ययाती कादंबरी
हा माझा अनुभव आहे ययाती कादंबरी बद्दल. माझ्या आयुष्यात वाचलेली मी पहिली पौराणिक कादंबरी. खांडेकरांना ज्या कादंबरी साठी ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला ती कादंबरी.
तीन प्रमुख पात्रांनी त्यांच्याच तोंडून जी स्वतःची कहाणी सांगितलीय ती अतिशय उत्कंठावर्धक आहे. ययाती, देवयानी अथवा शर्मिष्ठा कोणाचीही कहाणी वाचताना असंख्य प्रश्न मनाच्या तळाशी उमटतात, कि हे असं का झालं? यांना नेमकं हवं तरी काय होत? खरंच आपल्या सुखांसाठी, आपले हट्ट पूर्ण करण्यासाठी इतकी का वाहवत जातात माणसं ?
या तिघांच्या ही मनोगतांनी जो परिणाम माझ्या मनावर केला त्याचाच हा अनुभव आहे.
प्रतिशोध. जो तीन कधी कचावर घेतला, कधी शर्मिष्ठेवर, तर कधी ययातीवर. शर्मिष्ठा राजकन्या असूनही देवयानीच्या सूडभावनेमुळे तिला दासी व्हावं लागलं. सर्वच नात्यांना पारखी झालेली ती, तिला हवं असत प्रेम, समजून घेणार माणूस. पण तिला सुद्धा ते कधी कचाला भाऊ मानून मिळवावं लागलं, तर कधी ययातीला पती मानून.
प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या त्यांच्या गरजेनुसार बदलत गेल्या. ययाती पासूनच सुरवात करायची झाली तर ….
“ययाती”- त्याच जीवन म्हणजे फक्त प्रेमाचा शोध इतकंच मर्यादित राहिल्यासारखं वाटत. त्यानं मिळवलेलं प्रेम त्याला शेवटपर्यंत कमीच पडत राहत. त्यानं आईच्या प्रेमाची अपेक्षा करावी तर आईला मुलावरच्या प्रेमापेक्षाही स्वतःच सौंदर्य नि राजघराण्याची प्रतिष्ठा महत्वाची वाटली. अगदी एका दासीलाही आई म्हणण्याइतपत ययाती वर वेळ यावी इतका तो आईच्या प्रेमाला पारखा झाला होता. देवयानी पत्नी म्हणून आयुष्यात आली खरी पण देवयानी फक्त आणि फक्त तिला हवं असेल ते मिळवण्यासाठी त्याचा वापर करत राहिली. ययातीवर निरपेक्ष प्रेम कोणी केलं असेल तर ते शर्मिष्ठेनं, पण दुर्दैवानं तिचीही साथ मधेच सुटली. शर्मिष्ठा आयुष्यातून निघून गेल्यानं सैरभैर झालेला ययाती, अजूनच वासनेच्या आहारी गेला. आयुष्यभर तो फक्त आणि फक्त सुखोपभोगच घेत राहिला. वासने पुढे नि मद्याच्या धुंदीपुढे त्यानं सर्व नाती तुच्छ मानली. शेवटी शेवटी तर तो इतका वासनामग्न झाला कि शापामुळे आलेल्या वार्धक्यासाठी त्यानं स्वतःच्या मुलाचं तारुण्य उसनं मागितलं. विषय विकारांच्या पूर्णपणे आहारी गेलेला असा हा ययाती. सार्वभौम राजा असूनही आपण सुखी नाही आहोत, याच विवंचनेत तो जगला. मरणाची भीती कुठून ना कुठूनतरी त्याला जाणवतच राहिली. अगदी आयुष्याच्या शेवटीला कुठेतरी त्याला याची जाणीव झाली कि हे सर्व एक मृगजळ आहे. ज्याच्यासाठी तो जगला ते सर्व सुख शेवटी मिथ्या ठरलं. कदाचित म्हणूनच आपली कहाणी.
तारुण्य उसनं मागितलं. विषय विकारांच्या पूर्णपणे आहारी गेलेला असा हा ययाती. सार्वभौम राजा असूनही आपण सुखी नाही आहोत, याच विवंचनेत तो जगला. मरणाची भीती कुठून ना कुठूनतरी त्याला जाणवतच राहिली. अगदी आयुष्याच्या शेवटीला कुठेतरी त्याला याची जाणीव झाली कि हे सर्व एक मृगजळ आहे. ज्याच्यासाठी तो जगला ते सर्व सुख शेवटी मिथ्या ठरलं. कदाचित म्हणूनच आपली कहाणी कुठलाही आडपडदा न ठेवता त्याला जगाला सांगावीशी वाटली.
कथेमधील दुसरी व्यक्ती म्हणजे “देवयानी”. कचाने जिच्या प्रेमाला प्रतिसाद न देता कर्तव्याला प्रेमापेक्षा जास्त महत्व दिल अशी देवयानी. कच निघून गेल्यावर तिच्या मनावर मोठा आघात होतो. नि या सर्वात भर पडते ती शर्मिष्ठा आणि देवयानीच्या भांडणाची. अहंकारी देवयानी शर्मिष्ठेवर सूड उगवण्यासाठी तिला स्वतःची दासी बनवून हस्तिनापूरला घेऊन येते. अपमानित झालेली व्यक्ती आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते हे खांडेकरांनी देवयानीच्या रूपात पूर्णपणे व्यक्त केलंय. कदाचित देवयानी हि ती स्त्री नसावीच जी ययातीला अपेक्षित होती. पत्नीच्या रूपात त्याला एक मैत्रीण, समजून घेणारी जोडीदार आणि निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती हवी असते. पण देवयानी कायम आपल्या सौंदर्याच्या, अहंकाराच्या जगातच राहिली. शुक्राचार्यांपेक्षा श्रेष्ठ तिच्यासाठी कधीच कोणी नव्हतं. ती कायम जे तिला हवं तेच करत राहिली. मग त्यासाठी तीन कधी आपल्या सौंदर्याचा अधिकार ययातीवर गाजवला, तर कधी महाराणी पदाचा आपला अधिकार दाखवला. खर प्रेम भोगात नसून त्यागात असत हे सत्य तिला देखील आयुष्याच्या शेवटी कळलं.
