Share

ययाती – वि. स खांडेकर (कांबळे पलक उमेश SYBA ) विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती.
प्रस्तावना :- वि. स खांडेकर यांचे अत्यंत नावाजलेले आणि अत्यंत श्रेष्ठ साहित्यातील श्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ही कादंबरी प्रसिद्ध आहे. ययाती लेखक वि. स खांडेकर यांची 1959 सालची मराठी भाषेतील ऐतिहाशिक कादंबरी आहे. मराठी साहित्यातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय कादंबऱ्यापैकी एक आहे. महाभारतातील पात्र ययाती आणि देवयानी यांच्या पौराणिक प्रेमकथे भोवती फिरणारी ही कादंबरी आजवर लिहलेली सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणून ओळखली जाते. सदर कादंबरी ही साध्या, सोप्या आणि वाचकाला मनापर्यंत भिडणारी आहे. आशय अगदी सोप्या शब्दांमध्ये मांडलेला आहे. भावनांवर आधारित ही कादंबरी आहे. हस्तिनापुरचा राजा ययाती नावाच्या नायकाच्या जीवनावर केंद्रस्थानी आहे.
सारांश : निराशा ययातीच्या मुरुवातीच्या जीवनाचे वैशीष्ट्ये आहे. कादं‌बरीतील पात्रे सामान्यतः काव्यात्मक भाषा वापरतात. कादंबरीत तीन कथाकार आहेत. ययाति देवयानी आणि शर्मिष्ठा, जेव्हा ययातीला समजते की, त्याच्या आईने आपले संदिर्य गमावण्याच्या भीतीने त्याचे दुध सोडले आहे तेव्हा त्याचा मातृप्रेमावरील विश्वास तुटतो नंतर त्याला क्रूरता भाणि उत्कटतेचा आनुभव येतो. जो त्याच्या पुरुषत्वाला आव्हान येतो ययातीची कथा आपल्याला एक चांगला घडा सांगते की, तारुण्य हा जीवनाचा सर्वोत्तम काळ आहे हा सौंदर्य सामर्थ्याने भरलेले आहे. हा तो काळ आहे, जेव्हा एखादा तरुण स्वतःसाठी किंवा देशाचे कल्याण करू शकतो पण ही कादंबरी आपल्याला हे देखील सांगते की, भोगाने इच्छा शमवण्याचा व्यर्थ प्रयत्न आहे मनुष्याच्या भोगवादी प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे
ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे, शर्मिष्ठाची प्रेमकथा आहे, आणि कचाची भाक्तीग्राथा आहे हे कथानक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते ययाती हा आजच्या सामान्य मनुष्याचा प्रतिनिधी आहे. पुराणातल्या ययातिची कामवासना किती कठोर स्वरूप धारण करू शकते आणि भोगाच्या समुद्रात मनुष्य कितीही बुडाला तरी त्याची इच्छा अतृप्त राहते. हे या कादं‌बरीमधून स्पष्ट होते आजचा मनुष्य केवळ वासनेला बळी पडत आहे. त्याचे मनोविकार अनियंत्रित स्वरूपाचे आहेत.
विश्लेषण = ज्याला स्वप्नातही संयम नाही असा ययाती, अहंकारी, महत्त्व काशी आणि मनात दंश धरणारी आणि प्रेमरंगात दिव्धा झालेली देवयानी, स्वताच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर प्रेमाचा वर्षात करणारी शर्मिष्ठा निरपेक्ष प्रेम हाच तिचा धर्म होवून बसला आहे. विचारी, ध्येवादी संयमी, कच ही चार प्रमुख पात्रे या कथेमध्ये आढळतात. या पात्रांभोवती ही कथा फिरते वाचकांनी आवश्यक वाचावी अशी ही कथा आहे.
मनुष्याच्या चीस्तरून राहण्याऱ्या भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश ही कादंबरी टाकते जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्यावेळेस त्याला हे जीवनातील अंतिम सत्य नव्हे याची जाणीव होते.
ताकद आणि कमकुवत बाजू: ययाती कादं‌बरी तरुणांसाठी तसेच सखल मानवजातीसाठी आवश्यक आहे ययातिने सर्व सुख उपभोगली पण तो सुखी मात्र होवू शकला नाही. आनियंत्रित कामवासना त्याला आधिकाधिक सतावत गेली, शुर धाडसी, पराक्रमी आणि जग जिंकल्याची स्वप्न ज्या ययातिने पाहिली ती काही काळानंतर स्वप्नच राहिली. यायाती कादं‌बरी खूप प्रसिद्ध आणि महत्व पूर्ण संदेश देणारी कादं‌बरी आहे.

वासनेच्या आहारी गेलेला ययाति एवढा स्वार्थी होती की, स्वताला शाप म्हणून मिळालेले वृध्दत्व तो आपल्या पोटच्या मुलाला देऊ करते.
वैयक्तिक विचार – ययाति ही कादंबरी खूप छान असून माझ्या मते, प्रत्येक तरुण वयातील मुलाने वाचावी अशी ही कादंबरी आहे किशोरवस्थेत, तरूणावस्थेत आपल्या हातात वेळ आणि वय या दोन गोष्टी असतात शूर, धाडसी आणि ज्या तरुणाने जग जिंकायची स्वप्न पाहिली तो ययाति कामवासनेच्या आहारी जावून स्वर्थी, महत्वकांक्षी होवुन जातो. आणि आपल्या अंगी असणाऱ्या पराक्रमी शौर्याला त्याला हळूहळू विसर पडतो. शेवटी हे सारे काही निष्फळ, निरर्थक उरते त्यामुळे वाचकांनी आवश्य त्या कादंबरीला प्राधान्य देवून ती वाचावी आणि प्रत्येक तरुणाने त्यामध्ये जो संदेश दिला आहे त्याचे अनुकरून करून या दृष्टीने वाटचाल करावी ही नम्र विनंती.

Recommended Posts

The Undying Light

Alka Jagtap
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Alka Jagtap
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More