Share

(पुस्तक परीक्षण प्रा भगवान गावित ग्रंथपाल शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर)
लेखक दया पवार यांनी दगडू या स्वतःच्याच प्रतिबिंबाच्या रूपाने आपले आत्मचरित्र सांगितले आहे. खंर तर एखाद्या व्यक्तीचं आत्मचरित्र म्हणजे त्याचा इतिहास असतोच पण त्याचा बरोबर तो त्याच्या समाजाचा आणि त्या समाजाच्या चाली रीती, प्रथा कुप्रथा यांचाही इतिहास असतो. त्याच बरोबर लेखक त्याच्या सग्या सोयऱ्यांनाही भूतकाळातून जिवंत करत असतो. दगडू हा एका महार कुटुंबात मुंबई ला जन्माला येतो पुढे तो काही वर्षांनी कुटुंबा बरोबर आपल्या घराकडे परततो, पुन्हा मुंबई हा आयुष्याचा प्रवास लेखकाने फार बारीकसारीक गोष्टीतून मांडला आहे.
बलुतं वाचताना आपल्याला समोरच ग्रामीण जीवनाची काळी बाजू समोर येते. वाचताना आपली मती गुंग होते. प्रश्न पडतो एखादा समाज आपल्याच बांधवाना कसा काय पशुवत आणि गुलामी सारखी वागणूक देऊ शकतो? आणि पीडित समाजही तो सहन करत राहतो ,कितीही अन्याय झाला तरी तोंड दाबून बुक्यांचा मार खात राहतो ! आपल्या संस्कृतीत जात किती खोलवर भिनली आहे याची प्रचिती येथे प्रत्येक वेळी येते.बलुत्यावर जगणारा महार समाज आणि गावात मेलेल्या गुरांचं मासं खाणारा समाज आंबेडकरांमुळे पूर्णतः बदलून जातो परंतु त्यांच्या मृत्यू नंतर दलित चळवळ आणि राजकारणाची कशी परवड झाली? इतरांनी त्यांचा सत्तेची शिडी म्हणून कसा वापर करून घेतला ? झोपड्पट्टीतलं त्याचं जीवन म्हणजे पृथ्वीवरील नरकचं आहे ? याचे चित्र आपल्या समोर उभा उभं राहतं करणारे हे पुस्तक.
एकेकाळी देवदेवतांनमधे गुरफटलेला हा समाज बुद्ध झाल्यानंतर कसा एकाकी पूर्ण बदलतो आणि शोषणा विरोधात कसा संघर्ष करतो याचे ही प्रेरणादायी चित्र यात आहे. लेखकाने निखळ मनाने केलेल्या वर्णनात स्वतःच्या चुका ,दोष ,इतर समाजाचे गुण दोष ,स्त्री पुरुष संबंध, अनैतिक संबंध, यावरही काही आडपडदा न ठेवता सांगितले आहे. पुस्तक वाचत असताना संवेदनशील मनावरील जळमटे हळूहळू गळून पडू लागली आणि समाज उतरंडीवर असलेल्या या समाजाला इतके काही भोगावे लागले असेल याची कल्पनाही करवत नाही. पुस्तकाच्या शेवटी असलेली पु. ल. देशपांडेची प्रतिक्रियाही वाचण्या सारखी आहे. पुस्तक वाचून झाल्यानंतर मी हि कुठेतरी गुंतलो होतो असा भास सहज होऊन गेला.

Related Posts

सॉलिड स्टेट फिजिक्सच्या विविध संकल्पना आणि सिद्धांतांचा सखोल अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे

Bhagwan Gavit
ShareSolid State Physics हे एस.ओ. पिल्लई (S.O. Pillai) यांचे एक अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहे, जे सॉलिड स्टेट फिजिक्सच्या विविध संकल्पना...
Read More

मृत्युंजय

Bhagwan Gavit
Shareमृत्युंजय कादंबरी हि शिवाजी सावंत यांनी भारतीय इतिहासातील सर्वात महान नायक कर्णाच्या जीवनावर लिहलेली एक सर्वउत्कृष्ठ कादंबरी आहे. यात कर्णाचे...
Read More