तिसरी नि महत्वाची व्यक्ती म्हणजे “शर्मिष्ठा”. ती जितकी महत्वाची तितकीच आदरणीय. ययाती आणि देवयानी यांच्यापेक्षा खूप वेगळी असलेली शर्मिष्ठा मनाला खूप भावली. खूप काही शिकवून सुद्धा गेली. तिच्याही वाट्याला दुःख आली, पण त्याहीपेक्षा तिची त्या दुःखाला सोसण्याची तयारी खूप मोठी होती. खरं प्रेम निस्वार्थी असत, नि सुखापेक्षाही जास्त मोठा आपण आपल्या माणसांसाठी केलेला त्याग असतो, तो त्याग आपल्याला सर्वश्रेष्ठ बनवतो हे तिला खूप लवकर उमगलं होत. म्हणूनच तर आई वडिलांसाठी देवयानीची दासी होणं तीन आनंदानं मान्य केलं, ययाती साठी ती सर्व काही सोडून वनवासी सुद्धा झाली. ययातीवर तीन अगदी निरपेक्ष प्रेम केलं होत. कदाचित म्हणूनच १८ वर्ष दूर राहूनही ती मनोमन फक्त ययातिचीच पूजा करायची. जेवढी हट्टी, तापट आणि संतापी देवयानी होती तितकीच शांत, प्रेमळ, नि समजूतदार शर्मिष्ठा होती. त्या दोघी म्हणजे जणू एका नाण्याच्या दोन बाजू. दैवाचे इतके आघात सोसूनही तीच ययातीवरच प्रेम कुठेही कमी होत नाही. कारण तिच्या प्रेमात कुठलाच स्वार्थ नव्हता कि कसलीच मागणी नव्हती. प्रेमात मोठ्यातला मोठा त्यागही तीन आनंदानं स्वीकार केला. कादंबरीच्या बहुतांश पात्रामध्ये काही ना काही दोष असूनही शेवटी सगळ्यात निर्दोष उरते ती शर्मिष्ठा.
कादंबरीतील प्रत्येक पात्रान स्वतःची कहाणी सांगताना, स्वतःच्या स्वभावदोषानुसार अगदी परस्परविरोधी भूमिका मांडल्यात. ज्यामध्ये प्रेम-वात्सल्य, वाद-विवाद, सूड-संयम, कर्तव्य, सर्व काही येत. पण खांडेकरांनी त्यातूनही एक अशी चर्चा आपल्यापुढे मांडलीय कि तिचा सर्वस्वी परिणाम आपल्यावर होतो. या कादंबरी मधे जीवनाचं असं काही तत्वज्ञान सांगितलंय, कि ते या सर्वांना कुठे ना कुठे, कधी ना कधी समजत गेलं तस आपल्यालाही मार्गदर्शक होत राहील.
कादंबरीतील प्रत्येक पात्रान स्वतःची कहाणी सांगताना, स्वतःच्या स्वभावदोषानुसार अगदी परस्परविरोधी भूमिका मांडल्यात. ज्यामध्ये प्रेम-वात्सल्य, वाद-विवाद, सूड-संयम, कर्तव्य, सर्व काही येत. पण खांडेकरांनी त्यातूनही एक अशी चर्चा आपल्यापुढे मांडलीय कि तिचा सर्वस्वी परिणाम आपल्यावर होतो. या कादंबरी मधे जीवनाचं असं काही तत्वज्ञान सांगितलंय, कि ते या सर्वांना कुठे ना कुठे, कधी ना कधी समजत गेलं तस आपल्यालाही मार्गदर्शक होत राहील.
काळाच्या प्रत्येक टप्प्यावर कुठेतरी ययाती, देवयानी, शर्मिष्ठा जन्माला आले आहेत. येत राहतील. खरं तर हि पात्र नसून या समाजातील प्रत्येकाच्या मनात असलेल्या भावना आहेत. ज्या प्रसंगानुरूप बाहेर येत असतात. प्रत्येकाच्या मनात एक ययाती, देवयानी, शर्मिष्ठा, कच, हे कुठेतरी लपलेले आहेत. कारण माणसामध्ये जस अहंकार, महत्वकांक्षा, सूड या विकृती असतात तसं प्रेम, त्याग, ममता या प्रवृत्तीही असतात. कधी कधी आपणही रागाच्या भरात एखादी चूक करून बसतो, मोहामध्ये भरकटून जातो, आपल्या माणसांवर निरपेक्ष प्रेमही करतो.
शेवटी काय जीवनाचं तत्वज्ञान अगदी सहज सोप्या भाषेत, कोणतीही गुंतागुंत न वाढवता जाणून घ्यायचं असेल तर अवश्य वाचा “ययाती”.