहण्याचा काळ मी आजही आठवुन पाहतो तेव्हा ती वाचुन झाल्यानंतरचा आनंद अगदी चौपटीने वाढतो. मी माझ्या आजुबाजुच्या वीशीतल्या किंवा त्यापेक्षा प्रौढ असणाऱ्या प्रत्येकाला ही
वाचण्यासाठी संगतो कारण माझ्या मते या वयापर्यंत आपली ययातीची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा आणि कचाची भक्तीगाथा यांपलीकडच्या
आपल्या प्रत्येकाचे जीवन समृद्ध करणारे तत्वज्ञान समजुन घेण्याची कुवत विकसीत झालेली असते. ते तत्वज्ञान समजले तरच या सर्वोत्कृष्ट कलाकृतीशी न्याय होईल.

Recommended Posts

The Undying Light

PRASAD DAWALE
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

PRASAD DAWALE
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More