(पुस्तक परीक्षण-भामरे कुंदन रमेश, शिपाई-M.V.P.Samaj’s Sharadchandraji Pawar College of Architecture, Nashik)
या पुस्तकाची पहिली आवृत्ती ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रकाशित झाली आहे, या पुस्तकात लेखकांनी लडाख बुलेट राईड चे स्वप्न कसे पूर्ण केले याचे वर्णन केले आहे.त्यांचे लडाख बुलेट वारी हे स्वप्न होते, ते साकार करण्यासाठी कसा प्रवास केला. याचा पुस्तकात पूर्णपणे उल्लेख केला आहे. मी जेव्हा पुस्तक वाचत होतो तेव्हा असे वाटत होते की मी सुद्धा हा अनुभव घेतला पाहिजे आणि स्वप्न पडणे आणि समोर तेच साकार होणे याचा उल्लेख पुस्तकात केलेला आहे स्वप्नांना वयाची मर्यादा नसते. कोणत्याही वयात कोणतेही स्वप्न साकार करू शकतो,तसेच या प्रवासात जाण्याआधी वाटणारी भीती व चिंता दूरवर गेली असे पुस्तकाच्या माध्यमातून कळाले.जीवनात अनेक स्वप्न पडतात पण ते झोपेच्या मर्यादे पुरती असतात. आपण स्वप्न पाहत असतांना सुद्धा जी गोष्ट आपल्याकडून होत नसलेली गोष्ट आपण झोपेच्या स्वप्नांमध्ये पूर्ण करू शकतो पण जाग आली तर ते स्वप्न संपते पण लेखकांनी जे स्वप्न करायचे म्हणजे करायचे ते म्हणजे लडाख बुलेट वारी. जे अनुभव आणि गोष्टी प्रवास झालेल्या पुस्तकात वर्णन केलेले आहे . पहिल्या दिवशी गेल्या असता त्यांना ज्या ठिकाणाची पूर्णपणे माहिती नव्हती .आणि एक ग्रुप मध्ये सामील होऊन त्यांनी त्यांचा प्रवास मिळून मिसळून पूर्ण केला, आपण पहिल्या दिवसपासून प्रवासाच्या शेवटच्या दिवसापयर्त झालेल्या गोष्टी व अनुभव चागंल्या वाईट गोष्टी त्यांनी पुस्तकात मांडले आहेत .
लडाख ला जाऊन काय करावे ? आणि कोणत्या पद्धतीत राहावे ? हे किती गरजेचे असते ते फक्त लडाख डायरी वाचल्यावरच कळू शकते व तेथे जाऊन कोणाशी मैत्री झाली व कोणशी कसे वागावे याचा अनुभव आपल्याला लडाख डायरीमधून कळू शकतो.आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असतांना आपण प्रेमाने व आदराने वागावे आपण आपल्या स्वभावावर नियंत्रण कसे ठेऊ शकतो याचा सुद्धा अनुभव या लडाख डायरीतुन घेऊ शकतो . बाहेरगावी गेल्यावर कसे राहावे काही काही ठिकाणी लोक तंबू लावून राहतात व लडाख चा अनुभव घेतात पण तो आनंद घेण्यासाठी आपण तेथे पोहोचणे गरजेचे असते पण , आपण कधी जाऊ याचा विचार करू पण लडाख डायरी वाचल्यावर असा अनुभव आला कि मी लेखका बरोबर लडाख चा प्रवास करत आहे.
या सर्व गोष्टी मी फक्त वाचून अनुभव घेतला पण समोर जाऊन कसे वाटत असेल याचा मला प्रश्न पडत होता पण या सर्व अनुभवाचे मानकरी लेखक असून पण लडाख डायरी साकारली नसती तर आपल्या पर्यंत या गोष्टी पोहोचल्या नसत्या कोणीही लडाख ला जाण्याचे मन झाले तर लडाख डायरी पूर्णपणे वाचून लडाख चा प्रवास सुरु करायचा त्याठीकाणी प्रवास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी व लागणारे साहित्य ,शरीराची काळजी घेण्यासाठी या सर्व गोष्टी चा उल्लेख पुस्तकाच्या शेवटी केलेला आहे, या चांगल्या प्रकारे पुस्तकातून सर्व माहिती मिळू शकते मला लडाख डायरी वाचून वेगळाच अनुभव आल्या सारखे वाटू लागले व , कधीतरी आपल्याला लडाख ला जाण्याचा योग यावा . तर मी लडाख डायरी बरोबर ठेवेल व कोणीतरी लडाख जाण्याचा विचार केला तर मी त्यांना लडाख डायरी वाचण्यासाठी प्रोत्साहित करेल, कारण लडाख हा प्रवास चांगल्या प्रकारे होऊ शकतो .